• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम

img-icon

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम : महाराष्ट्र बोर्डद्वारे प्रत्येक शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात येतो. विद्यार्थी या अधिकृत वेबसाईटवरून ‘विषय आणि अभ्यासक्रम’ या विभागाअंतर्गत हा अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकतात. हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे, तो डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात व त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात. महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बोर्डच्या सर्वात नवीन अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्याचप्रमाणे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना हे समजून घेण्यास मदत करतो की ते कोणते विषय शिकत आहेत व शिक्षक देखील वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिकवणुकी संबंधित नियोजन तयार करू शकतात.

अधिक माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थी प्राथमिक तारखा आणिआणि खाली दिलेल्या माहितीचे अवलोकन केले पाहिजे. नेहमीच्या वेळापत्रकानुसार इयत्ता 10 वी ची परीक्षा अंदाजे मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023- अभ्यासक्रमाच्या PDF लिंक्स

2022-23 या सत्राकरिता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाच्या PDF खालील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत:

विषयाचे नाव PDF लिंक
हिंदी (द्वितीय व तृतीय) – भाषा येथे क्लिक करा
गणित येथे क्लिक करा
सामान्य गणित येथे क्लिक करा
विज्ञान येथे क्लिक करा
सामाजिक शास्त्रे येथे क्लिक करा
इंग्रजी येथे क्लिक करा
हिंदी 1 – भाषा येथे क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप

परीक्षेकरिता इंग्रजी विषयाची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत येणार्‍या इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे:

Course Book
a) Prose: About 64 pages of literary and non-literary (informative) text (excluding notes, illustrations, tasks, etc.)
b) Poetry: Poetry : About 250 lines. Non-detailed study: A selection of literary texts (short stories, one
Grammar
Revision of grammatical items studied up to Std VIII.
Different kinds of sentenses Simple, Compound, Complex
Different types of clause Principal, Co-ordinate, Sub-ordinate
The tenses a) Continuous
i) Present Perfect ii) Present Perfect iii) Past Perfect iv) Future with will/shall and ‘going to’
b) Continuous Sequence of Tenses
Articles a, an, the (advanced level)
prepositions different uses
Word formation Nouns/Adjectives/Verbs/Adverbs
Voice Statements, questions, negatives, indirect object
Question formation Tag questions
Reported Speech Statements, questions, commands, requests,
exclamation
Punctuation Usage
Non-finites Infinitives, Gerunds, Participles
Modal Auxillaries Uses of ‘can’, ‘may’, ‘might’, etc
Conditionals Unreal conditions in the present/past Possible
conditions in the future

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 या परीक्षेचा नमुना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी खालील तक्त्यामध्ये इंग्रजी विषयाची गुणांकन पद्धत दिली आहे ती पहा आणि समजून घ्या:

Reading Skill 40%
Grammar 15%
Writing skill 25%
Oral test 20% 20%

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व 2 अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय दोन भागांमध्ये विभागला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या दोन्ही भागांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
गुरुत्वाकर्षण बल व गती
केप्लरचे नियम
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
पृथ्वीचे गुरुत्व त्वरण
वस्तुमान व वजन
मुक्तपतन
गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा
मुक्तिवेग
मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण मूलद्रव्यांचे वर्गीकरण
डोबरायनरची त्रिके
न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम
मेंडेलीव्हची आवर्त सारणी
आधुनिक आवर्तसारणी
आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल
रासायनिक अभिक्रिया व समीकरणे रासायनिक अभिक्रियेची ओळख
रासायनिक समीकरणे
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार
ऊष्माग्राही आणि ऊष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया
रासायनिक अभिक्रियेचा दर
ऑक्सिडीकरण व क्षपण
क्षरण
खवटपणा
विद्युतधारेचे परिणाम विद्युत शक्ती आणि विद्युतधारेचे औष्णिक परिणाम
विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम
विद्युतवाहकाने निर्माण केलेले चुंबकीय क्षेत्र
चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल
विद्युतचलित्र
विद्युतचुंबकीय प्रवर्तन
गॅल्व्हॅनोमीटर
प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा
विद्युत जनित्र
उष्णता अप्रकट उष्मा
पुनर्हिमायन
पाण्याचे असंगत आचरण
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता
उष्णता
विशिष्ट उष्मा धारकता
प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपवर्तन
अपवर्तनांक
वातावरणीय अपवर्तन
प्रकाशाचे अपस्करण
पूर्ण आंतरिक परावर्तन
भिंगे व त्यांचे उपयोग भिंगे
भिंगाच्या साहाय्याने प्रतिमांची निर्मिती
भिंगांचा संयोग
मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य
दृष्टिदोष व त्‍यावरील उपाय
वस्तूचा आभासी आकार
भिंगे आणि ऑप्टिकल उपकरणांचा वापर
दृष्टिसातत्य
धातुविज्ञान धातूंचे भौतिक गुणधर्म
अधातूंचे भौतिक गुणधर्म
धातूंचे रासायनिक गुणधर्म
धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी
अधातूंचे रासायनिक गुणधर्म
आयनिक संयुगे
धातूविज्ञान आणि त्याची तत्वे
धातूंचे क्षरण व त्यांचे प्रतिबंध
कार्बनी संयुगे सहसंयुज बंध
कार्बनचे आगळेवेगळे स्वरूप
हायड्रोकार्बन
कार्बन अणूंच्या सरल, शाखीय आणि वलयांकित शृंखला
क्रियात्मक गट
समजातीय श्रेणी
कार्बनच्या संयुगांचे नामकरण
कार्बन संयुगांचे रासायनिक गुणधर्म
इथेनॉल व इथेनॉइक आम्ल
महारेणू व बहुवारिके
अवकाश मोहीमा अंतराळ मोहिमा, त्यांची गरज व महत्व
कृत्रिम उपग्रह
उपग्रह प्रक्षेपक
पृथ्वीपासून दूर गेलेल्या अंतराळ मोहिमा
भारत व अंतराळ तंत्रज्ञान
अंतराळातील कचरा व त्याचे व्यवस्थापन

