
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी ची परीक्षा हा प्रत्येकाकरिता एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा ही अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधी घेण्यात येईल. विद्यार्थी आपल्या शालेय कालावधीमध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेची तयारी करत असतात. बोर्डची परीक्षा देताना केवळ अभ्यासाकडेच लक्ष देऊन चालत नाही तर, परीक्षेच्या तारखांची (Exam Dates) देखील नोंद घ्यावी लागते.
यातील एखादे कार्य योग्य वेळेमध्ये झाले नाही तरी देखील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेस मुकावे लागू शकते. म्हणून शाळांनी, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी देखील सर्व तारखांचे पालन हे काटेकोरपणे केले पाहिजे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ही एक स्वयंशासित संस्था आहे. ही संस्था इयत्ता 10 वी तसेच इयत्ता 12 वी च्या परीक्षांचे नियोजन करणे, अभ्यासक्रम तयार करणे आणि राज्य शिक्षण व्यवस्थेचे व्यवस्थापन करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडते. इयत्ता 10 वी ची परीक्षा या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत घेण्यात येते.
प्रत्येक विषयाकरिता 100 गुण दिले जातात त्यापैकी 80 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत स्वाध्यायासाठी दिले जातात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अंदाजे ऑक्टोबर 2022 च्या तिसर्या आठवड्यामध्ये 2023 मधील बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्ड SSC ची मुख्य परीक्षा ही अंदाजे मार्च ते एप्रिल 2023 या कालावधीत होणे अपेक्षित आहे. या परीक्षेचे वेळापत्रक, शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.
शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट – https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये, सर्व विषयांच्या पेपरची तारीख तसेच, त्यासाठी निश्चित केलेला वेळ, त्याच सोबत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी पाळावयाचे काही नियम यांची माहिती देखील दिलेली असते. तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक हे संबंधित शाळांमार्फत निश्चित केले जाते.
मुख्य परीक्षेचे वेळापत्रक येईल तोपर्यंत, विद्यार्थ्यांनी आपला सर्व अभ्यासक्रम संपविणे अपेक्षित असते. शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित, मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. घेतलेल्या परीक्षांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना किमान गुण मिळालेले नाही तसेच, जे विद्यार्थी त्यांना मिळालेल्या गुणांवर समाधानी नाहीत ते विद्यार्थी पुरवणी परीक्षा देऊ शकतात. पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक देखील शिक्षण मंडळा मार्फत अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या महत्त्वाच्या तारखांबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता या लेखातील पुढील माहिती वाचा.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा ही मार्च आणि जुलै या दोन सत्रांमध्ये घेतली जाते. जुलै महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुरवणी परीक्षा म्हणून ओळखली जाते. जे विद्यार्थी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील किंवा काही कारणास्तव ते ही परीक्षा देऊ शकणार नाही असे सर्व विद्यार्थी जुलै 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेला बसू शकतात.
खालील तक्त्त्यात मार्च 2023 मुख्य परीक्षेच्या संबंधित महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत.
बोर्डचे नाव | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
---|---|
परीक्षेचे नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र |
वेळापत्रक जाहीर होण्याची तारीख | ऑक्टोबर 2022 चा तिसरा आठवडा (अंदाजे) |
परीक्षेची तारीख | मार्च-एप्रिल 2023 (अंदाजे) |
निकालाची तारीख | जून 2023 (अंदाजे) |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm |
खालील तक्त्त्यात जुलै 2023 पुरवणी परीक्षेच्या संबंधित महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत.
बोर्डचे नाव | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
---|---|
परीक्षेचे नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र |
वेळापत्रक जाहीर होण्याची तारीख | जून 2023 चा तिसरा आठवडा (अंदाजे) |
परीक्षेची तारीख | जुलै-ऑगस्ट 2023 (अंदाजे) |
निकालाची तारीख | ऑगस्ट 2023 (अंदाजे) |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- परीक्षेचे वेळापत्रक कसे डाऊनलोड करावे?
महाराष्ट्र बोर्डची इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक (timetable) हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येते. https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm या लिंकवर क्लिक करून आपण वेळापत्रकाची PDF डाऊनलोड करू शकता. पुढील स्टेप्सचे अनुपालन करून विद्यार्थी इयत्ता 10 वी च्या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता:
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023: परीक्षेच्या वेळापत्रकावर नमुद केलेल्या सूचना
पुढील सूचना या महाराष्ट्र SSC परीक्षा 2023 च्या वेळापत्रकावर नमुद केलेल्या असतात
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023: परीक्षेत पालन करावयाच्या सूचना
पुढे काही सामान्य सूचना दिलेल्या आहेत, ज्याचे पालन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी करणे आवश्यक आहे :
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक|Exam Time Table हे शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करण्यात येईल. तथापि मागील वर्षाच्या वेळापत्रकाच्या आधारे आम्ही महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चे अंदाजे वेळापत्रक तयार केलेले आहे.
पुढे दिलेले वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन योग्य वेळेमध्ये सुरू केले पाहिजे:
परीक्षेची तारीख | विषय |
---|---|
मार्च 2023 | प्रथम भाषा |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा (संयुक्त) |
मार्च 2023 | प्रथम किंवा तृतीय भाषा |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा (संयुक्त) |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा |
मार्च 2023 | गणित भाग- 1 बीजगणित |
मार्च 2023 | गणित भाग- 2 भूमिती |
मार्च 2023 | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- 1 |
मार्च 2023 | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग- 2 |
एप्रिल 2023 | समाजशास्त्र भाग – 1 – इतिहास-नागरीकशास्त्र |
एप्रिल 2023 | समाजशास्त्र भाग – 2 – भूगोल-अर्थशास्त्र |
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड केल्यानंतर मी काय करावे?
उत्तर. जाहीर झालेले वेळापत्रक डाऊनलोड करा आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करा.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा 2023 चा टाइम टेबल मी कुठून डाऊनलोड करू?
उत्तर. विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मुख्य परीक्षेचा टाइम टेबल डाऊनलोड करू शकता.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या प्रात्यक्षिक परीक्षांकरिता वेगळे वेळापत्रक असते का?
उत्तर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता 10 वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता वेळापत्रक जाहीर करत नाही. प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा या शाळांद्वारे जाहीर केल्या जातात.
प्र 4. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा कधी सुरू होईल?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. परंतु दरवर्षी ही परीक्षा मार्च महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येते.
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- परीक्षेच्या तारखा” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता मदतशील ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.