
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023: परीक्षेचे स्वरूप
August 22, 2022बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेची भीती वाटत असते त्यामुळे परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थी गोंधळलेल्या परिस्थितीत असतात. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेला घाबरून न जाता नियमित अभ्यास केला पाहिजे तसेच त्यांच्या पालकांकडून तसेच शिक्षकांकडून त्यांच्या परीक्षेत यश कसे मिळवायचे याबद्दल टिप्स घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेची कितीही चांगली तयारी केली असली तरी, जर त्यांचे ज्ञान ते उत्तरपत्रिकेवर योग्य पद्धतीने मांडू शकले नाहीत तर त्यांची सर्व मेहनत वाया जाते, ही मेहनत वाया जाऊ नये यासाठी Embibe च्या तज्ञांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीच्या परीक्षेत उत्तर लेखनाची मार्गदर्शक तत्त्वे यावर आधारित ब्लॉग आपल्याकरिता लिहिला आहे.
या ब्लॉगमधील टिप्स आपल्याला आपल्या वेळेचे नियोजन करण्यात, आपले उत्तर लेखनाचे कौशल्य सुधारण्यात आणि चांगले गुण मिळवण्यात मदत करतील.
परीक्षा आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आणि ह्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायरी असतात. चांगले गुण मिळवणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते आणि यासाठी त्यांना वर्षभर मेहनत घेणे अतिशय आवश्यक असते.
दरवर्षी सर्व शाळा इयत्ता 6 वी ची परीक्षा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करतात आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतात. इयत्ता सहावीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात; सहामाही परीक्षा अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते, तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षांच्या अगोदर घटक चाचणी देखील घेतली जाते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील केले पाहिजे.
इयत्ता 6 वी च्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या परीक्षेतील प्रत्येक पेपर 100 गुणांचा असतो. 80 गुण लेखी परीक्षेकरिता आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात. परंतु इयत्ता 6 वी च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विषयानुसार वेगवेगळे असते. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, जोड्या जुळवा, कारणे द्या, वेगळा शब्द लिहा, रिकाम्या जागा भरा, शाब्दिक उदाहरणे आणि निबंध लेखन असे प्रश्न समाविष्ट केलेले असतात.
विषय | गुणांचे वितरण |
---|---|
भाषा विषय | 100 (80+ 20) |
इंग्रजी | 100 (80+ 20) |
गणित | 100 (80+ 20) |
सामान्य विज्ञान | 100 (80+ 20) |
सामाजिक शास्त्र | 100 (80+ 20) |
विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता कितीही तयारी केली तरी मुख्य परीक्षेच्या वेळी लिहिलेले उत्तर कशा प्रकारचे आहे, त्यावर गुणांकन अवलंबून असते. असे अनेकवेळा दिसून येते की, परीक्षेत उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांना अधिक ताण येतो. परिणामी आलेल्या ताणामुळे केलेला अभ्यास विसरण्याची शक्यता असते. अशा वेळेस विद्यार्थ्यांची उत्तर लेखनाची पद्धत नेमकी कशी असावी हे आपण पाहू:
प्रत्येक परीक्षेपूर्वी उजळणी महत्त्वाची असते. म्हणूनच परीक्षेकरिता निश्चित केलेल्या अभ्यासक्रमामधील महत्त्वाच्या धड्यांची तसेच कॉन्सेप्टची एक यादी तयार करा आणि त्या धड्यांची उजळणी प्रथम करण्यास प्राधान्य द्या. महत्त्वाचे मुद्दे, व्याख्या आणि सूत्रे यांची नेहमी आपल्या वहीत नोंद ठेवा. अभ्यासाची सुरुवात एखाद्या सोप्या विषयाने करा जेणेकरून आपली आवड आणि एकाग्रता वाढेल. कोणत्याही विषयाकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण आपल्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषय महत्त्वाचा असतो. म्हणून, प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घ्या, आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपल्या शिक्षकांशी बोला.
आपण जेवढी अधिक उजळणी कराल तेवढे सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी तयार व्हाल. परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:ची चाचणी तयार करून सोडवून पाहणे. विद्यार्थ्यांनी नेहमी तोंडी उत्तरे सांगण्याऐवजी उत्तरे लिहून पाहण्याचा अधिक सराव करायला पाहिजे, असे केल्याने महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आणि शुद्धलेखन, व्याकरण आणि हस्ताक्षर सुधारण्यात मदत होते.
अधिकतर विद्यार्थ्यांना विचारलेला प्रश्न योग्य प्रकारे समजत नाही. बरेचदा विद्यार्थी केवळ प्रश्नपत्रिका वाचतात आणि उत्तरे लिहिण्यास सुरुवात करतात, अशा पद्धतीची उत्तरे शिक्षकांच्या लगेच लक्षात येतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आधी प्रश्न समजून घेतला पाहिजे. जे प्रश्न सोपे वाटतात ते आधी सोडवून घ्या जेणेकरून ताण कमी येईल. तसेच प्रश्न ज्या स्वरूपाचा विचारला आहे, त्याच स्वरूपामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणतेही उत्तर लिहिताना उत्तराची प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि शेवट या तीन पायर्यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या उत्तर लेखनामुळे विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांमध्ये उत्तरे लिहिण्याची सवय होण्यास मदत होते.
परीक्षेची तयारी करताना, आपल्या सोबतच्या मित्राची किती तयारी झालेली आहे हे अजिबात जाणून घेऊ नका. प्रत्येक विद्यार्थ्याची स्मरणशक्ती ही भिन्न असते. परंतु विद्यार्थ्यांना आपली अभ्यासातील क्षमता माहीत असते, म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या क्षमतेनुसार वेळेचे नियोजन केले पाहिजे. त्यामुळे शुद्धलेखन, व्याकरण आणि हस्ताक्षर सुधारण्यात फायदा होतो.
दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. प्रश्नाच्या आवश्यकतेनुसार आपले उत्तर मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अनावश्यक माहिती देणाऱ्या मोठ्या परिच्छेदांचे लेखन करणे टाळा. आपले उत्तर परीक्षकाला लगेच समजेल असे ठेवा.
सर्व प्रश्न सोडवा:
आपल्याला हे माहीत आहे की, चुकीच्या उत्तरांकरिता परीक्षेमध्ये गुण वजा केले जात नाहीत. त्यामुळे ज्या प्रश्नांबद्दल आपल्याला आत्मविश्वास नाही अशा प्रश्नांची उत्तरे देण्यास घाबरू नका, कारण चुकीचे उत्तर देऊन सुद्धा आपण आपले गुण गमवणार नाही.
1. प्रश्न काळजीपूर्वक वाचा.
2. कठीण वाटणारे प्रश्न किमान दोन वेळा वाचा आणि व्यवस्थित समजून घ्या.
3. सोपे असणारे प्रश्न आधी सोडवून घ्या जेणेकरून आत्मविश्वास वाढेल आणि ताण कमी होईल.
4. प्रश्नाचे स्वरूप काय आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
5. जर आपल्याला संबंधित प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर लिहा आणि जर आपल्याला उत्तर माहीत नसेल तर थोडा विचार करून त्याप्रश्नाचे उत्तर काय असेल याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करा.
6. परीक्षक उत्तरपत्रिका तपासत असताना कायम त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आवश्यक असलेले मुख्य शब्द तसेच मुख्य संज्ञा पाहण्यास प्रथम प्राधान्य देतात.
7. शेवटची 10 मिनिटे राहिल्यास आपण उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहिले ते वाचून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या चुका सुधारता येतील.
प्र 1. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेसाठी मला सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे का?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. या परीक्षेमध्ये कोणत्याही चुकीच्या उत्तराकरिता गुण वजा केले जात नसल्याने आपण प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्र 2. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्यासाठी मला सहावीमध्ये किती टक्के मिळवावे लागतील?
उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.
प्र 3. विज्ञान आणि गणित या विषयांची उत्तरे मी अधिक चांगल्या पद्धतीने कशी लिहू शकतो?
उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांची उत्तरे अधिक योग्य प्रकारे लिहिण्याकरिता आपल्याला प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या सहाय्याने आणि मुद्देसूद लिहिणे आवश्यक आहे.
प्र 4. कोणतेही सूत्र किंवा कॉन्सेप्ट आपण लक्षात ठेवण्यासाठी काय करावे?
उत्तर. समजा इंद्रधनुष्याचे रंग विचारले असतील तर ते “जाताना पानी पीही” म्हणजे जा – जांभळा, ता-तांबडा, ना- नारिंगी, पा- पारवा, नी- निळा, पी -पिवळा, ही- हिरवा अशी वाक्य रचना करून लक्षात ठेवले पाहिजे. जेणेकरून सूत्र आणि कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी आपला गोंधळ होणार नाही.
प्र.5. इयत्ता सहावीच्या परीक्षेत गुण वजा केले जातात का?
उत्तर. नाही, चुकीच्या उत्तरांकरिता परीक्षेमध्ये गुण वजा केले जात नाहीत.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी-काय करावे आणि काय करू नये
पाचवीनंतर आता सहावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे हा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल. आपण स्वतः तयारीसाठी, सरावासाठी जास्तीत जास्त वेळ देणे हे केव्हाही उत्तम असते. यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे नियमितता आणि शिस्त! अभ्यास सत्रांदरम्यान, आपल्या विचारांना थोडा विराम द्या. स्वतःवर आणि आपल्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परिणामांची पर्वा न करता आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. आपण खालील मुद्दे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्या सहावीच्या अभ्यासाचे नियोजन करा:
काय करावे:
काय करू नये
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023-परीक्षेची उत्तर लेखनाची मार्गदर्शक तत्त्वे” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.