• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेचे स्वरूप

img-icon

परीक्षेचे स्वरूप: मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश्य ठेऊन हा Embibe प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना प्रत्येक विषयाच्या नवीन परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेची तयारी करत असताना यामध्ये परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना अभ्यासाचे सुसूत्र नियोजन करण्यास मदत मिळते. या ब्लॉगमध्ये आपण Embibe च्या तज्ञांकडून याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेविषयी

परीक्षेविषयी: मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नेमके काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या इयत्तेतील कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी हा Embibe प्लॅटफॉर्म अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या इयत्तेध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. भाषा, इतिहास व नागरीकशास्त्र, सामान्य विज्ञान या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 6 वी मध्ये तयार होतो.

दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 6 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 च्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता 6 वी च्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन घटक चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेचे सविस्तर स्वरूप

  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम: महाराष्ट्राची पाठ्यपुस्तके ही महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमावर तसेच सर्वात अलीकडील सुधारित आणि अद्ययावत टेस्ट पॅटर्नवर आधारित आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता इयत्ता 6 वी ची पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे.

परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण अभ्यास सामग्रीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ देखील वेळोवेळी आपल्या इयत्तांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यक्रमात बदल करते. परिणामी, आज महाराष्ट्राकडे एक उत्तम, कार्यक्षम आणि आकर्षक शैक्षणिक व्यवस्था कार्यरत आहे. 

आपण महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीचा विषयानुसार अभ्यासक्रम अनुक्रमे भाषा, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र अधिक सविस्तर पाहूया.  

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – भाषा अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक धड्याचे नाव
1 बलसागर भारत होवो (गीत)
– साने गुरुजी
2 सायकल म्हणते, मी आहे ना!
3 डॉ. कलाम यांचे बालपण
– डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
4 गवतफुला रे! गवतफुला! (कविता) – इंदिरा संत
5 बाकी वीस रुपयांचं काय? – बाबाराव मुसळे
6 पण थोडा उशीर झाला…
– संदीप हरी नाझर
7 आपले परमवीर
8 माय (कविता) – स.ग. पाचपोळ
9 वारली चित्रकला
– डॉ. गोविंद गारे
10 सुगंधी सृष्टी
– ना.ग. गोरे
11 माझ्या आज्यानं पंज्यानं (कविता)
– शंकर अभिमान कसबे
12 मला मोठ्‌ठं व्हायचंय!
– प्रियंवदा करंडे
13 आपली सुरक्षा, आपले उपाय!
14 आतां उजाडेल! (कविता)
– मंगेश पाडगांवकर
15 बालसभा
16 सफर मेट्रोची
– क्रांती गोडबोले – पाटील
17 दुखणं बोटभर
– डॉ. चित्रा सोहनी
18 बहुमोल जीवन (कविता) – रमण रणदिव
19 मले बाजाराला जायाचं बाई!
– प्रभा र. बैकर
20 ओळख थोरांची
भाग – 1. – संजय दुधाणे
भाग – 2. – –
21 या काळाच्या भाळावरती (कविता)
– उत्तम कोळगावकर
22 वडिलांस पत्र
23 परिवर्तन विचारांचे
24 रोजनिशी
25 नवा पैलू
– प्रतिभा पानट


26
संतवाणी
– संत बहिणाबाई
– संत निर्मळा
– फादर थॉमस स्टीफन्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – विज्ञान अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक धड्याचे नाव
1 नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन
2 सजीव सृष्टी
3 सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण
4 आपत्ती व्यवस्थापन
5 पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म
6 पदार्थ आपल्या वापरातील
7 पोषण आणि आहार
8 आपली अस्थिसंस्था व त्वचा
9 गती व गतीचे प्रकार
10 बल व बलाचे प्रकार
11 कार्य आणि ऊर्जा
12 साधी यंत्रे
13 ध्वनी
14 प्रकाश व छायानिर्मिती
15 चुंबकाची गंमत
16 विश्वाचे अंतरंग

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – गणित अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक धड्याचे नाव
गणित विभाग – 1
1 भूमितीतील मूलभूत संबोध
2 कोन
3 पूर्णांक संख्या
4 अपूर्णांकांवरील क्रिया
5 दशांश अपूर्णांक
6 स्तंभालेख
7 सममिती
8 विभाज्यता
9 मसावि-लसावि
गणित विभाग – 2
10 समीकरणे
11 गुणोत्तर-प्रमाण
12 शेकडेवारी
13 नफा-तोटा
14 बँक व सरळव्याज
15 त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म
16 चौकोन
17 भौमितिक रचना
18 त्रिमितीय आकार

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रम

विषयाचे नाव अनु. क्रमांक धड्याचे नाव
इतिहास
1 भारतीय उपखंड आणि इतिहास
2 इतिहासाची साधने
3 हडप्पा संस्कृती
4 वैदिक संस्कृती
5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
6 जनपदे आणि महाजनपद
7 मौर्यकालीन भारत
8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये
9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
10 प्राचीन भारत : सांस्कृतिक
11 प्राचीन भारत आणि जग
नागरिकशास्त्र

1 आपले समाजजीवन
2 समाजातील विविधता
3 ग्रामीण स्थानिक शासन संस्था
4 शहरी स्थानिक शासन संस्था
5 जिल्हा प्रशासन
भूगोल 1 पृथ्‍वी आणि वृत्ते
2 चला वृत्ते वापरूयात
3 पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
4 हवा व हवामान
5 तापमान
6 महासागरांचे महत्व
7 खडक व खडकांचे प्रकार
8 नैसर्गिक संसाधने
9 ऊर्जा साधने
10 मानवाचे व्यवसाय
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023: परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षेचे वेळापत्रक: ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येते. तसेच दोन वेळा घटक चाचण्या घेतल्या जातात. प्रथम सत्रात एक घटक चाचणी आणि शेवटी सहामाही परीक्षा घेण्यात येते तर द्वितीय सत्रात एक घटक चाचणी आणि शेवटी वार्षिक परीक्षा होते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी चे वेळापत्रक प्रत्येक शाळा निश्चित करत असतात. प्रथम सत्र परीक्षा अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होते व द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा अंदाजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते. प्रथम आणि द्वितीय सत्रात सहामाही आणि वार्षिक परीक्षा अगोदर घटक चाचणी घेतली जाते. 

  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी

प्रश्नपत्रिकेचा कालावधी विषयाच्या एकूण गुण मूल्यांकनानुसार प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी साधारण 2 तास (40 गुण) किंवा 3 तास (80 गुण) याप्रमाणे निश्चित केलेला असतो. घटक चाचणीचा 1 तास (20 गुण) याप्रमाणे निश्चित केलेला असतो. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रश्न कशाप्रकारे सोडविता येतील याचे नियोजन आणि सराव केला पाहिजे.  

  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेचे विषयानुसार स्वरूप

परीक्षेचे विषयानुसार स्वरूप: प्रत्येक विषयानुसार महाराष्ट्र बोर्डद्वारे परीक्षेचे स्वरूप निश्चित केले जाते जसे की, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे, भाषा – मराठी, इंग्रजी, हिंदी इत्यादी. सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान 35 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असते.

भाषा विषय – प्रश्नपत्रिकेच्या गुणांचे मूल्यांकन

1. भाषा विषयांकरिता बोर्डाद्वारे काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन गुणांचे वितरण केले जाते ते खालीलप्रमाणे आहे.

ठळक मुद्दे गुणांचे वितरण
वाचन कौशल्य (पाठ्यपुस्तकावर आधारित व त्याव्यतिरिक्त) 40%
व्याकरण 15%
लेखन कौशल्य 25%
तोंडी परीक्षा 20%

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: सामान्य विज्ञान विषयाच्या परीक्षेची रूपरेषा

सामान्य विज्ञान विषयाच्या परीक्षेची रूपरेषा: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीच्या सामान्य विज्ञान विषयासाठी पाठ्यपुस्तकात एकूण 16 धड्यांचा समावेश करण्‍यात आलेला असून यातील पहिली 8 धडे प्रथम सत्रासाठी तर उर्वरीत 8 धडे द्वितीय सत्रासाठी दिलेले आहेत. शिक्षकांनी विज्ञान हा विषय शिकवताना ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे की विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी एकात्मिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच आपण सातत्‍याने अध्‍यापन करायचे आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना या विषयाच्या अभ्यासाचे वार्षिक नियोजन करणे सहज व्हावे यासाठी पुढे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत.

प्रथम सत्र व द्वितीय सत्र यानुसार केलेले धड्यांचे नियोजन: 

सामान्य विज्ञान

प्रथम सत्र

धड्याचा क्र. धड्याचे नाव धड्याचा क्र. धड्याचे नाव
1 नैसर्गिक संसाधने – हवा, पाणी आणि जमीन 5 पदार्थ सभोवतालचे – अवस्था आणि गुणधर्म
2 सजीव सृष्टी 6 पदार्थ आपल्या वापरातील
3 सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण 7 पोषण आणि आहार
4 आपत्ती व्यवस्थापन 8 आपली अस्थिसंस्था व त्वचा

     

सामान्य विज्ञान

द्वितीय सत्र

धड्याचा क्र. धड्याचे नाव धड्याचा क्र. धड्याचे नाव
9 गती व गतीचे प्रकार 13 ध्वनी
10 बल व बलाचे प्रकार 14 प्रकाश व छायानिर्मिती
11 कार्य आणि ऊर्जा 15 चुंबकाची गंमत
12 साधी यंत्रे 16 विश्वाचे अंतरंग

 गुणांचे वितरण – टक्केवारीमध्ये

ठळक मुद्दे गुणांचे वितरण
लेखी 40%
प्रात्यक्षिक परीक्षा 15%
लेखन कौशल्य 25%
तोंडी परीक्षा 20%

 गणित विषयाच्या परीक्षेची रूपरेषा

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी च्या गणित विषयाचे गणित – भाग 1 आणि गणित – 2 अशा दोन भागांमध्ये विभाजन केलेले आहे. 

1. गणित विषयाला एकूण 100 गुण असतात. 

2. गणित – भाग 1 आणि गणित – 2 अशा या दोन्ही भागांचे प्रत्येकी 40-40 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण अंतर्गत स्वाध्यायाकरिता निश्चित करून असे एकूण 100 गुणांचे विभाजन केलेले असते. 

3. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 100 पैकी 35 गुण मिळवणे आवश्यक असते.      

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023: गुणांकन पद्धती

विषय गुणांचे वितरण
भाषा विषय 100 (80+20)
इंग्रजी 100 (80+20)
गणित 100 (80+20)
सामान्य विज्ञान 100 (80+20)
सामाजिक शास्त्र 100 (80+20)
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: निकाल: इयत्ता सहावीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर अंदाजे एप्रिल 2023 मध्ये निकाल जाहीर करण्यात येईल. हा निकाल संबंधित शाळांद्वारे जाहीर करण्यात येतो.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेसाठी लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या टिप्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी 2023 या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या टिप्स शेअर केल्या आहेत. येथे काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत; त्या विचारात घेऊन त्यांचा उत्तम उपयोग करा. या परीक्षेच्या तयारीसाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवा.     

अभ्यासातील नियमितपणा आणि शिस्त: 

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.

संपूर्ण तयारी: 

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्‍या धड्यांचे दररोज एकदा उजळणी केली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेक वेळा उजळणी केल्यास आपल्याला टॉपिक लक्षात ठेवण्यास सोपे होते. 

प्रॅक्टिस: 

प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे वाचन व प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून सराव चाचणीची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रश्नपत्रिका कशी वाचायची आणि आवश्यक थीम कशा ओळखायच्या हे आपण शिकाल. परीक्षेदरम्यान आपल्या वेळेचा वापर कसा करायचा हे देखील आपण शिकाल. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेचे स्वरूप: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र1. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्यासाठी मला सहावीमध्ये किती टक्के मिळवावे लागतील?

उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.

प्र2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेसाठी मला अभ्यासाचे नियोजन कसे करावे लागेल?

उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण शक्य तितक्या अधिक सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवल्या पाहिजे व त्यावरून आपण आपल्या जमेच्या बाजू व अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असलेले टॉपिक जाणून घेऊन त्यावर अधिक मेहनत घेता येईल. तसेच नियमित वाचन करणे आवश्यक आहे. 

प्र3. मला सहावीच्या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती मिळेल का?

उत्तर. नक्कीच! दरवर्षी महाराष्ट्र बोर्ड हे इयत्ता 6 वी च्या परीक्षेचे आयोजन करते. महाराष्ट्र बोर्ड सहावीची वार्षिक परीक्षा अंदाजे मार्च 2023 च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अभ्यास करताना होणारी धावपळ शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे. 

प्र4. इयत्ता सहावीच्या परीक्षेमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाची परीक्षा एकत्र देऊ शकतो का?

उत्तर. होय, इयत्ता सहावीच्या परीक्षेमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाची एकत्र परीक्षा असते. 

प्र5. इयत्ता सहावी साठी विज्ञान विषयाचा एकच पेपर असतो का?

उत्तर. आपण आपल्या शंकेचे येथे नक्कीच निरसन करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीसाठी भाग एक व भाग दोन अशी दोन भागात परीक्षा घेतली जाते.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी – काय करावे आणि काय करू नये

परीक्षेची काळजी न करता आपण फक्त खालील मुद्दे लक्षात घेतल्यास, परीक्षेवरील आपला ताण कमी होण्यास नक्की मदत होईल-

काय करावे:

  • परीक्षेची तयारी करताना आपण अभ्यासक्रमाचे संपूर्ण स्वरूप जाणून घेतले पाहिजे.
  • परीक्षा देण्यापूर्वी सूचना व्यवस्थित वाचल्या पाहिजेत.
  • आपण प्राप्त केलेल्या माहितीची पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे.
  • परीक्षा द्यायला जाताना आपल्या सोबत सर्व आवश्यक साधने ठेवली पाहिजेत.
  • आपण जे शिकला आहात त्यावर पुन्हा एकदा नजर टाकण्याचा प्रयत्न करा.
  • परीक्षा सुरू होण्याआधी म्हणजेच किमान 15 मिनिटे अगोदर पोहोचा.

 काय करू नये

  • घोकंपट्टीचा कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी फारसा उपयोग होत नाही.
  • विविध टॉपिकचा अभ्यास करताना अप्रचलित पद्धती आणि युक्त्या वापरणे टाळणे चांगले आहे. 
  • परीक्षेच्या अगदी काही क्षणांआधी काहीही नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका.
  • परीक्षा सुरु होण्याअगोदर अर्धा तास तुम्ही जे वाचन केले आहेत ते आठवण्याचा प्रयत्न करा. 
  • वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना जुन्या पद्धती किंवा शॉर्टकट वापरणे टाळले पाहिजे.
  • परीक्षा देण्याच्या आधी एकाच प्रश्नाचे कोणतेही नवीन उत्तर वाचू नका.

आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेचे स्वरूप” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा