• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक

img-icon

महत्त्वाचे धडे- इयत्ता सहावीपासून माध्यमिक शिक्षण खर्‍या अर्थाने सुरू होते. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी सहावीच्या परीक्षेची तयारी करताना सर्व विषयांचा अभ्यास करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या ब्लॉगमध्ये Embibe च्या तज्ञांकडून आपल्याला इयत्ता सहावीच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून कोणते महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स आहेत यावर मार्गदर्शन केले जाईल. महत्त्वाच्या टॉपिक्सचा आधीच अभ्यास करून घेतल्याने परीक्षेची तयारी सुलभ होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते. आमचा विश्वास आहे की हा ब्लॉग वाचून आपल्याला अभ्यास करताना मदत होईल. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेविषयी :

सहावीची परीक्षा ही माध्यमिक अभ्यासक्रमाचा मुख्य पाया आहे. म्हणूनच इयत्ता सहावीमध्ये शिकविल्या जाणार्‍या सर्व अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे. या सारख्या गणित विषयातील उप-विषयांची ओळख ही सहावीमध्ये विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इयत्ता सहावीसाठी सहामाही आणि वार्षिक अशा दोन सत्रांंमध्ये परीक्षा घेतली जाते. सहामाही परीक्षा ही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांंमध्ये होते तर वार्षिक परीक्षा ही मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये घेण्यात येते. इयत्ता सहावीच्या परीक्षेचे नियोजन हे महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत प्रत्येक शाळेद्वारे करण्यात येते. सहामाही आणि वार्षिक परीक्षेमधील उत्तरांचे लेखन कशाप्रकारे करावे याविषयीच्या काही टिप्स पुढे दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता 6 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित केला जातो. आपण गणित, सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान या विषयांचा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी आपण आमच्या ब्लॉगचा संदर्भ घेऊ शकता.

खाली सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स दिलेले आहेत:

सामान्य विज्ञान मधील महत्त्वाचे टॉपिक्स

खालील तक्त्यांमध्ये सामान्य विज्ञान या विषयांतील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
नैसर्गिक संसाधने- हवा, पाणी आणि जमीन नैसर्गिक संसाधने
हवा
पाणी
जमीन
सजीव सृष्टी सजीवांची लक्षणे
वाढ
श्वसन
उत्सर्जन
प्रजनन किंवा पुनरूत्पादन
पेशीमय रचना
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण वनस्पतींची विविधता
वनस्पतीची रचना
वनस्पतींचे वर्गीकरण
आपत्ती व्यवस्थापन आपत्ती
आपत्ती व्यवस्थापन
उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय
पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म पदार्थांच्या अवस्था व अवस्थांतर
उष्णता व भौतिक अवस्थेतिल बदल
तापमान व तापमापी
पदार्थांचे गुणधर्म
आपल्या दैनंदिन वापरातील पदार्थ पदार्थ आणि वस्तू
नैसर्गिक पदार्थ
मानवनिर्मित पदार्थ
पोषण आणि आहार पोषकतत्त्वे आणि अन्नपदार्थ
संतुलित आहार कसा मिळवावा?
कुपोषण
आपली अस्थिसंस्था आणि त्वचा मानवी अस्थिसंस्था
त्वचा
गती व गतीचे प्रकार गती
गतीचे प्रकार
बल व बलाचे प्रकार बलाचे प्रकार
कार्य आणि ऊर्जा कार्य
ऊर्जेची रूपे
ऊर्जा स्त्रोत
ऊर्जा बचत व हरित ऊर्जा
साधी यंत्रे पाचर
तरफ
कप्पी
ध्वनी ध्वनी कसे निर्माण होत असतील?
ध्वनीचे प्रसारण
गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण
प्रकाश व छायानिर्मिती प्रकाशाचे संक्रमण
प्रकाशाचे परावर्तन
छाया निर्मिती
चुंबकाची गंमत चुंबक म्हणजे काय?
चुंबकत्व
विश्वाचे अंतरंग तारे
सूर्यमाला

गणित – विभाग 1 आणि विभाग 2 मधील महत्त्वाचे टॉपिक्स

खालील तक्त्यांमध्ये गणित – विभाग 1 आणि विभाग 2 मधील महत्त्वाचे टॉपिक्स या दोन्ही विषयातील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.

गणित विभाग – 1
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
भूमितीतील संबोध रेखाखंड व रेषा
समांतर रेषा
कोन कोन
पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या
विरुद्ध संख्या
अपूर्णांकांवरील क्रिया अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर
संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे
गुणाकार व्यस्त
दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक: बेरीज, वजाबाकी
व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर
दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकांत रूपांतर
स्तंभालेख आलेख कागद
स्तंभालेख काढणे
सममिती प्रतिबिंब सममिती
आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे
विभाज्यता विभाज्यतेच्या कसोट्या
लसावि-मसावि विभाजक , विभाज्य
महत्तम सामाईक (साधारण) विभाजक : मसावि
लघुतम सामाईक (साधारण) विभाज्य : लसावि
विभाग – 2
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
समीकरणे समीकरणाची उकल
गुणोत्तर – प्रमाण गुणोत्तरासंबंधी महत्त्वाच्या बाबी
एकमान पद्धती
शेकडेवारी शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात
नफा-तोटा नफा व तोटा
एकूण खरेदी व नफा-तोटा
बँक व सरळव्याज आर्थिक व्यवहार
त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोणाचे प्रकार- बाजूंवरून
त्रिकोणाचे गुणधर्म
चौकोन चौकोनाचे वाचन व लेखन
चौकोनाच्या लगतच्या बाजू
चौकोनाच्या संमुख बाजू
चौकोनाचे संमुख कोन
बहुभुजाकृती
भौमितिक रचना लंब
रेषाखंडाचा लंबदुभाजक
त्रिमितीय आकार इष्टिकाचिती
घन
त्रिकोणी चिती
वृत्तचिती (दंडगोल)
सूची
शंकू
गोल

सामाजिक शास्त्रे – इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयांमधील महत्त्वाचे टॉपिक्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि नागरीकशास्त्र व भूगोल या सर्व विषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक्स खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

विषय धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये
इतिहासाची साधने भौतिक साधने
लिखित साधने
मौखिक साधने
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृती
मुद्रा-भांडी
लोकजीवन
व्यापार
ऱ्हासाची कारणे
वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय
कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन
शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन
धर्मकल्पना
शासनव्यवस्था
प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह जैन धर्म
बौद्ध धर्म
ख्रिश्चन धर्म
इस्लाम धर्म
जनपदे आणि महाजनपदे जनपदे
महाजनपदे
मगध साम्राज्याचा उदय
मौर्यकालीन भारत ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी
मौर्य साम्राज्य
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये शुंग घराणे
इंडो-ग्रीक राजे
कुशाण राजे
ईशान्य भारतातील राजसत्ता
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी
सातवाहन राजघराणे
चालुक्य राजघराणे
राष्ट्रकूट राजघराणे
प्राचीन भारत : सांस्कृतिक भाषा आणि साहित्य
लोकजीवन
शिक्षणाची केंद्रे
स्थापत्य आणि कला
प्राचीन भारत आणि जग भारत आणि पश्चिमेकडील देश
भारत आणि आशिया खंडातील इतर देश
नागरिकशास्त्र आपले समाजजीवन माणसाला समाजाची गरज का वाटली ?
माणसातील समाजशीलता
आपला विकास
समाज म्हणजे काय ?
समाजातील विविधता विविधता हीच आपली ताकद
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व
आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग
समाजाचे नियमन
ग्रामीण स्थानिक शासन संस्था ग्रामपंचायत
पंचायत समिती
जिल्हा परिषद
शहरी स्थानिक शासन संस्था नगरपंचायत
नगरपरिषद
महानगरपालिका
जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी
जिल्हा पोलीस प्रमुख
जिल्हा न्यायालय
भूगोल पृथ्वी आणि वृत्ते कोनीय अंतर
अक्षवृत्ते
रेखावृत्ते
चला वृत्ते वापरूयात ! महत्त्वाची वृत्ते
पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट भौगोलिक सहल (क्षेत्रभेट)
हवा व हवामान हवा
हवेची अंगे
तापमान तापमान कक्ष
महासागरांचे महत्त्व महासागर व संसाधने
महासागर व वाहतूक
खडक व खडकांचे प्रकार खडकांचे प्रकार
नैसर्गिक संसाधने मृदा
ऊर्जा साधने ऊर्जा संसाधनांचे वर्गीकरण
पदार्थावर आधारित ऊर्जा साधने
प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने
मानवाचे व्यवसाय प्राथमिक व्यवसाय
द्‌वितीयक व्यवसाय
तृतीयक व्यवसाय
चतुर्थक व्यवसाय
आर्थिक उलाढाल

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र शिक्षण मंडळांतर्गत असणार्‍या इयत्ता 6 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिकवर दिले आहेत. शिक्षण मंडळाने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील महाराष्ट्र बोर्डद्वारे प्रकाशित केले जातात. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 – अभ्यासासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • दररोजच्या आपल्या अभ्यासाच्या वेळा निश्चित करा. 
  • आपण एक उत्तम वेळापत्रक तयार करून देखील अभ्यासाची तयारी करू शकता 
  • शालेय अभ्यासासोबतच स्वयंअध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा. 
  • आपल्या अभ्यासक्रमातील दीर्घोत्तरी उत्तर लेखनाचा भरपूर सराव करा जेणेकरून आपल्याला परीक्षेत गुणांनुसार प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल. 
  • आपल्या रोजच्या अभ्यासासोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या प्रश्नांचा सराव करा. 
  • व्यायाम आणि विश्रांतीसाठी नियमित ब्रेक घ्या त्यामुळे आपण नेहमीच उत्साही आणि आनंदी राहाल.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 महत्त्वाचे टॉपिक्स – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. मला इयत्ता सहावीच्या गणित आणि सामान्य विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स कोठे मिळतील. 

उत्तरः या ब्लॉगमध्ये इयत्ता सहावीच्या गणित आणि सामान्य विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स दिलेले आहेत. तसेच या टॉपिकवरील प्रश्न, व्हिडिओ देखील आमच्या Embibe या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. 

प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीचा अभ्यासक्रम मला कोठे सापडेल?

उत्तरः इयत्ता सहावीचा तपशीलवार अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी आपण www.embibe.com या आमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट देऊ शकतात.

प्र 3. महाराष्ट्र बोर्ड सहावीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेण्याचे काय फायदे आहेत?

उत्तरः इयत्ता सहावीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेतल्यास, विद्यार्थ्यांना जास्त महत्त्वाचे असलेल्या धड्यांचा किंवा टॉपिकचा अभ्यास करणे सोपे होते, तसेच ते परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करू शकतात आणि जास्तीत जास्त गुण सहजपणे मिळवू शकतात.

प्र 4. मी भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स कसे जाणून घेऊ शकतो?

उत्तर: भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्सचे महाराष्ट्र बोर्डकडून विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण करून देण्यात आले आहे जसे की, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, व्याकरण इत्यादी. 

प्र 5. मला महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास कोठून करता येईल?

उत्तर: विद्यार्थी आमच्या महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023-परीक्षेचा अभ्यासक्रम या ब्लॉगमधून इयत्ता सहावीच्या परीक्षेसाठी विषयवार अभ्यास करू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.

आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: महत्त्वाचे धडे” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा. 

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा