• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षा केंद्रे

img-icon

इयत्ता दहावी परीक्षेविषयी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ही एक स्वयंशासित संस्था आहे, जी  महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम क्रमांक 41, 1965 अंतर्गत तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत कार्य करते. या बोर्डद्वारे अभ्यासक्रम, नोंदणी अर्ज, परीक्षेचे प्रवेशपत्र व संबंधित परीक्षा केंद्रे या विषयीची माहिती आणि प्रत्येक सत्राच्या सुरुवातीस जून महिन्यामध्ये निकाल प्रकाशित केला जातो.

या परीक्षेसंबंधीचे काही ठळक मुद्दे खाली नमूद केले आहेत:

ठळक मुद्दे तपशील
परीक्षेचे पूर्ण नाव माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा
परीक्षेचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षा
परीक्षेचे आयोजन करणारी संस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षेची वारंवारता वर्षातून दोन वेळा
परीक्षेचा स्तर मॅट्रिकोत्तर
परीक्षेचा कालावधी 3 तास
अधिकृत वेबसाइट http://Mahahsscboard.in

परीक्षा केंद्राबद्दल प्राथमिक माहिती:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10 वी आणि 12 वी करीता ही परीक्षा घेण्यात येते.  ही परीक्षा राज्य स्तरावर होत असल्याकारणाने या परीक्षेकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिन असणाऱ्या नऊ विभागांतर्गत विशिष्ट देखरेखी खाली परीक्षा केंद्रे निश्चित केली जातात. या परीक्षा केंद्रांना शिक्षण मंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. परीक्षा केंद्रांमध्ये खाजगी, शासकीय आणि निमशासकीय या सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश होतो.

परीक्षा केंद्राचा तपशील: 

  • आपल्या परीक्षेचे केंद्र हे आपल्या प्रवेशपत्रावर (हॉल तिकिट) लिहिलेले असते. 
  • परीक्षा केंद्रे ही शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शालेय शिक्षण विभागामार्फत निश्चित केली जातात. 
  • महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत अंदाजे 21,000 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांचा समावेश होतो. 

परीक्षा केंद्रांनी पाळावयाचे नियम:

  • विद्यार्थ्यांना 40 ते 60 गुणांच्या परीक्षेस 15 मिनिटे तर 70 ते 100 गुणांच्या परीक्षेस 30 मिनिटे अतिरिक्त कालावधी देण्यात यावा.
  • विद्यार्थ्यांच्या शारीरिक काळजी करीता, प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रथमोपचाराची विशेष खोली आणि एक वैद्यकीय तज्ञ असणे आवश्यक आहे. 
  • एका वर्गामध्ये 25 विद्यार्थ्यांची सोय होणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांनी जर काही गैरवर्तन केल्यास, त्यावर शिक्षण मंडळाच्या नियमांप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी.
  • ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीमध्ये कोवीड-19 झाला असेल, अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा देखील घेण्यात येऊ शकते.

विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक: 

जे विद्यार्थी 2022-2023 या वर्षाकरिता महाराष्ट्र बोर्डची 10 वी ची परीक्षा देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी आपला बैठक क्र. जाणून घेणे महत्त्वाचे आहे.  शाळेकडून आपल्याला मिळालेल्या प्रवेशपत्रावर (हॉल तिकिटवर) आपला परीक्षेचा बैठक क्र. नमूद केलेला असतो. या परीक्षेस विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा बैठक क्रमांकाप्रमाणेच बसविणे आवश्यक असते. परीणामी आपला बैठक क्र. कोणत्या परीक्षा केंद्रावर आहे आणि  त्या केंद्रामधील कोणत्या वर्गात आहे हे परीक्षेपूर्वी पाहून ठेवणे गरजेचे असते. यामुळे परीक्षेच्या दिवशी आपला अधिक वेळ बैठक क्रमांक शोधण्यात वाया जाणार नाही याची खात्री करून घ्या. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी ची परीक्षा ही अंदाजे मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात येते. जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अंदाजे 1 महिन्यापूर्वी त्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकिट) मिळते. प्रवेशपत्रावर महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली असते, जसे की, बैठक क्रमांक, परीक्षा केंद्र क्रमांक, परीक्षेची तारीख, परीक्षा द्यावयाच्या विषयांची नावे इत्यादी.

परीक्षा संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
परीक्षेचे नाव माध्यमिक शालान्त परीक्षा
विभाग बैठक व्यवस्था
परीक्षेची तारीख ऑक्टोबर 2022 (अंदाजे)
परीक्षेचा कालावधी मार्च-एप्रिल 2023 (अंदाजे)
अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm

टीप : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी करीता अद्याप बैठक क्रमांकांची तसेच परीक्षा केंद्रांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून लवकरात लवकर याबद्दल पुढील माहिती आमच्या ब्लॉगद्वारे आपल्यापर्यंत पोहोचविली जाईल.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी – वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

प्र 1. मला माझे परीक्षा केंद्र कोणते आहे हे कसे समजेल?

उत्तर. आपल्या प्रवेशपत्रावर (हॉल तिकिटवर) परीक्षा केंद्राचा क्रमांक तसेच त्याचे नाव आणि पत्ता नमूद केलेला असतो.

प्र 2. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर किती वेळापूर्वी पोहोचणे अपेक्षित आहे?

उत्तर. आयत्या वेळी होणारा गोंधळ टाळण्याकरिता, परीक्षेच्या वेळेच्या 30 मिनिटापूर्वी आपण परीक्षा केंद्रावर पोहोचावे.

प्र 3. परीक्षा केंद्रावर काही अडचण आल्यास कोणाशी बोलावे?

उत्तर. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी किंवा परीक्षा अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.   

प्र 4. माझी शाळाच माझे मुख्य परीक्षा केंद्र असू शकते का?

उत्तर. बैठक/आसन व्यवस्था ही शिक्षण मंडळाद्वारे करण्यात येते,  परिणामी सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्याच शाळेमध्ये करणे शक्य नसते. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांची बैठक/आसन क्रमांक त्यांच्याच शाळेत शाळेत येईल असे नाही.

प्र 5. परीक्षा केंद्रावर कोणत्या सोयी उपलब्ध असतात?

उत्तर. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था त्याच प्माणे किमान प्रथमोपचाराची सोय करणे अनिवार्य असते. 

काय करावे काय करू नये

  • परीक्षेच्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी.
  • आपले परीक्षा केंद्र कोणते आहे हे तपासून घेतली पाहिजे.
  • आपण प्राप्त केलेल्या माहितीची पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे.
  • आपल्याला मिळालेल्या हॉलतिकिट शिवाय परीक्षाकेंद्रावर प्रवेश करू नये.
  • परीक्षा सुरू होण्याआधी म्हणजेच किमान 15 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर या.
  • परीक्षा केंद्रावरील आपली बैठक व्यवस्था निश्चित करून घ्या.

 काय करू नये

  • परीक्षा केंद्रावर कोणताही गैरव्यवहार करू नये.
  • परीक्षा केंद्रावर नेमून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
  • परीक्षा केंद्रावर उशीरा पोहोचू नये.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षा केंद्राशी संबंधित ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी Embibe सोबत संपर्कात रहा. आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षा केंद्राशी संबंधित हा ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला आहे. अशा आणखी कॉन्टेंटसाठी Embibe सोबत संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा