
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 9, 2022महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षेची गुणपत्रिका 2023: परीक्षा झाली की सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता असते ती निकालाची. कोणत्याही परीक्षेचा निकाल हा अंदाजे 40 दिवसांनंतर लागतो. अशाचप्रकारे महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल सुद्धा 40 ते 45 दिवसांमध्ये लागतो. या ब्लॉगमध्ये embibe च्या तज्ञांनी SSC परीक्षेच्या निकालाविषयी आणि गुणपत्रिकेविषयी सविस्तर माहिती तसेच गुणपत्रिकेवरील काही महत्त्वाच्या मुद्यांविषयी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या नऊ विभागांच्या अंतर्गत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. बोर्डद्वारे वर्षातून दोन वेळा अंतिम परीक्षा घेतली जाते. प्रत्येक वर्षी, 17 लाखाहून अधिक विद्यार्थी SSC परीक्षेसाठी बसतात. महाराष्ट्र बोर्ड अंदाजे ऑक्टोबर 2022 मध्ये 2022-23 या सत्राकरिता परीक्षेच्या सूचना जाहीर करणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी तारखांची नोंद घेऊन ठेवली पाहिजे आणि सर्व प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली पाहिजे.
बोर्ड परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अंदाजे दीड ते दोन महिन्यांमध्ये या परीक्षेचा निकाल लागतो. सर्व प्रथम विद्यार्थ्यांना आपला निकाल शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळतो. इयत्ता दहावीचा 2021-2022 या सत्रातील परीक्षेचा निकाल 17 जून 2022 रोजी मंडाळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाला असून, 96.94% विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 94.40 टक्के आहे. SSC परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण, 15,84,790 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यामधील 15,68,977 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यांना किमान 33% गुण मिळविणे आवश्यक आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा ही राज्यस्तरावर घेतली जाते. या परीक्षेचा निकाल हा प्रथम ऑनलाईन लावण्यात येतो, त्याकरिता आपल्याला आपला आसन/बैठक क्रमांक आणि आपल्या आईचे नाव नमूद करावे लागते. ही परीक्षा अत्यंत न्याय्य पद्धतीने पार पाडली जाते त्याचप्रमाणे निकालही अत्यंत न्याय्य पद्धतीने जाहीर करण्यात येतो. या परीक्षेतील गुणांवर विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चित होऊ शकते. इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका ही महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आपण नोंदणी अर्जावर ज्याप्रकारे माहिती दिलेली आहे, ती सर्व माहिती गुणपत्रिकेवर नमूद होते. गुणपत्रिकेविषयीचे महत्त्वपूर्ण मुद्दे आणि नमुना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राचे स्वरूप खाली दिलेल्या दोन फोटोमध्ये दर्शवलेले आहे ते आता आपण पाहू:
इयत्ता 10 वी ची नमुना गुणपत्रिका
इयत्ता 10 वी चे नमुना प्रमाणपत्र
श्रेणी | टक्केवारी |
---|---|
A | 60% आणि त्यावरील गुण |
B | 45% ते 59% गुण |
C | 35% ते 44% गुण |
D | 35% आणि त्यापेक्षा कमी गुण |
प्रमाणपत्रांच्या श्रेणी | टक्केवारी |
---|---|
विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी | 75% आणि त्यापेक्षा अधिक गुण |
प्रथम श्रेणी | 60% ते 74% गुण |
द्वितीय श्रेणी | 45% ते 59 गुण |
उत्तीर्ण श्रेणी | इतर सर्व उत्तीर्ण उमेदवार (विषयात सूट घेतलेल्या उमेदवारांसह) |
गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र यामधील फरक :
इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय यामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. ही जरी दोन्ही भिन्न कागदपत्रे असली तरी दोन्हीचा संबंध शालान्त परीक्षेशी आहे. गुणपत्रिका ही शिक्षण मंडळामार्फत देण्यात येते, ज्यावर परीक्षा दिलेले विषय, विद्यार्थी उत्तीर्ण होणारे वर्ष, सत्र, विषयानुसार गुण, एकूण गुण, टक्केवारी इ. माहितीचा समावेश होतो. तर प्रमाणपत्रामध्ये केवळ, विद्यार्थ्याची सामान्य माहिती, त्यास मिळालेली टक्केवारी, विषयांची नावे, जन्म तारीख आणि शाळेचे नाव इत्यादी माहितीचा समावेश होतो.
आपली गुणपत्रिका डाऊनलोड कशी करावी?
इयत्ता दहावीचा निकाल हा प्रथम ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येतो. तर काही दिवसांनंतर मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येते. निकाल हा ऑनलाईन लागत असल्याकारणाने विद्यार्थी घर बसल्या आपला निकाल पाहून डाऊनलोड करू शकतात.
पुढे दिलेल्या पायर्यांच्या मदतीने आपण आपला इयत्ता 10 वी चा निकाल ऑनलाईन पाहू शकता :
गुणपडताळणी:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर जर विद्यार्थी आपल्या गुणांवर समाधानी नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने गुणपडताळणीची पद्धत सुरू केली आहे. ज्या विषयात विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांविषयी शंका असतील त्या विषयांकरिता विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तसेच ते http://verification.mh-ssc.ac.in/ या वेबसाइटला भेट देऊन देखील संबंधित गुणपडताळणीचा अर्ज करू शकतात.
प्र1. विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड SSC चा निकाल कसा पाहू शकतात?
उत्तर. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन महाराष्ट्र बोर्ड SSC चा निकाल तपासला पाहिजे. वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्ड SSC निकाल टॅबवर क्लिक करावे लागेल आणि अनिवार्य फील्डमध्ये आवश्यक ती माहिती प्रविष्ट करावी लागेल; जसे की, परीक्षा क्रमांक, जन्म तारीख किंवा आईचे नाव इत्यादी, त्यानंतर ‘निकाल पहा’ वर क्लिक करावे लागेल.
प्र2. गुणपत्रिकेचा उपयोग मला कोणत्या कामांसाठी होऊ शकतो?
उत्तर. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांची सर्व माहिती नमूद केलेली असल्यामुळे आपल्याला अनेक सरकारी ठिकाणी, पुढील शैक्षणिक प्रवेशांकरिता इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका उपयोगी पडते.
प्र3. विद्यार्थ्यास गुणपत्रिका कोणामार्फत मिळेल?
उत्तर. विद्यार्थ्यांनी ज्या शाळेतून बोर्ड परीक्षाचा नोंदणी अर्ज भरलेला आहे, त्याच शाळेद्वारे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देण्यात येते.
प्र4. गुणपत्रिकेवरील नाव किंवा जन्म तारीख चुकली असेल तर काय करावे?
उत्तर. गुणपत्रिकेवरील नाव किंवा जन्म तारीख बरोबर करायची असेल तर, प्रथम आपल्याला शाळेशी संपर्क साधावा लागेल अन्यथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा लागेल.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – काय करावे आणि काय करू नये
विद्यार्थ्यांनी खालील सूचनांचे पालन केले पाहिजे:
काय करावे:
काय करू नये
आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेची गुणपत्रिका ” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात राहा.