
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेची पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी काही पात्रता निकष संबंधित विभागीय मंडळांमार्फत ठरवून देण्यात आले आहेत. Embibe वरील या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेच्या पात्रता अटींबद्दल जाणून घ्याल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या नऊ विभागांच्या अंतर्गत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये 2022-23 च्या परीक्षेच्या सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा ही इयत्ता 10 वी आणि 12 वी करीता असते. ज्या पद्धतीने प्रत्येक परीक्षेस काही ठरावीक पात्रतेच्या अटी असतात त्याच प्रमाणे या परीक्षेकरिता देखील शिक्षण मंडळाने काही पात्रता अटी सांगितल्या आहेत. इयत्ता 10 वी च्या परीक्षेस पात्र असलेले विद्यार्थीच परीक्षेचा नोंदणी अर्ज सादर करू शकतात. वैयक्तिक विद्यार्थ्याची परीक्षेस बसण्याची किती पात्रता आहे, हे संबंधित शाळेतील शिक्षक ठरवू शकतात. जर एखादा विद्यार्थी दिलेल्या अटी पूर्ण करू शकत नसेल तर संबंधित शाळेचे शिक्षक त्या विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज भरण्यापासून रोखू शकतात.
इयत्ता 10 वी करीता शिक्षण मंडळाने पात्रतेच्या काही अटी नमूद केलेल्या आहेत.
त्या अटी पुढीलप्रमाणे आहेत:
जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डच्या SSC परीक्षेला बसणार आहेत, त्यांनी इयत्ता 10 वी चा नोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच हे लक्षात ठेवले पाहिजे की, बोर्डच्या अधिकार्यांनी निर्दिष्ट केलेल्या अंतिम तारखेस किंवा त्यापूर्वी हा अर्ज योग्य अधिकार्यांकडून प्राप्त करावा. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच 2023 च्या SSC च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करणार आहे. बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवर, अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या जातील. अंतिम तारखेनंतर नोंदणी अर्ज दाखल करणार्या अर्जदाराला अर्जाच्या शुल्का व्यतिरिक्त विलंब शुल्क भरावे लागेल.
नवीन अपडेटनुसार, खाजगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 ची ऑनलाइन नोंदणी लवकरच सुरू होईल. परीक्षा देण्यासाठी, खाजगी विद्यार्थ्यांनी अर्ज क्रमांक 17 भरणे आवश्यक असते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना मंडळाने निश्चित केलेले शुल्क (नोंदणी आणि प्रक्रिया शुल्क) भरावे लागेल. तसेच जर दिलेल्या मुदतीनंतर अर्ज भरल्यास विलंब शुल्क भरून आपला अर्ज दाखल करावा लागेल याव्यतिरिक्त, विद्यार्थी ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी http://form17.mh-hsc.ac.in/ ला भेट देऊ शकतात.
परीक्षेचे नाव | माध्यमिक शालान्त परीक्षा |
---|---|
वयोमर्यादा | किमान 15 वर्षे |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm |
विद्यार्थ्यांनी बोर्डने निर्दिष्ट केलेल्या अंतिम तारखेपर्यंत SSC साठी अर्ज दाखल केले पाहिजेत. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी खालील सर्व कागदपत्रे/माहिती तयार ठेवावी. विद्यार्थ्यांनी अर्जावरील सर्व तपशील काळजीपूर्वक भरले पाहिजेत, जेणेकरून अंतिम अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही. अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
टीप: पुढील संपर्कासाठी ईमेल आयडी आणि फोन नंबर देणे आवश्यक आहे. अर्ज दाखल केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर अर्ज सबमिट झाल्याचे पुष्टीकरण करणारा ईमेल प्राप्त होईल.
महाराष्ट्र बोर्डची SSC परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे. अर्ज उपलब्ध झाल्यानंतर, तो डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक पायऱ्यांचे काळजीपूर्वक अनुसरण केले पाहिजे:
पायरी 1: “महाराष्ट्र बोर्ड” यांच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
पायरी 2: होम पेजवर, “नवीनतम सूचना” विभागाअंतर्गत असलेल्या “SSC मार्च-2023 रिक्त अर्ज” या लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: रिक्त अर्ज PDF असलेली नवीन विंडो उघडेल.
पायरी 4: रिक्त अर्जाची प्रिंट काढा.
पायरी 5: महत्त्वाच्या सूचना वाचून झाल्यानंतर काळजीपूर्वक अर्ज भरा.
पायरी 6: अर्ज व्यवस्थितपणे पूर्ण भरल्यानंतर, विद्यार्थ्याचा फोटो लावा आणि “मी नियम आणि बोर्डने वेळोवेळी प्रसारित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याची सहमती देत आहे.” या विधानास संमती दर्शवून रेकॉर्डवर स्वाक्षरी करा.
महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेच्या नोंदणी अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या तपशीलामध्ये चुका होऊ नयेत यासाठी अर्ज काळजीपूर्वक भरला पाहिजे.
इयत्ता दहावीच्या नोंदणी अर्जामध्ये खालील माहिती प्रविष्ट केली पाहिजे:
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड SSC इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान किती गुणांची आवश्यकता आहे?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड SSC इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान 35% गुणांची आवश्यकता आहे.
प्र 2. इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी वयाची अट किती आहे?
उत्तर. या परीक्षेकरिता नोंदणी करणारी व्यक्ती ही किमान 15 वर्षांची असणे आवश्यक आहे.
प्र 3. परीक्षेचा अर्ज रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेकरिता भरलेला अर्ज रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास देण्यात आलेला आहे.
प्र 4. मी अर्ज क्रमांक 17 कोणते विद्यार्थी भरू शकतात?
उत्तर. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणाने निश्चित वेळेमध्ये परीक्षा देता आलेली नाही, ते विद्यार्थी फॉर्म 17 भरून कोणत्याही वर्षी परीक्षेस पात्र ठरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव इयत्ता 8 वी किंवा 9 वी मध्ये शाळा सोडली आहे, असे विद्यार्थी देखील शाळेची मदत न घेता या परीक्षेकरिता नोंदणी करू शकतात.
प्र 5. इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी पात्रता अटी कोणत्या आहेत?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेस पात्र ठरण्याकरिता, विद्यार्थ्यांची इयत्ता 9 वी मध्ये किमान 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे. काही वैद्यकीय कारणांमुळे किंवा अन्य काही खाजगी कारणांमुळे जर विद्यार्थ्यांची उपस्थिती 75% होत नसेल तर त्यांनी आपल्या शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेची पात्रता” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता मदतशील ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.