व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपण जाणतोच. हेच तत्व विद्यार्थ्यांनासुद्धा लागू होते. विद्यार्थ्यांची निरनिराळी शैक्षणिक उद्दीष्ठे असतात, त्याचप्रमाणे त्यांच्या जमेच्या व कमकुवत बाजूसुद्धा भिन्न असतात. शिकण्याची प्रक्रिया आणखी परिणामकारक करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची गरज समजून त्यानुसार वैयक्तिक स्तरावर लक्ष देणे गरजेचे असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास शिक्षण पद्धती ही शिक्षकांऐवजी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी असावी. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी शिक्षकाद्वारे मदत करण्याच्या या अध्यापन पद्धतीला रचनात्मक शिक्षणवाद- ज्ञानरचनावाद असे म्हणतात.
याअंतर्गत शिक्षक विद्यार्थ्याला अध्ययन प्रभावी करण्यासाठी तसेच निरनिराळ्या शैक्षणिक कार्यांमध्ये पारंगत होण्यासाठी मदत करतात. विद्यार्थी शिकत असताना त्यांचे ज्ञान व कौशल्यांमध्ये वृद्धी व्हावी असा शिक्षकांचा प्रयत्न असतो. जसेजसे विद्यार्थी प्रगती करत जातात, तसा तसा त्यांना देण्यात येणारा आधार हळूहळू कमी करण्यात येतो. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना एकंदरीत शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रभावशाली भूमिका घेण्यास प्रोत्साहित करण्यात येते. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न किंवा शंका विचारण्याची, अभिप्राय देण्याची व इतर विद्यार्थ्यांना मदत करण्याची मुभा असते. या शिक्षणपद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणारे एक आश्वसक व विश्वासपूर्ण शैक्षणिक वातावरण. जेव्हा विद्यार्थ्याला एखादी कॉन्सेप्ट समजण्यामध्ये समस्या येतात, त्यावेळी रचनात्मक शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी करण्याची गरज भासते.
असे विद्यार्थी नव्या संकल्पना/ कौशल्ये शिकविल्या जात असताना शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांना केवळ त्या प्रक्रियेची एक वरवर ओळख होते. अश्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेदरम्यान मूलभूत कॉन्सेप्ट समजण्यात अनेक अडचणी येतात. यावर उपाययोजना करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष देणे अभिप्रेत असते. जेव्हा विद्यार्थी त्यांना वैयक्तिकरित्या देण्यात आलेल्या स्वाध्याय कृती पूर्ण करतात त्यातून त्यांना त्या कॉन्सेप्टचा किती अर्थबोध होतो आहे हे कळण्यास मदत होते.
रचनात्मक शिक्षणपद्धतीची पुढील तीन वैशिष्टये शिक्षण प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात.
- शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील पूरक संवाद! या संवादातून विद्यार्थ्याला ज्ञान तसेच कौशल्ये यांचे कितपत आकलन झाले आहे हे शिक्षकाच्या लक्षात येते.
- विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन किंवा नवे कौशल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया समजून घेताना त्यांच्या अंगी असणारे ज्ञान व कौशल्य यांची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थ्याच्या प्रासंगिक आकलनशक्ती, भावनिक विकास व स्वैच्छिक आवडीनुसार त्या विद्यार्थ्याचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी मदत केली जाऊ शकते.
- जेव्हा विद्यार्थी तज्ज्ञांद्वारे सुचविलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करतात, तेव्हा ती कौशल्ये आत्मसात करण्यात ते कालांतराने पारंगत होतात. त्यानंतर त्यांना देण्यात येत असलेला आधार हा कमी करून त्यांना स्वबळावर शिकण्यास सज्ज केले जाते.
पायाभूत विकास प्रभावी होण्यासाठी शिक्षकांना पुढील बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असते.
- लर्निंग टास्कची निवड – या स्वाध्यायातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विकासात्मक कौशल्यांचा उपयोग करण्याची संधी मिळावी. ही कृती विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणारी असावी. तसेच ही कृती खूप सोपी किंवा खूप कठीण नसावी.
- चुकांचे पूर्वानुमान – कृतीची निवड केल्यानंतर, या कृतीदरम्यान विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येणाऱ्या संभाव्य चुकांचे अनुमान शिक्षकांना लावता यायला हवे. यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या प्रयत्नांची योग्य दिशा ठेवणे शक्य होते.
- लर्निंग टास्कदरम्यान योग्य पाया निवडणे – विद्यार्थ्यांसाठी ‘मूलभूत कौशल्यांचे अंगीकरण’ किंवा ‘विकासात्मक आणि उत्स्फूर्त विद्यार्जन’ यापैकी एक पाया निवडण्यात यावा.
- भावनिक विषय – पायाभूत विकास हा केवळ आकलनशक्तीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रतिक्रियांना सुद्धा त्यात समाविष्ट केले जाऊ शकते. स्वाध्याय कृतींदरम्यान विद्यार्थ्यांची होणारी चिडचीड किंवा विद्यार्थ्यांची त्या कृतीतील आवड कमी होणे यासारख्या भावनिक समस्या शिक्षकांना हाताळाव्या लागू शकतात.
Embibe प्रोडक्ट /वैशिष्ट्ये: वैयक्तिकृत अचिव्हमेंट जर्नी, नेक्स्ट क्वेश्चन इंजिन
प्रोत्साहन हे सुद्धा यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते. Embibe च्या ‘नेक्स्ट क्वेश्चन इंजिन’ अंतर्गत पर्सनलाइज्ड अचिव्हमेंट जर्नी, प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या वैयक्तिक गरजांना तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अनुसरून शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या क्षमतांनुसार त्यांना निरनिराळ्या काठिण्य पातळीचे प्रश्न देण्यात येतात. या प्रश्नाची संख्या कमी जास्त सुद्धा असू शकते. विद्यार्थीसुद्धा कुठल्याही प्रकरणावर त्यांची स्वतःची प्रश्न पत्रिका तयार करू शकतात. यामार्फत ते त्यांच्या जमेच्या बाजू त्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार पडताळून पाहू शकतात. ‘आमच्यासोबत सोडवा’ या आमच्या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक प्रश्नासाठी काही सूचना तसेच प्रत्येक पातळीवर सूक्ष्म सूचना दिल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवण्यास मदत मिळते. जर विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यास अडचणी येत असतील तर त्यांना विस्तृत उत्तरे देऊन तपशीलवार विवेचन दिल्या जाते. हे एक तज्ज्ञ गुरु आपल्याला सदैव मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असल्यासारखे आहे.
Embibe द्वारे शिक्षण तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन एका मिनिटांपेक्षा कमी वेळात करतात. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करत एक उत्तम विश्व घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि शिक्षण तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांतुन आम्ही त्यादिशेने वाटचाल करीत आहोत! विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी कठोर परिश्रम करत असते.