2022-23 या सत्राकरिता इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 2 विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
आनुवंशिकता व उत्क्रांती आनुवंशिकता व आनुवंशिक बदल
प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण
उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत व लामार्कवाद
जातीउद्भव व मानवी उत्क्रांती
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 सजीव आणि जीवनप्रक्रिया
सूक्ष्मजीवांसह सजीवांची श्वसनक्रिया
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा
पेशीविभाजन: एक आवश्यक जीवनप्रक्रिया
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 प्रजननाची ओळख
अलैंगिक प्रजनन
लैंगिक प्रजनन
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान
लैंगिक आरोग्य
पर्यावरणीय व्यवस्थापन परिसंस्था आणि पर्यावरण व परिसंस्था यांच्यातील परस्परसंबंध
पर्यावरण संवर्धन व त्याची गरज
पर्यावरण संवर्धन- आपली सामाजिक जबाबदारी
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता
जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे
धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
हरित ऊर्जेच्या दिशेने ऊर्जा आणि ऊर्जा वापर
औष्णिक- ऊर्जेवर आधारित विद्युत- ऊर्जा निर्मिती केंद्र
अणु-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती केंद्र
नैसर्गिक वायू -ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण
जलविद्युत ऊर्जा
पवन ऊर्जेवर आधारित विद्युतनिर्मिती
सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र
प्राण्यांचे वर्गीकरण प्राणी वर्गीकरणाची ओळख आणि इतिहास
प्राणी वर्गीकरणाची पारंपारिक पद्धत
वर्गीकरणाची नवीन व्यवस्था
ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख
सूक्ष्मजीवांद्वारे मिळणारी उत्पादने
सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण
पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान पेशी विज्ञान
मूलपेशी आणि अवयव प्रत्यारोपण
जैवतंत्रज्ञान व त्याचा व्यावसायिक उपयोग
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे
सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्याला हानिकारक घटक
प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर
ताणतणाव व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व तिचे प्रकार
आपत्तीचे परिणाम
आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती
आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
प्रथमोपचार,आपत्कालीन कृती व अभिरूप सराव

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – बीजगणित आणि भूमिती अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा गणित हा विषय दोन भागांमध्ये विभागला आहे. बीजगणित आणि भूमिती या दोन्ही भागांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता दहावीचा बीजगणित या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
दोन चलांतील रेषीय समीकरणे रेषीय समीकरणांच्या जोडीची ओळख
आलेख पद्धतीने रेषीय समीकरणांच्या जोड्यांची उकल
रेषीय समीकरणांच्या जोड्या (निश्चयक पद्धती)
समीकरणांच्या जोड्यांतील सुसंगतता व विसंगतता
वर्गसमीकरणे वर्ग बहुपदी
वर्गसमीकरणे
वर्गसमीकरणे सोडविण्याच्या पद्धती
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप
वर्गमूळ व सहगुणक यांच्यातील परस्परसंबंध
वर्गसमीकरणे बनवणे
अंकगणिती श्रेढी क्रमिका आणि विस्तार
अंकगणिती श्रेढी
अंकगणिती श्रेढीचे सामान्य पद
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या N पदांची बेरीज
अर्थनियोजन जीएसटी
शेअर्स, म्युचुअल फंड्स आणि SIP
संभाव्यता संभाव्यतेच्या संज्ञा
घटनांचे प्रकार
घटनेची संभाव्यता
घटनेच्या संभाव्यतेचे गुणधर्म
सांख्यिकी केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक
वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक
सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण: वृत्तालेख
सांख्यिकीरूपातील माहितीचे आलेखस्वरूपातील सादरीकरण
वारंवारता बहुभूज व वारंवारता वक्र

2022-23 या सत्राकरिता इयत्ता दहावीचा भूमिती विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
समरूपता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय
त्रिकोणांमधील समरूपता
समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ
पायथागोरसचे प्रमेय पायथागोरसचे प्रमेय
वर्तुळ रेषा व वर्तुळ यांच्यातील परस्परसंबंध
स्पर्शिका व त्याचे गुणधर्म
स्पर्श वर्तुळांचे गुणधर्म
वर्तुळकंस
चक्रीय चौकोन व त्याचे गुणधर्म
वर्तुळ व रेषा यांच्यातील परस्परसंबंध
भौमितिक रचना रेषाखंडांचे विभाजन
रचनेची मुलभूत तत्वे
वर्तुळाला स्पर्शिका काढणे
समरूप त्रिकोणाची रचना
निर्देशक भूमिती रेषेचा चढ
निर्देशक भूमितीची मूलतत्वे
त्रिकोणमिती त्रिकोणमितीय गुणोत्तर
काही विशिष्ट कोनांचे त्रिकोणमितीय गुणोत्तर
निर्देशकांच्या रूपात त्रिकोणमितीय गुणोत्तरे
त्रिकोणमितीय नित्यसमानता
त्रिकोणमितीचे उपयोजन
महत्त्वमापन वर्तुळ: कंस, पाकळी, खंड
घन आकृत्या
घन वस्तूंचे पृष्ठफळ व घनफळ

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 – सामाजिक शास्त्रे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र आणि भूगोल या सर्व उपविषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 

विषय धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
इतिहास इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा इतिहासलेखनाची परंपरा
आधुनिक इतिहासलेखन
युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन
महत्त्वाचे विचारवंत
स्त्रीवादी इतिहासलेखन
इतिहासलेखन : भारतीय परंपरा भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
भारतीय इतिहासलेखन: विविध तात्त्विक प्रणाली
उपयोजित इतिहास उपयोजित इतिहास म्हणजे काय?
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
भारतीय कलांचा इतिहास कला म्हणजे काय ?
भारतातील दृक्कला परंपरा
भारतातील ललित/आंगिक कला परंपरा
कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी
प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रसारमाध्यमांची ओळख
प्रसारमाध्यमांचा इतिहास
प्रसारमाध्यमांची आवश्यकता
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास मनोरंजनाची आवश्यकता
लोकनाट
मराठी रंगभूमी
भारतीय चित्रपटसृष्टी
मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
खेळ आणि इतिहास खेळांचे महत्त्व
खेळांचे प्रकार
खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण
खेळांचे साहित्य आणि खेळणी
खेळणी आणि इतिहास
खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट
खेळ आणि व्यावसायिक संधी
पर्यटन आणि इतिहास पर्यटनाची परंपरा
पर्यटनाचे प्रकार
पर्यटनाचा विकास
ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रातील व्यावसायिक संधी
ऐतिहासिक ठेव्यांचे जतन इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन
काही नावाजलेली संग्रहालये
ग्रंथालये आणि अभिलेखागार
कोशवाङ्मय
राज्यशास्त्र संविधानाची वाटचाल लोकशाही
सामाजिक न्याय व समता
न्यायालयाची भूमिका
निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाची कार्ये
निवडणूक प्रक्रिया
राजकीय पक्ष भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप
राष्ट्रीय पक्ष
प्रादेशिक पक्ष
सामाजिक व राजकीय चळवळी चळवळी का?
चळवळ म्हणजे काय?
भारतातील प्रमुख चळवळी
भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने भारतीय लोकशाहीसमोरील आव्हान
भूगोल क्षेत्रभेट क्षेत्रभेट आणि त्यासंबंधित संपूर्ण माहिती
स्थान-विस्तार स्थान, विस्तार व सीमा – भारत व ब्राझील
ऐतिहासिक पार्श्वभूमी – भारत व ब्राझील
प्राकृतिक रचना व जलप्रणाली भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील
हवामान हवामान – भारतातील हवामान
भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील
नैसर्गिक वनस्पती व प्राणी भौगोलिक स्पष्टीकरण – भारत व ब्राझील
भारत वन्य जीवन
ब्राझील वन्य जीवन
लोकसंख्या लोकसंख्या वितरण – भारत आणि ब्राझील
लोकसंख्येची रचना
लोकसंख्या वाढीचा दर
साक्षरता प्रमाण
मानवी वस्ती मानवी वस्ती – भारत आणि ब्राझील
भारत नागरीकरण
ब्राझील नागरीकरण
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय
भारतातील शेती
ब्राझीलमधील उद्योग
भारतामधील उद्योग
व्यापार
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पर्यटन
भारत व ब्राझीलमधील पर्यटन स्थळे
ब्राझीलमधील वाहतूक
भारतातील वाहतूक
भारतातील संदेशवहन

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा संपूर्ण अभ्यासक्रम मिळवण्यासाठी https://www.mahahsscboard.in/sscsub.htm या लिंकवर क्लिक करा. बोर्डने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी, 2023 चा अभ्यासक्रम कसा डाऊनलोड करता येईल?

अधिकृत वेबसाईटवर अभ्यासक्रम प्रकाशित झाल्यानंतर, खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून विद्यार्थी हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकतात:

पायरी 1: महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in. ला भेट द्या.

पायरी 2: होम पेज वर असलेल्या “विषय आणि अभ्यासक्रम” या टॅबवर क्लिक करा.

पायरी 3: “SSC सामान्य विषय सांकेतिक क्रमांक आणि अभ्यासक्रम” या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 4: PDF डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित विषयावर क्लिक करावे लागेल.

पायरी 5: भविष्यातील संदर्भासाठी PDF डाऊनलोड करा आणि सेव्ह करुन ठेवा.

इयत्ता दहावीच्या परीक्षेची तयार करताना लक्षात ठेवायाच्या महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10, 2023 या परीक्षेच्या तयारीसाठी दिलेल्या युक्त्यांमध्ये पुढील पाच मूलभूत सिद्धांत लक्षात ठेवून अभ्यासाची कार्यपद्धती तयार केली आहे:

नियमितपणा:

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.

संपूर्ण तयारी:

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्‍या धड्यांचे दररोज काटेकोरपणे सखोल मनन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रॅक्टिस:

प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे. धड्यांच्या नोट्स काढल्यामुळे तो विषय लवकर लक्षात राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे.

स्पष्टपणा:

विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि दिलेल्या सर्व धड्यामधील कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. टॉपिक अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी शिक्षक त्यांना काही पुस्तकांची शिफारस करू शकतात.

आरोग्य:

विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबर आरोग्य राखले जाणे अतिशय आवश्यक असते म्हणून त्यांनी सकस आहार घेतला पाहिजे तसेच नियमित व्यायाम केला पाहिजे आणि चांगली विश्रांती घेतली पाहिजे. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी 2023 अभ्यासक्रम- वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. मला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर मी काय करावे?

उत्तर. जर आपल्याला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा https://www.embibe.com/user-home या वेबसाईटला भेट देऊन Embibe स्पष्टीकरणकर्त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या शंकांचे निरसन झाले नाही तर आपण Embibe च्या शंका निरसन केंद्राची मदत घेऊ शकता. 

प्र 2. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास मी अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो? 

उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपली पुस्तके मदत करतील. परंतु अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी Embibe वर आपल्याला व्हिडीओ उत्तरांसह पुस्तके येथे मिळतील. त्यामुळे 3D इंटरॅक्टिव्ह व्हिडिओंद्वारे, प्रॅक्टिस करून आणि टेस्ट देऊन आपण अभ्यास केला पाहिजे.

प्र 3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?

उत्तर. इयत्ता 10 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 10 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते. 

प्र 4. SSC परीक्षेमध्ये कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?

उत्तर. SSC परीक्षेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आणि काही अनिवार्य भाषा विषय इत्यादी समाविष्ट केलेले आहेत. 

प्र 5. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? 

उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करून त्याची वेळोवेळी उजळणी केली पाहिजे असे केल्याने आपण आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करू शकता.

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता दहावी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा