
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा : महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी ची परीक्षा हा प्रत्येकाकरिता एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा ही अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधी घेण्यात येईल. विद्यार्थी आपल्या शालेय कालावधीमध्ये पहिल्यांदाच अशा मोठ्या परीक्षेची तयारी करत असतात. बोर्डची परीक्षा देताना केवळ परीक्षेच्या तारखांकडेच लक्ष देऊन चालत नाही तर, फॉर्म भरण्याची तारीख,परीक्षेचे शुल्क भरण्याची तारीख, आपले प्रवेशपत्र (हॉल तिकिट) घेण्याची तारीख यांची देखील नोंद घ्यावी लागते.
यातील एखादे कार्य योग्य वेळेमध्ये झाले नाही तरी देखील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेस मुकावे लागू शकते. म्हणून शाळांनी, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी देखील सर्व तारखांचे पालन हे काटेकोरपणे केले पाहिजे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ही एक स्वयंशासित संस्था आहे. ही संस्था इयत्ता 10 वी तसेच इयत्ता 12 वी च्या परीक्षांचे नियोजन करणे, अभ्यासक्रम तयार करणे आणि राज्य शिक्षण व्यवस्थेचे व्यवस्थापन करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडते. इयत्ता 10 वी ची परीक्षा या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत घेण्यात येते.
प्रत्येक विषयाकरिता 100 गुण दिले जातात त्यापैकी 80 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत स्वाध्यायासाठी दिले जातात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दरवर्षी नऊ विभागीय मंडळांच्या अंतर्गत घेण्यात येतात. SSC परीक्षेविषयीच्या महत्त्वाच्या सूचना आणि तारखा शिक्षण मंडळ वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येतात.
काही महत्त्वाच्या तारखांचा तपशील खाली दिलेला आहे
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अंदाजे ऑक्टोबर 2022 च्या तिसर्या आठवड्यामध्ये 2023 मधील बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
2. महाराष्ट्र बोर्ड SSC ची मुख्य परीक्षा ही अंदाजे मार्च ते एप्रिल 2023 या कालावधी होणे अपेक्षित आहे.
3. या परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक, शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.
4. प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक हे संबंधित शाळांमार्फत निश्चित केले जाते.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm या अधिकृत वेबसाइटवर आपण परीक्षेविषयीची माहिती पाहू शकता. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये, सर्व विषयांच्या पेपरची तारीख तसेच, त्यासाठी निश्चित केलेला वेळ, त्यासोबत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी पाळावयाचे काही नियम यांची माहिती देखील दिलेली असते.
मुख्य परीक्षेचे वेळापत्रक येईल तो पर्यंत, विद्यार्थ्यांनी आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित असते. शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित, मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. परीक्षेचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना किमान गुण मिळालेले नाही तसेच, जे विद्यार्थी त्यांना मिळालेल्या गुणांवर समाधानी नाहीत ते विद्यार्थी पुरवणी परीक्षा देऊ शकतात. पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक देखील शिक्षण मंडळा मार्फत अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या महत्त्वाच्या तारखांबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता या ब्लॉगमधील पुढील माहिती वाचा.
बोर्डचे नाव | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ |
---|---|
परीक्षेचे नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र |
नोंदणी अर्ज भरण्याची तारीख | ऑक्टोबर 2022 (अंदाजे) |
वेळापत्रक जाहीर होण्याची तारीख | जानेवारी 2023 (अंदाजे) |
प्रवेशपत्र मिळण्याची तारीख | फेब्रुवारी-मार्च 2023 (अंदाजे) |
परीक्षेची तारीख | मार्च-एप्रिल 2023 (अंदाजे) |
अधिकृत वेबसाइट | https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm |
जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डतून इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत, त्यांनी इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा नोंदणी अर्ज भरला पाहिजे. हे लक्षात ठेवले पाहिजे की, बोर्डच्या अधिकार्यांनी निर्दिष्ट केलेल्या अंतिम तारखेस किंवा त्यापूर्वी हा अर्ज योग्य अधिकार्यांकडून प्राप्त केला पाहिजे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच 2023 च्या SSC च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करणार आहे.
बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवर, अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या जातील. अंतिम तारखेनंतर नोंदणी अर्ज दाखल करणार्या अर्जदाराला अर्जाच्या शुल्का व्यतिरिक्त विलंब शुल्क भरावे लागेल.
बोर्डचे नाव | महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) |
---|---|
इयत्ता | 10 वी |
अर्जाचे नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) अर्ज |
हॉल तिकीट मिळण्याची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
परीक्षा सुरू होण्याची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
अधिकृत वेबसाइट | mahahsscboard.in |
महाराष्ट्र बोर्डद्वारे घेण्यात येणाऱ्या SSC परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे. अर्ज उपलब्ध झाल्यानंतर, तो डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक पायऱ्यांचे काळजीपूर्वक अनुसरण केले पाहिजे:
पायरी 1: “महाराष्ट्र बोर्ड” यांच्या mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
पायरी 2: होम पेजवर, “नवीनतम सूचना” विभागाअंतर्गत असलेल्या “SSC मार्च-2023 रिक्त अर्ज” या लिंकवर क्लिक करा.
पायरी 3: रिक्त अर्ज हा PDF स्वरूपात नवीन विंडोमध्ये उघडेल.
पायरी 4: रिक्त अर्जाची प्रिंट काढा.
पायरी 5: महत्त्वाच्या सूचना वाचून झाल्यानंतर काळजीपूर्वक अर्ज भरा.
पायरी 6: अर्ज व्यवस्थितपणे पूर्ण भरल्यानंतर, विद्यार्थ्याचा फोटो लावा आणि “मी नियम आणि बोर्डने वेळोवेळी प्रसारित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याची सहमती देत आहे.” या विधानास संमती दर्शवून रेकॉर्डवर स्वाक्षरी करा.
नोंदणी अर्जाबद्दल अधिक माहिती आमच्या “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा नोंदणी अर्ज” या ब्लॉगमध्ये सविस्तर स्वरूपामध्ये दिलेली आहे. जर आपल्याला नोंदणी अर्जाबद्दल सर्व मुद्दे लक्षात घ्यायचे असल्यास आपल्याकरिता हा ब्लॉग महत्त्वपूर्ण ठरेल.
महाराष्ट्र बोर्डची इयत्ता 10 वी ची 2022-2023 या सत्रातील मुख्य परीक्षा ही दोन सत्रांमध्ये घेतली जाते. वेळापत्रकामध्ये दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेस जाणे अपेक्षित असते.
वेळापत्रक जाहीर होण्याची तारीख | ऑक्टोबर 2022 चा तिसरा आठवडा (अंदाजे) |
---|---|
परीक्षेची तारीख | मार्च-एप्रिल 2023 (अंदाजे) |
परीक्षा निकालाची तारीख | जून 2023 (अंदाजे) |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक हे शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करण्यात येईल. तथापि मागील वर्षाच्या वेळापत्रकाच्या आधारे आम्ही महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चे अंदाजे वेळापत्रक तयार केलेले आहे. पुढे दिलेले वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे नियोजन योग्य वेळेमध्ये सुरू केले पाहिजे:
परीक्षेची तारीख | विषय |
---|---|
मार्च 2023 | प्रथम भाषा |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा (संयुक्त) |
मार्च 2023 | प्रथम किंवा तृतीय भाषा |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा (संयुक्त) |
मार्च 2023 | द्वितीय किंवा तृतीय भाषा |
मार्च 2023 | गणित भाग- 1 बीजगणित |
मार्च 2023 | गणित भाग- 2 भूमिती |
मार्च 2023 | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 |
मार्च 2023 | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 2 |
एप्रिल 2023 | समाजशास्त्र भाग- 1 – इतिहास-नागरीकशास्त्र |
एप्रिल 2023 | समाजशास्त्र भाग- 2 – भूगोल-अर्थशास्त्र |
महाराष्ट्र बोर्डचे इयत्ता 10 वी च्या परीक्षेचे वेळापत्रक हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येते. https://www.mahahsscboard.in/indexmarathi.htm या लिंकवर क्लिक करून आपण वेळापत्रकाची PDF डाऊनलोड करू शकता. पुढील पायऱ्यांचे पालन करून विद्यार्थी इयत्ता 10 वी च्या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता:
पुढील सूचना या महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेच्या वेळापत्रकावर नमुद केलेल्या असतात:
पुढे काही सामान्य सूचना दिलेल्या आहेत, ज्याचे पालन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी करणे आवश्यक आहे :
विद्यार्थी बोर्डकडून प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर शाळांमार्फत किंवा वैयक्तिकरित्या, संबंधित यूजरनेम आणि पासवर्ड देऊन डाऊनलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर प्रवेशपत्र परीक्षेच्या (अंदाजे) दोन महिने आधी उपलब्ध होते. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याच्या पायर्या खालीलप्रमाणे आहेत:
प्रवेशपत्राविषयी आम्ही सविस्तर माहिती “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट)” या लेखामध्ये दिलेली आहे. प्रवेशपत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरिता हा लेख नक्की वाचा.
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी 2023 परीक्षेचा अर्ज डाऊनलोड कसा करावा?
उत्तर. महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाइट वरून विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी 2023 परीक्षेचा अर्ज डाऊनलोड करता येईल.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी परीक्षेचे प्रवेशपत्र केव्हा मिळेल?
उत्तर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे SSC परीक्षेच्या प्रवेशपत्राचे वितरण हे परीक्षेच्या (अंदाजे) दोन महिने पूर्वी करण्यात येते.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा 2023 चे वेळापत्रक डाऊनलोड केल्यानंतर मी काय करावे?
उत्तर. बोर्डद्वारे जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक डाऊनलोड करा आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन करा.
प्र 4. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी 2023 परीक्षेचे वेळापत्रक मी कुठून डाऊनलोड करू?
उत्तर. विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मुख्य परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
प्र 5. महाराष्ट्र SSC च्या प्रात्यक्षिक परीक्षांकरिता वेगळे वेळापत्रक असते का?
उत्तर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, इयत्ता 10 वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता वेळापत्रक जाहीर करत नाही. प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा या शाळांद्वारे जाहीर केल्या जातात.
प्र 6. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीची परीक्षा कधी सुरू होईल?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यार येईल. परंतु दरवर्षी ही परीक्षा मार्च महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात येते.
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023: परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.