आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत

शिक्षण खरोखर पर्सनलाइज्ड आणि लोकशाहीप्रदान बनवण्याच्या उद्देशाने 2012 मध्ये Embibe ची स्थापना झाली. आमचा विश्वास आहे की कोणतेही दोन विद्यार्थी एकसारखे नसतात. मग त्यांच्या शिकण्याच्या पद्धती कशा सारख्या असू शकतात? म्हणूनच आतापर्यंत कधीही शोधला न गेलेला सर्वात शक्तिशाली शैक्षणिक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण पर्सनलाइज्ड करण्यासाठी Embibe AI आणि डेटा सायन्सची मदत घेते. Embibe वर आपल्या पाल्याला त्यांच्या अभ्यासक्रमाशी संलग्नीत असलेल्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक कॉन्टेन्ट मध्ये प्रवेश मिळतो. ते 45,000+ कॉन्सेप्टचे रोमांचक व्हिडिओ शोधू शकतात, ज्यामध्ये CBSE, ICSE आणि इतर अनेक राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट आहे. शालेय शिक्षणाव्यतिरिक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय, बँकिंग, शिक्षण, इन्शुरन्स यासारख्या विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते.

Embibe जे काही करते ते डेटावर आधारित असते. म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही आपल्या पाल्याची कामगिरी सुधारण्यास मदत करू शकतो, तेव्हा आम्ही ते खरोखर करत आहोत! आम्ही प्रथम आपल्या पाल्याच्या ज्ञान पातळीचे विश्लेषण करतो आणि त्यांचे मजबूत आणि कमकुवत विषय ओळखतो. या विश्लेषणाच्या आधारावर, आम्ही शैक्षणिक साहित्याची शिफारस करतो जी आपल्या पाल्याचे नॉलेज गॅप दूर करण्यास मदत करते जे केवळ वर्तमान इयत्तेशी संबंधित नसून त्यांच्या मागील इयत्तेमधून ते शिकू शकतील अशा कमकुवतपणावर देखील मॅप केले जाऊ शकतात. हा शैक्षणिक कॉन्टेन्ट आकर्षक पद्धतीने सादर केला गेला आहे ज्यामुळे त्यांना मनोरंजक वाटेल आणि त्यांना कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

आमच्या AI इंजिनद्वारे समर्थित, प्रॅक्टिस प्रश्न आपल्या पाल्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्या बौद्धिक स्तरावर आधारित आहेत आणि प्रश्न सोडवताना आम्ही त्यांना टिप्स आणि हिंट सोबत योग्य उत्तरे देण्यास मदत करतो. प्रॅक्टिस सत्राच्या शेवटी, आम्ही योग्य आणि अयोग्य कॉन्सेप्ट वरच नव्हे तर आपल्या पाल्याने प्रश्नांचा प्रयत्न करण्याच्या मार्गाचा देखील तपशीलवार अभिप्राय प्रदान करतो. त्यांनी एका प्रश्नावर जास्त वेळ घालवला का? त्यांनी निष्काळजीपणामुळे चुका केल्या का? त्यांना अति आत्मविश्वास होता का? हा पर्सनलाइज्ड अभिप्राय आपल्या पाल्याला त्यांच्या परीक्षेसाठी किती तयार आहे हे समजण्यास मदत करेल.

जेव्हा आपले पाल्य टेस्ट देण्यास तयार असेल, तेव्हा आम्ही प्रत्यक्ष टेस्टच्या काठीण्य पातळीशी जुळणाऱ्या टेस्ट संरेखित करतो. जेव्हा आपण मागील वर्षांच्या पेपरमधून टेस्ट घेता तेव्हा टेस्ट क्वालिटी स्कोअर स्पष्ट केला जातो किंवा आमच्याद्वारे तयार केलेल्या टेस्टपैकी एक आपली टेस्ट प्रत्यक्ष टेस्टच्या काठीण्य पातळीच्या किती जवळ आहे हे दर्शवते. टेस्ट विभाग आपल्याला कस्टम टेस्ट देण्याची परवानगी देखील देतो, जेथे आपले पाल्य त्यांच्या आवडीनुसार एक किंवा अनेक विषय/टॉपिक्सचा समावेश करून स्वतःच्या टेस्ट तयार करू शकते. एकदा टेस्ट संपल्यानंतर, पर्सनलाइज्ड अभिप्राय विश्लेषण त्यांच्या कमकुवतपणा आणि सामर्थ्यांची व्यापक समज प्रदान करते.

Embibe आपल्याला आपल्या पाल्यामधील विद्यार्थी ओळखण्यास मदत करते. आम्हाला माहित आहे की पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाचा विचार करतांना अनेकदा असहाय्य वाटते आणि पाल्यांनी सतत हस्तक्षेप करणे नेहमीच स्वागतार्ह नसते. Embibe सोबत, आपण आता Embibe च्या पॅरेन्ट अ‍ॅपद्वारे आपले पाल्य जे काही शिकते त्याचा ट्रॅक ठेवू शकता. आपल्याला त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर रिअल टाइम अपडेट मिळतात जेणेकरून आपण त्यांच्या अभ्यासक्रम पूर्णतेचा देखील ट्रॅक ठेवू शकता. आपण त्यांच्यासाठी पूर्व-नियोजित धड्याच्या योजनांमधून निवडून किंवा उजळणीसाठी व त्यांचे ज्ञान पाहण्यासाठी सुद्धा आपले स्वतःचे धडे तयार करू शकता. पर्सनलाइज्ड अभिप्राय आपल्याला त्यांचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा पाहू देते आणि त्यानुसार आपण त्यांच्या उजळणी योजना बनवू शकता. त्यापलीकडे जाऊन आपल्या पाल्याचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी आमच्याकडे एक उत्तम मार्ग आहे. आपल्या पाल्याच्या आवडीच्या क्रियांसाठी आपण त्यांना नियुक्त केलेल्या कामांवर आधारित कस्टमाइज बक्षिसे अनलॉक करा. ती मूव्ही नाईट, पिझ्झा नाईट किंवा त्यांच्या आवडत्या संग्रहालयाची सहल असू शकते. Embibe सोबत आपण असे शिक्षक बना ज्याचा आपण कधीही विचार केला नाही.

एकदा पालक म्हणून आपण पालक-शिक्षक सभांमध्ये संभाषणांवर नियंत्रण ठेवू शकता. Embibe च्या तपशीलवार विश्लेषण आणि पर्सनलाइज्ड अभिप्रायासोबत, आपण आपल्या पाल्याच्या प्रगती आणि अभ्यास योजनेवर अर्थपूर्ण चर्चा करण्याच्या स्थितीत असाल. आपल्या पाल्याच्या ज्ञान पातळीशी संबंधित डेटा समर्थित अंतर्दृष्टीसह शिक्षकांशी कनेक्ट व्हा. प्रॅक्टिस आवश्यक असलेल्या धडा योजना आणि कमकुवत टॉपिकवर चर्चा करा. ते कसे कामगिरी करत आहेत आणि त्यांना कुठे अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे पाहण्यासाठी शिक्षकांशी संपर्क साधा. शेवटी, आपल्या शैक्षणिक गुंतवणूकीवरील परताव्याचे मोजमाप करण्याचा हा एक मार्ग असेल.

सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगला वेळ नाही
आता अ‍ॅप डाऊनलोड करा

Poster img

पेरेंट ॲप