रचनावादावर आधारित अध्यापन व अध्ययन करण्यासाठी पूरक सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करणे
सामाजिक रचनावादाचा सिद्धांत सामाजिक व सांस्कृतिक वातावरणावर भर देतो. यामध्ये सक्रिय सहभागातून शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
सामाजिक रचनावादाचा सिद्धांत सामाजिक व सांस्कृतिक वातावरणावर भर देतो. यामध्ये सक्रिय सहभागातून शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होते.
अनेक शास्त्रज्ञांच्या मते शिक्षणाला एक सामाजिक पार्श्वभूमी असते. व्यक्तीची वैयक्तिक जडणघडण व ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेचा विकास हा सामाजिक संवादातून होतो. सामाजिक रचनावादाचा सिद्धांत हा अश्याच प्रकारच्या सहभागातून शिकण्यावर भर देतो.
रचनावाद हा शिक्षणशास्त्रातील एक सिद्धांत आहे. यामध्ये विद्यार्थी ज्ञान व माहितीची वैयक्तिक संरचना यांच्या सहभागातून त्यांची समज दृढ करतात. केवळ माहिती मिळण्याऐवजी विद्यार्थी त्या माहितीचा अर्थ समजून घेत इतरांनाही चर्चा करण्यास प्रेरित होतो. त्यामुळे अध्यापनाची प्रक्रिया ही लेक्चर सारखी एकांगी न राहता समस्या केंद्रित, सहभागात्मक व अनुभवात्मक होते.
या सिद्धांतानुसार शिकणे म्हणजे केवळ नवीन ज्ञान मिळवणे नव्हे. खरं तर, व्यक्तीची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी व्यक्तीच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये प्राथमिक भूमिका बजावत असते. या प्रक्रियेचे यश हे विविध व्यक्तींमधीले संभाषण, संवाद आणि चर्चा यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. विध्यार्थी यामध्ये कितपत समरस होतात हेसुद्धा महत्वाचे आहे. विद्यार्थी हे इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी होणाऱ्या संवादातून शिकत असतात. हा सिद्धांत शिक्षकांना वर्गामध्ये संभाषण घडवून आणण्यासाठी प्रेरित करतो.
अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की हे ज्ञानवृद्धी आणि कौशल्यांच्या विकासासाठी वर्गामध्ये विद्यार्थ्यांची होणारी चर्चा महत्वाची भूमिका बजावते. हे अभ्यास सामाजिक रचनावादाच्या सिद्धांताला समर्थन देतात. उदाहरणार्थ, वर्गातील गटचर्चेत भाग घेतल्याने विद्यार्थ्यांना चर्चेच्या विषयाची चांगली ओळख होते, तसेच त्यांच्या ज्ञानाचे हस्तांतरन करता येते आणि त्यांचे संभाषण कौशल्य विकसित होते.
रचनावाद अध्ययन व अध्यापन प्रक्रियेला पुढील प्रमाणे साध्य करतो –
रचनावाद हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याच्या दिशेने एक परस्परपूरक दृष्टीकोन आहे.
सामाजिक रचनावादी प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व ओळखणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. यामध्ये ‘झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट’ असे एक क्षेत्र आहे जिथे विद्यार्थ्याच्या कौशल्यांना आव्हान तर दिले जाते, पण ते भारावून जाणार नाहीत याची काळजी घेतल्या जाते. विद्यार्थी कुठलाही ताण न घेता त्यांच्या अनुभवातून काहीतरी नवीन शिकू शकतात.
म्हणजेच विद्यार्थ्याला आधीपासूनच माहित असलेल्या गोष्टींपासून अध्यापन सुरू करून नंतर त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणारी नवी संरचना तयार करता येऊ शकते.
सामाजिक रचनावादामध्ये, विद्यार्थ्यांनी संवादातून व्यक्त होणे शिकायला हवे. संकल्पनांचा व्यक्तिनिष्ठ संबंध निर्माण करून घेत त्यांना संभाषणाचा अर्थ समजून घेता यावा यासाठीच विद्यार्थ्यांना संसाधनांच्या मदतीने अश्या प्रक्रारे आव्हान द्यावे लागते जे ते बहुधा स्वतः पूर्ण करू शकणार नाहीत परंतु, थोड्याफार मदतीसह त्यांना ते यशस्वीरित्या पूर्ण करता येईल. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारी विविध संज्ञांची समज व त्यांचे अनुभव त्यांना नवीन माहितीचे आकलन होऊन ती माहिती समजून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. विद्यार्थ्यांना अशी आव्हाने देताना या लहान मोठ्या अंतर्गत घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञान आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत निर्मिती व नव-निर्मिती निरंतर सुरु असते. अश्या वातावरणात शिकणारे विद्यार्थी हे खरंतर एका शिकण्यास उत्सुक अश्या समुदायाचा भाग असतात. शिक्षक शिकण्याच्या प्रक्रियेला सतत भक्कम आधार देत असतात. त्यामुळे सामाजिक रचनावादी वातावरणात शिकणे हे ज्ञान आत्मसात करणे, विविध कौशल्यांचा विकास होण्यासोबतच निर्णय क्षमता व संघटित होण्यास मदत करते.
Embibe प्रॉडक्ट/वैशिष्ट्ये: तात्काळ शंका निराकरण, पेरेंट अॅप, JioMeet सह टीचर अॅप
Embibe आपल्या ‘शंकांचे लाईव्ह निरसन’ याच्या माध्यमातून सामाजिक रचनावादावर भर देते. विद्यार्थ्यांना 24X7 शैक्षणिक चॅट द्वारे साहाय्य देत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यास मदत करते. Embibe स्टुडंट अॅप व्यतिरिक्त, आमच्याकडे पेरेंट अॅप आणि एक टीचर अॅप देखील आहे जे शैक्षणिक व्यवस्थेतील तिन्ही महत्वाच्या घटकांना एका सामान सूत्रात बांधतात. या अॅप्सवर शिक्षक आणि पालक बारकाईने निरीक्षण करू शकतात आणि विद्यार्थ्यांना बक्षीस देऊ शकतात. जिओ मीटद्वारे, आम्ही पालक आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक संवाद निर्माण करतो. यामुळे मुलांचे शैक्षणिक ज्ञान आणि कौशल्ये, त्यांची सामाजिक आणि भावनिक जडणघडण परिणामकारकपणे होते. जेव्हा पालक आणि शिक्षक एकत्रितरित्या काम करतात, तेव्हा मुले वर्गासाठीच नव्हे तर आयुष्यासाठी सक्षम होतात.