• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट)

img-icon

परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट): राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Maharashtra Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट (SSC Exam 2022 Hall Ticket) विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी महत्त्वाचे असते. हे हॉल तिकीट शाळा मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून www.mahahsscboard.in येथून शाळेच्या लॉग इन मधून डाऊनलोड करू शकतात. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Embibe वरील हा ब्लॉग वाचा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेविषयी:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या नऊ विभागांच्या अंतर्गत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड डिसेंबर 2022 (अंदाजे) मध्ये 2022-23 च्या परीक्षेची सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.

या परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरणे अनिवार्य असते. जे विद्यार्थी मंडळातर्फे दिलेल्या मुदतीमध्ये सशुल्क अर्ज भरतात तेच विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरतात. जे विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरलेले आहेत त्यांना परीक्षेच्या (अंदाजे) दोन महिने आधी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) देण्यात येते. प्रवेशपत्र हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असून, प्रवेशपत्राशिवाय परीक्षा वर्गामध्ये प्रवेश मिळत नाही. SSC परीक्षेकरिता प्रवेशपत्र हे ओळखपत्राप्रमाणे कार्य करते. तथापि, परीक्षेच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपले प्रवेशपत्र आपल्या सोबत बाळगणे अतिशय गरजेचे असते.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 प्रवेशपत्राचा आढावा:

खालील तक्त्त्यात इयत्ता 10 वी चे प्रवेशपत्र (Hall Ticket) कधी मिळेल तसेच त्यासंबंधीची संपूर्ण माहिती दिली आहे.

बोर्डचे नाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
इयत्ता इयत्ता 10 वी/ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल
अर्ज भरण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल
प्रवेशपत्र मिळण्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल
शैक्षणिक वर्ष 2023
अधिकृत वेबसाइट http://www.mahahsscboard.in

इयत्ता दहावीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) डाऊनलोड कसे  करावे?

विद्यार्थी प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर शाळांमार्फत किंवा वैयक्तिकरित्या, संबंधित यूजरनेम आणि पासवर्ड देऊन  डाऊनलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रवेशपत्र परीक्षेच्या (अंदाजे) दोन महिने आधी उपलब्ध  होते. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याच्या पायर्‍या खालीलप्रमाणे आहेत: 

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://www.mahahsscboard.in/
  2. SSC परीक्षा निवडा.
  3. नवीन विंडो उघडेल.
  4. आपले यूजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
  5. आवश्यक असणारा तपशील प्रविष्ट करा.
  6.  तपशील प्रविष्ट केलेल्या विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र आपल्या स्क्रिनवर दिसेल.
  7. ‘डाऊनलोड’ या पर्यायावर क्लिक करा.
  8. प्रवेशपत्र डाऊनलोड करून सेव्ह करा.
  9. सेव्ह केलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट आऊट काढा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या प्रवेशपत्रावर नमूद असलेला तपशील :

आपल्याला मिळालेल्या प्रवेशपत्रावरील तपशील काळजीपूर्वक तपासून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या प्रवेशपत्रावर जो तपशील दिलेला असेल तोच तपशील, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येतो. जर काही कारणाने प्रवेशपत्रावरील तपशील चुकीचा असल्यास त्वरित आपल्या शिक्षकांमार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा. 

प्रवेशपत्रावर नमूद असलेला तपशील पुढीलप्रमाणे :

  1. विद्यार्थ्याचे नाव
  2. आईचे/वडीलांचे नाव
  3. इयत्ता 
  4. परीक्षेचे नाव 
  5. परीक्षेची तारीख
  6. विषयांची नावे आणि त्याचे सांकेतिक क्रमांक  
  7. आसन क्रमांक
  8. परीक्षेची वेळ 
  9. परीक्षा केंद्राचा कोड
  10. परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता
  11. परीक्षेकरिता आवश्यक त्या सूचना   
  12. बोर्डचे नाव 
  13. विद्यार्थ्याची स्वाक्षरी
  14. विद्यार्थ्याचे छायाचित्र/ फोटो 
  15. विद्यार्थ्याची जन्म तारीख

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- परीक्षेच्या दिवसाकरिता सूचना :

परीक्षेच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून SSC परीक्षा प्रवेशपत्राच्या मागे दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे पालन करा. 

