
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022महत्त्वाचे धडे: इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेची तयारी करताना सर्व विषयांचा अभ्यास करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या ब्लॉगमध्ये Embibe च्या तज्ञांकडून आपल्याला इयत्ता दहावीच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून कोणते महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स आहेत यावर मार्गदर्शन केले जाईल. महत्त्वाच्या धड्यांचा आधीच अभ्यास करून घेतल्याने परीक्षेची तयारी सुलभ होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते. आमचा विश्वास आहे की हा ब्लॉग वाचून आपल्याला अभ्यास करताना मदत होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या नऊ विभागांच्या अंतर्गत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. बोर्डद्वारे मार्च-एप्रिल आणि जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. दरवर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या सूचना महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.
ठळक मुद्दे | तपशील |
---|---|
परीक्षेचे पूर्ण नाव | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा |
परीक्षेचे संक्षिप्त नाव | महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षा |
परीक्षेचे आयोजन करणारी संस्था | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे |
परीक्षेची वारंवारता | वर्षातून दोन वेळा |
परीक्षेचा कालावधी | 2 तास किंवा 3 तास |
अधिकृत वेबसाइट | http://Mahahsscboard.in |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित केला जातो. 2022-23 या शैक्षणिक सत्राकरिता www.mahahsscboard.in या महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे. जर आपल्याला भाषा, इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान आणि इतर भाषा विषयांसाठी अभ्यासक्रम डाऊनलोड करायचा असेल तर आपण वर दिलेल्या वेबसाइट वरून डाऊनलोड करू शकता.
खाली विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स दिले आहेत:
खालील तक्त्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही विषयातील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
गुरुत्वाकर्षण | बल व गती केप्लरचे नियम न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पृथ्वीचे गुरुत्व त्वरण वस्तुमान व वजन मुक्तपतन |
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण | मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबरायनरची त्रिके न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम मेंडेलीव्हची आवर्त सारणी आधुनिक आवर्तसारणी |
रासायनिक अभिक्रिया व समीकरणे | रासायनिक अभिक्रियेची ओळख रासायनिक समीकरणे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा दर ऑक्सिडीकरण व क्षपण |
विद्युतधारेचे परिणाम | विद्युत शक्ती आणि विद्युतधारेचे औष्णिक परिणाम विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम विद्युतचलित्र विद्युतचुंबकीय प्रवर्तन प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा विद्युत जनित्र |
उष्णता | अप्रकट उष्मा पाण्याचे असंगत आचरण दवबिंदू तापमान आणि आर्द्रता विशिष्ट उष्मा धारकता |
प्रकाशाचे अपवर्तन | प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनांक वातावरणीय अपवर्तन प्रकाशाचे अपस्करण पूर्ण आंतरिक परावर्तन |
भिंगे व त्यांचे उपयोग | भिंगे भिंगाच्या साहाय्याने प्रतिमांची निर्मिती भिंगांचा संयोग मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य दृष्टिदोष व त्यावरील उपाय वस्तूचा आभासी आकार |
धातुविज्ञान | धातूंचे भौतिक गुणधर्म अधातूंचे भौतिक गुणधर्म धातूंचे रासायनिक गुणधर्म धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी अधातूंचे रासायनिक गुणधर्म |
कार्बनी संयुगे | कार्बनचे आगळेवेगळे स्वरूप हायड्रोकार्बन क्रियात्मक गट समजातीय श्रेणी कार्बनच्या संयुगांचे नामकरण कार्बन संयुगांचे रासायनिक गुणधर्म महारेणू व बहुवारिके |
अवकाश मोहीमा | अंतराळ मोहिमा, त्यांची गरज व महत्व कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून दूर गेलेल्या अंतराळ मोहिमा अंतराळातील कचरा व त्याचे व्यवस्थापन |
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 2 | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
आनुवंशिकता व उत्क्रांती | आनुवंशिकता व आनुवंशिक बदल उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत व लामार्कवाद |
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 | सजीव आणि जीवनप्रक्रिया विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा पेशीविभाजन: एक आवश्यक जीवनप्रक्रिया |
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 | प्रजननाची ओळख प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान लैंगिक आरोग्य |
पर्यावरणीय व्यवस्थापन | परिसंस्था आणि पर्यावरण व परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंध पर्यावरण संवर्धन व त्याची गरज पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता |
हरित ऊर्जेच्या दिशेने | ऊर्जा आणि ऊर्जा वापर औष्णिक- ऊर्जेवर आधारित विद्युत- ऊर्जा निर्मिती केंद्र अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्र नैसर्गिक वायू -ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण जलविद्युत ऊर्जा पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र |
प्राण्यांचे वर्गीकरण | प्राणी वर्गीकरणाची ओळख आणि इतिहास प्राणी वर्गीकरणाची पारंपारिक पद्धत वर्गीकरणाची नवीन व्यवस्था |
ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची | सूक्ष्मजीवांद्वारे मिळणारी उत्पादने सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण |
पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान | पेशी विज्ञान मूलपेशी आणि अवयव प्रत्यारोपण जैवतंत्रज्ञान व त्याचा व्यावसायिक उपयोग |
सामाजिक आरोग्य | सामाजिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याला हानिकारक घटक ताणतणाव व्यवस्थापन |
आपत्ती व्यवस्थापन | आपत्ती व तिचे प्रकार आपत्तीचे परिणाम आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रथमोपचार,आपत्कालीन कृती व अभिरूप सराव |
गणित – बीजगणित आणि भूमिती मधील महत्त्वाचे टॉपिक्स
खालील तक्त्यांमध्ये बीजगणित आणि भूमिती या दोन्ही विषयातील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.
बीजगणित | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
दोन चलांतील रेषीय समीकरणे | रेषीय समीकरणांच्या जोडीची ओळख आलेख पद्धतीने रेषीय समीकरणांच्या जोड्यांची उकल रेषीय समीकरणांच्या जोड्या (निश्चयक पद्धती) समीकरणांच्या जोड्यांतील सुसंगतता व विसंगतता |
वर्गसमीकरणे | वर्ग बहुपदी वर्गसमीकरणे वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप वर्गमूळ व सहगुणक यांच्यातील परस्परसंबंध वर्गसमीकरणे बनवणे |
अंकगणिती श्रेढी | क्रमिका आणि विस्तार अंकगणिती श्रेढीचे सामान्य पद अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या N पदांची बेरीज |
अर्थनियोजन | जीएसटी शेअर्स, म्युचुअल फंड्स आणि SIP |
संभाव्यता | घटनेची संभाव्यता घटनेच्या संभाव्यतेचे गुणधर्म |
सांख्यिकी | केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण: वृत्तालेख सांख्यिकीरूपातील माहितीचे आलेखस्वरूपातील सादरीकरण |
भूमिती | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
समरूपता | प्रमाणाचे मूलभूत प्रमेय त्रिकोणांमधील समरूपता समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ |
पायथागोरसचे प्रमेय | पायथागोरसचे प्रमेय |
वर्तुळ | स्पर्शिका व त्याचे गुणधर्म स्पर्श वर्तुळांचे गुणधर्म वर्तुळकंस चक्रीय चौकोन व त्याचे गुणधर्म |
भौमितिक रचना | वर्तुळाला स्पर्शिका काढणे समरूप त्रिकोणाची रचना |
निर्देशक भूमिती | निर्देशक भूमितीची मूलतत्वे |
त्रिकोणमिती | त्रिकोणमितीय गुणोत्तर काही विशिष्ट कोनांचे त्रिकोणमितीय गुणोत्तर निर्देशकांच्या रूपात त्रिकोणमितीय गुणोत्तरे त्रिकोणमितीय नित्यसमानता त्रिकोणमितीचे उपयोजन |
महत्त्वमापन | वर्तुळ: कंस, पाकळी, खंड घन वस्तूंचे पृष्ठफळ व घनफळ |
सामाजिक शास्त्रे – इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयांमधील महत्त्वाचे टॉपिक्स
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र व भूगोल या सर्व उपविषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
विषय | धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
---|---|---|
इतिहास | इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा | युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन महत्त्वाचे विचारवंत |
इतिहासलेखन : भारतीय परंपरा | भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल भारतीय इतिहासलेखन: विविध तात्त्विक प्रणाली |
|
उपयोजित इतिहास | उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन संबंधित व्यावसायिक क्षेत्रे |
|
भारतीय कलांचा इतिहास | कला म्हणजे काय ? भारतातील दृक्कला परंपरा भारतातील ललित/आंगिक कला परंपरा कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी |
|
प्रसारमाध्यमे आणि इतिहास | प्रसारमाध्यमांची ओळख प्रसारमाध्यमांचा इतिहास प्रसारमाध्यमांची आवश्यकता |
|
मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास | लोकनाट्य मराठी रंगभूमी भारतीय चित्रपटसृष्टी |
|
खेळ आणि इतिहास | खेळांचे महत्त्व खेळांचे प्रकार खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण खेळांचे साहित्य आणि खेळणी |
|
पर्यटन आणि इतिहास | पर्यटनाची परंपरा पर्यटनाचे प्रकार पर्यटनाचा विकास ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन |
|
ऐतिहासिक ठेव्यांचे जतन | इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन काही नावाजलेली संग्रहालये कोशवाङ्मय |
|
राज्यशास्त्र | संविधानाची वाटचाल | लोकशाही सामाजिक न्याय व समता न्यायालयाची भूमिका |
निवडणूक प्रक्रिया | निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची कार्ये निवडणूक प्रक्रिया |
|
राजकीय पक्ष | राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष |
|
सामाजिक व राजकीय चळवळी | भारतातील प्रमुख चळवळी | |
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने | भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान | |
भूगोल | क्षेत्रभेट | – |
स्थान-विस्तार | स्थान, विस्तार व सीमा – भारत व ब्राझील ऐतिहासिक पार्श्वभूमी – भारत व ब्राझील |
|
प्राकृतिक रचना व जलप्रणाली | भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील | |
हवामान | हवामान – भारतातील हवामान भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील |
|
नैसर्गिक वनस्पती व प्राणी | भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील भारत वन्य जीवन ब्राझील वन्य जीवन |
|
लोकसंख्या | लोकसंख्या वितरण – भारत आणि ब्राझील लोकसंख्येची रचना लोकसंख्या वाढीचा दर साक्षरता प्रमाण |
|
मानवी वस्ती | मानवी वस्ती – भारत आणि ब्राझील भारत नागरीकरण ब्राझील नागरीकरण |
|
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय | भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय भारतातील शेती ब्राझीलमधील उद्योग भारतामधील उद्योग व्यापार |
|
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन | पर्यटन भारत व ब्राझीलमधील पर्यटन स्थळे ब्राझीलमधील वाहतूक भारतातील वाहतूक भारतातील संदेशवहन |
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिक वर दिले आहेत. जर आपल्याला इतर विषयांचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचा असेल तर आपण https://www.mahahsscboard.in/sscsub.htm या लिंकवर क्लिक करून मिळवू शकता. बोर्डने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – अभ्यासासाठी महत्त्वाच्या टिप्स
प्र 1. मला इयत्ता दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स कोठे मिळतील?
उत्तर. या ब्लॉगमध्ये इयत्ता दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स दिले आहेत. तसेच या टॉपिकवरील प्रश्न, व्हिडिओ देखील आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम मला कोठे सापडेल?
उत्तर. तपशीलवार अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट देऊ शकतात.
प्र 3. महाराष्ट्र बोर्ड दहावीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेण्याचे काय फायदे आहेत?
उत्तर. इयत्ता दहावीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेतल्यास, विद्यार्थ्यांना जास्त गुण असलेल्या धड्यांचा किंवा टॉपिकचा अभ्यास करणे सोपे होते, तसेच ते परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करू शकतात आणि जास्तीत जास्त गुण सहजपणे मिळवू शकतात.
प्र 4. मी भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स कसे जाणून घेऊ शकतो?
उत्तर. भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्सचे महाराष्ट्र बोर्डकडून विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण करून देण्यात आले आहे जसे की, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, व्याकरण इत्यादी.
प्र 5. मला महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा अभ्यासक्रम कोठून मिळेल?
उत्तर. विद्यार्थी आमच्या “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023-परीक्षेचा अभ्यासक्रम” या ब्लॉगमधून महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षेसाठी विषयवार अभ्यासक्रम पाहू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेमधील महत्त्वाचे टॉपिक्स” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.