
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा नोंदणी अर्ज
August 9, 2022महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप : दरवर्षी राज्यभरातून लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांनी तयारीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना प्रत्येक विषयाच्या नवीन परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक असते. परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्ड वर्ग 10 च्या परीक्षेची धोरणात्मक पद्धतीने तयारी करण्यास मदत करतो. या ब्लॉग मध्ये आपण Embibe च्या तज्ञांकडून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ठळक मुद्दे | तपशील |
---|---|
परीक्षेचे पूर्ण नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा |
परीक्षेचे संक्षिप्त नाव | महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षा |
परीक्षेचे आयोजन करणारी संस्था | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे |
परीक्षेची वारंवारता | वर्षातून दोन वेळा |
परीक्षेचा कालावधी | 3 तास |
अधिकृत वेबसाइट | http://Mahahsscboard.in |
त्याचप्रमाणे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना हे समजून घेण्यास मदत करतो की ते कोणते विषय शिकत आहेत व शिक्षक देखील वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिकवणुकी संबंधित नियोजन तयार करू शकतात. 2022-23 या सत्राकरिता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाच्या PDF खालील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत:
विषयाचे नाव | PDF लिंक |
---|---|
हिंदी (द्वितीय व तृतीय) – भाषा | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
सामान्य गणित | येथे क्लिक करा |
विज्ञान | येथे क्लिक करा |
सामाजिक शास्त्रे | येथे क्लिक करा |
इंग्रजी | येथे क्लिक करा |
हिंदी 1 – भाषा | येथे क्लिक करा |
भाषा विषयांकरिता बोर्डद्वारे काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन गुणांचे वितरण केले जाते ते खालीलप्रमाणे आहे.
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
वाचन कौशल्य (पाठ्यपुस्तकावर आधारित व त्याव्यतिरिक्त) | 40% |
व्याकरण | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीच्या गणित विषयाचे बीजगणित आणि भूमिती अशा दोन विषयांमध्ये विभाजन केले आहे.
1. या विषयाच्या पेपर करीता एकूण 100 गुण असतात.
2. या दोन्ही विषयांना प्रत्येकी 40 लेखी परीक्षेकरिता आणि 20 गुण अंतर्गत स्वाध्यायाकरिता निश्चित केलेले असतात.
3. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 गुण मिळवणे आवश्यक असते.
बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आणि प्रश्नांची संख्या सारखीच असते. खालील तक्ता गुणांनुसार प्रश्नांची संख्या दर्शवितो.
गुणांनुसार प्रश्नांचे प्रकार | एकूण प्रश्नांची संख्या | प्रश्नांसाठीचे गुण |
---|---|---|
एक गुण असलेले प्रश्न | 5 | 5 |
दोन गुण असलेले प्रश्न | 4 | 8 |
तीन गुण असलेले प्रश्न | 3 | 9 |
चार गुण असलेले प्रश्न | 2 | 8 |
पाच गुण असलेले प्रश्न | 2 | 10 |
एकूण गुण | 40 |
महाराष्ट्र बोर्ड SSC चा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पेपर एकूण 100 गुणांचा असतो. लेखी परीक्षा 80 गुणांची असते आणि उर्वरित 20 गुण प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा/प्रकल्प यासाठी दिले जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे पेपर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-1 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 अशा दोन भागात विभागले जातात. दोन्ही पेपर प्रत्येकी 40 गुणांचे असतात.
प्रश्नपत्रिकेमधील गुणांची विभागणी खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे असते.
गुणांनुसार प्रश्नांचे प्रकार | एकूण प्रश्नांची संख्या | प्रश्नांसाठीचे गुण |
---|---|---|
एक गुण असलेले प्रश्न | 10 | 10 |
दोन गुण असलेले प्रश्न | 5 | 10 |
तीन गुण असलेले प्रश्न | 5 | 15 |
पाच गुण असलेले प्रश्न | 1 | 5 |
एकूण गुण | 40 |
सामाजिक शास्त्र विषयाचा पेपर एकूण 100 गुणांसाठी घेतला जातो ज्यामध्ये लेखी परीक्षेसाठी 80 गुण आणि प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा/प्रकल्प यासाठी 20 गुण असतात. सामाजिक शास्त्र विषयाचे दोन मुख्य पेपर होतील यामध्ये-
भाग अ: इतिहास आणि राज्यशास्त्र
भाग ब: भूगोल आणि अर्थशास्त्र
भाग अ आणि भाग ब दोन्हीसाठी लेखी परीक्षा प्रत्येकी 40 गुणांची असते. भाग अ आणि भाग ब साठी प्रत्येकी 10 गुणांचे प्रात्यक्षिक/तोंडी परीक्षा/प्रकल्प असेल.
विषयाचे नाव | गुण |
---|---|
इतिहास | 28 |
नागरीकशास्त्र | 12 |
भूगोल | 28 |
अर्थशास्त्र | 12 |
एकूण गुण | 80 |
विषय | गुणांचे वितरण |
---|---|
भाषा विषय | 100 (80+ 20) |
इंग्रजी | 100 (80+ 20) |
गणित | 100 (80+ 20) |
विज्ञान | 100 (80+ 20) |
सामाजिक शास्त्र | 100 (80+ 20) |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10, 2023 या परीक्षेच्या तयारीसाठी दिलेल्या पुढील मूलभूत मुद्दे लक्षात ठेवून अभ्यासाची कार्यपद्धती तयार केली आहे:
नियमितपणा:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.
संपूर्ण तयारी:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्या धड्यांचे दररोज काटेकोरपणे सखोल मनन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रॅक्टिस:
प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे. धड्यांच्या नोट्स काढल्यामुळे तो विषय लवकर लक्षात राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे.
प्र 1. परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे का महत्त्वाचे आहे?
उत्तर. सर्व विषयांची परीक्षा ही समान गुणांकरिता घेतली जात नाही, परिणामी प्रत्येक विषयानुसार विचारल्या जाणार्या प्रश्नांचे स्वरूप बदलते. परीक्षेच्या स्वरूपानुसाार अभ्यासाचे नियोजन केल्यास विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरू शकते.
प्र 2. उत्तर लेखनाचा कालावधी कशाप्रकारे निश्चित करावा?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेकरिता दोन किंवा तीन तासांचा कालावधी हा निश्चित केलेला आहे. प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेल्या वेळेमध्ये लिहिणे आवश्यक असते. नमूना पेपर्सच्या सरावाने आपण दिलेल्या वेळेमध्ये उत्तर लेखनाची सवय लावू शकता.
प्र 3. विशेष प्रावीण्यासह पात्र ठरण्यासाठी मला किती टक्के मिळवावे लागतील?
उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.
प्र 4. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेचे वेळापत्रक कधी जाहीर होईल?
उत्तर. अद्याप महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा 2023 अंदाजे मार्च 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत घेण्यात येते.
प्र 5. इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?
उत्तर. इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये पुढील विषय समाविष्ट केलेले आहेत: इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र इत्यादी.
प्र 6. महाराष्ट्र बॉर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी मला कसा अभ्यास करावा लागेल?
उत्तर. महाराष्ट्र बॉर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. विद्यार्थ्यांनी प्रथम कॉन्सेप्ट्स स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र SSC परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी – काय करावे आणि काय करू नये
विद्यार्थ्यांनी खालील सूचनांचे पालन केले पाहिजे:
काय करावे:
काय करू नये
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षेचे स्वरूप 2023” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता मदतशील ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.