प्रवेशपत्रावरील सूचनांवर एक नजर टाकूया:

  1. विद्यार्थ्यांकडे परीक्षेच्या दिवशी महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा 2023 चे प्रवेशपत्र असणे अनिवार्य आहे, या प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेस पात्र ठरविता येणार नाही. 
  1. विशेष बाबींची नोंद घ्यावी : प्रवेश पत्रावर नमूद केलेले आपले नाव, बैठक/आसन क्रमांक, परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचे नाव आणि क्रमांक तपासून घ्यावे. विद्यार्थ्यास जर आपल्या नावामध्ये, बैठक/आसन क्रमांकामध्ये किंवा अन्य बाबींमध्ये काही चूक आढळल्यास त्वरित आपल्या शिक्षकांशी संपर्क साधून, प्रवेशपत्रावर आवश्यक असणारे बदल करून घ्यावेत. बैठक/आसन व्यवस्था ही परीक्षा केंद्रावर बैठक/आसन क्रमांकांनुसार जाहीर केली जाते. 
  1. परीक्षेच्या वेळा पाळा: ऐन वेळेस होणारी धावपळ टाळण्यासाठी, आपण परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या मूळ वेळेपेक्षा अर्धा तास पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे परीक्षेची निर्धारित वेळ पूर्ण होईपर्यंत आपल्याला परीक्षा केंद्राच्या बाहेर पडता येणार नाही याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे. परीक्षेची वेळ सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यास मनाई असते. म्हणूनच आपले कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळा काटेकोरपणे पाळण्याची शिफारस केली जाते.
  1. प्रवेशपत्राबाबत: विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी असलेले प्रवेशपत्र, शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत पुरविले जाते. म्हणून या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना वेगळा स्वतःचा फोटो लावण्याची आवश्यकता नाही. 
  1. महत्त्वाच्या सूचना: वर्गावरील पर्यवेक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परीक्षावर्गामध्ये कोणतीही पुस्तके, वही, मोबाईल फोन, नोट्स, कॅल्क्युलेटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणण्यास परवानगी नसते. जे विद्यार्थी कॉपी करताना किंवा दुसर्‍या विद्यार्थ्याची मदत घेताना दिसून येतील त्यांना परीक्षेस अपात्र ठरविण्यात येईल.
  1. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरील आपला बैठक/आसन क्रमांक आणि अन्य महत्त्वाची माहिती ही काळजीपूर्वक लिहावी. विद्यार्थ्याची स्वाक्षरी नसलेली उत्तरपत्रिका ही तपासली जात नाही. आपण आपली सर्व माहिती योग्यप्रकारे भरली आहे याची विद्यार्थ्यांनी खात्री करून घेणे गरजेचे आहे. 
  1. काळ्या किंवा निळ्या पेनने लिहिलेली उत्तरेच ग्राह्य धरली जातात.
  1. उत्तरपत्रिकेची हाताळणी: उत्तपत्रिका या परीक्षाकेंद्रामधून मशिनद्वारे विभाजित केल्या जातात. जर आपली उत्तरपत्रिका मळलेली, मुडपलेली, चुरगाळलेली किंवा गुंडाळलेली असेल तर कदाचित आपली उत्तरपत्रिका मशिनद्वारे तपासली न जाण्याची शक्यता असते. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या परीक्षाकक्षामध्ये देण्यात येते. परीक्षेची वेळ संपल्यानंतर आपण आपली उत्तरपत्रिका पर्यवेक्षकास सोपविणे गरजेचे असते. 
  1. विद्यार्थ्यांना SSC परीक्षेचा अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो, किमान परीक्षेच्या एक महिना पूर्वी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पूर्ण करावा. जेणेकरून मुख्य परीक्षेकरिता उजळणीस पुरेसा वेळ मिळेल. 
  1. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तपासण्यास अतिरिक्त 15 मिनिटे वेळ दिला जाईल, ज्यामध्ये ते प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन, उत्तर लेखनाचा विचार करू शकतात आणि इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करू शकतात.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 प्रवेशपत्र – वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी परीक्षेचे प्रवेशपत्र केव्हा मिळेल?

उत्तर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC परीक्षेच्या प्रवेशपत्राचे वितरण हे परीक्षेच्या (अंदाजे) दोन महिने पूर्वी करण्यात येते. 

प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी परीक्षेचे हॉलतिकीट कोठून डाऊनलोड करता येईल?

उत्तर. महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवरून आपण आपले हॉलतिकीट डाऊनलोड करू शकता. अधिकृत वेबसाइट: https://www.mahahsscboard.in/

प्र 3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी परीक्षेच्या माझ्या प्रवेशपत्रामध्ये काही त्रुटी आहेत. अशा वेळेस मी काय करावे?

उत्तर. जर आपल्या प्रवेशपत्रामध्ये काही त्रुटी किंवा चुक असल्यास, त्या विद्यार्थ्याने ही बाब आपल्या शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावी.

प्र 4. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रवेशपत्र केव्हा मिळेल?

उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर सूचना आल्यावर उपलब्ध होईल. 

प्र 5. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा कधी सुरू होईल?

उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यार येईल. परंतु दरवर्षी ही परीक्षा मार्च महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येते. 

प्र 6. बोर्ड परीक्षेच्या प्रवेशपत्रावर कोणती माहिती उपलब्ध असते?

उत्तर. विद्यार्थ्याचे नाव, बैठक/ आसन क्रमांक, परीक्षाकेंद्राचे नाव, परीक्षेची तारीख, परीक्षेची वेळ इत्यादी महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश बोर्ड परीक्षेच्या प्रवेशपत्रावर करण्यात येतो.

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023: परीक्षेचे प्रवेशपत्र” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता मदतशील ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा