• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 – परीक्षेचा अभ्यासक्रम

img-icon

परीक्षेचा अभ्यासक्रम- महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीची पाठ्यपुस्तके ही महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमावर तसेच सर्वात अलीकडील सुधारित आणि अद्ययावत टेस्ट पॅटर्नवर आधारित आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता इयत्ता 6 वी ची पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्राथमिक तारखा आणि खाली दिलेल्या माहितीचे अवलोकन केले पाहिजे. इयत्ता 6 वी ची परीक्षा अंदाजे मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल.

परीक्षेविषयी-

सहावीची परीक्षा ही माध्यमिक अभ्यासक्रमाचा मुख्य पाया आहे. म्हणूनच इयत्ता सहावीमध्ये शिकविल्या जाणार्‍या सर्व अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे. यासारख्या गणित विषयातील उप-विषयांची ओळख ही सहावीमध्ये विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इयत्ता सहावीसाठी सहामाही आणि वार्षिक अशा दोन सत्रांंमध्ये परीक्षा घेतली जाते. सहामाही परीक्षा ही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांंमध्ये होते तर वार्षिक परीक्षा ही मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये घेण्यात येते. इयत्ता सहावीच्या परीक्षेचे नियोजन हे महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत प्रत्येक शाळेद्वारे करण्यात येते. सहामाही आणि वार्षिक परीक्षेमधील उत्तरांचे लेखन कशाप्रकारे करावे याविषयीच्या काही टिप्स पुढे दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023- सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळाने कशाप्रकारे अभ्यासक्रम निश्चित केला आहे ते आपण पाहूया. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता सहावीचा सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे-

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
नैसर्गिक संसाधने- हवा, पाणी आणि जमीन नैसर्गिक संसाधने
हवा
पाणी
जमीन
मृदा निर्मितीची क्रिया
सजीव सृष्टी सजीवांची लक्षणे
वाढ
वाढीसाठी अन्नाची गरज
श्वसन
उत्सर्जन
चेतनाक्षमता व हालचाल
प्रजनन किंवा पुनरूत्पादन
ठराविक आयुर्मान
पेशीमय रचना
उपयुक्त सजीव वस्तू
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण वनस्पतींची विविधता
वनस्पतीची रचना
वनस्पतींचे वर्गीकरण
प्राणी विविधता आणि वर्गीकरण
आपत्ती व्यवस्थापन आपत्ती
पुढील आपत्ती कशा व का येतात?
आपत्ती व्यवस्थापन
उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाय
पदार्थ सभोवतालचे- अवस्था आणि गुणधर्म पदार्थांच्या अवस्था व अवस्थांतर
उष्णता व भौतिक अवस्थेतिल बदल
तापमान व तापमापी
संप्लवन
पदार्थांचे गुणधर्म
धातू
आपल्या दैनंदिन वापरातील पदार्थ पदार्थ आणि वस्तू
नैसर्गिक पदार्थ
मानवनिर्मित पदार्थ
पदार्थांची निर्मिती
पोषण आणि आहार पोषकतत्त्वे आणि अन्नपदार्थ
संतुलित आहार कसा मिळवावा?
कुपोषण
आपली अस्थिसंस्था आणि त्वचा मानवी अस्थिसंस्था
त्वचा
गती व गतीचे प्रकार गती
गतीचे प्रकार
बल व बलाचे प्रकार बलाचे प्रकार
कार्य आणि ऊर्जा कार्य
कार्य- ऊर्जा संबंध
ऊर्जेची रूपे
ऊर्जेचे रूपांतरण
ऊर्जा स्त्रोत
ऊर्जा बचत व हरित ऊर्जा
साधी यंत्रे उतरण
पाचर
तरफ
कप्पी
चाक आणि आस
ध्वनी ध्वनी कसे निर्माण होत असतील?
ध्वनी कसा ऐकू येतो?
ध्वनीचे प्रसारण
गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण
प्रकाश व छायानिर्मिती प्रकाशाचे संक्रमण
प्रकाशाचे परावर्तन
छाया निर्मिती
चुंबकाची गंमत चुंबक म्हणजे काय?
चुंबकत्व
चुंबकाची वैशिष्टट्ये
विश्वाचे अंतरंग तारे
सूर्यमाला

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 – गणित अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी चा गणित हा विषय दोन भागांमध्ये विभागला आहे. गणित विभाग – 1 आणि  गणित विभाग – 2 या दोन्ही भागांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 
2022-23 या सत्राकरिता इयत्ता सहावीचा गणित विभाग- 1 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
भूमितीतील मूलभूत संबोध रेखाखंड व रेषा
समांतर रेषा
कोन कोन
पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या
पूर्णांक संख्यांची बेरीज
विरुद्ध संख्या
पूर्णांक संख्यांचा लहान-मोठेपणा
पूर्णांक संख्यांची वजाबाकी
अपूर्णांकांवरील क्रिया अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर
संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवणे
अपूर्णांकांचा गुणाकार
गुणाकार व्यस्त
अपूर्णांकांचा भागाकार
दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक: बेरीज, वजाबाकी
व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर
दशांश अपूर्णांकांचे व्यवहारी अपूर्णांकांत रूपांतर
दशांश अपूर्णांकांचा गुणाकार
दशांश अपूर्णांकांचा भागाकार
स्तंभालेख आलेख कागद
स्तंभालेख काढणे
सममिती प्रतिबिंब सममिती
आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे
विभाज्यता विभाज्यतेच्या कसोट्या
मसावि-लसावि विभाजक , विभाज्य
महत्तम सामाईक (साधारण) विभाजक : मसावि
लघुतम सामाईक (साधारण) विभाज्य : लसावि

2022-23 या सत्राकरिता इयत्ता सहावीचा गणित विभाग – 2 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
समीकरणे समीकरणाची उकल
गुणोत्तर – प्रमाण गुणोत्तरासंबंधी महत्त्वाच्या बाबी
एकमान पद्धती
शेकडेवारी शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात
नफा-तोटा नफा व तोटा
एकूण खरेदी व नफा-तोटा
बँक व सरळव्याज आर्थिक व्यवहार
त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म त्रिकोणाचे प्रकार- बाजूंवरून
त्रिकोणाचे गुणधर्म
चौकोन चौकोनाचे वाचन व लेखन
चौकोनाच्या लगतच्या बाजू
चौकोनाच्या संमुख बाजू
चौकोनाचे लगतचे कोन
चौकोनाचे संमुख कोन
चौकोनाचा कर्ण
बहुभुजाकृती
भौमितिक रचना लंब
रेषाखंडाचा लंबदुभाजक
त्रिमितीय आकार इष्टिकाचिती
घन
त्रिकोणी चिती
वृत्तचिती (दंडगोल)
सूची
शंकू
गोल

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 – सामाजिक शास्त्रे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 6 वी चा सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

विषय धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
इतिहास भारतीय उपखंड आणि इतिहास इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये
भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये
भारतीय उपखंड
इतिहासाची साधने भौतिक साधने
लिखित साधने
मौखिक साधने
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी
हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृती
घरे आणि नगररचना
मुद्रा-भांडी
महास्नानगृह
लोकजीवन
व्यापार
ऱ्हासाची कारणे
वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय
कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवन
शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन
धर्मकल्पना
शासनव्यवस्था
प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह जैन धर्म
बौद्ध धर्म
ज्यू धर्म
ख्रिश्चन धर्म
इस्लाम धर्म
पारशी धर्म
जनपदे आणि महाजनपदे जनपदे
महाजनपदे
मगध साम्राज्याचा उदय
मौर्यकालीन भारत ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी
मौर्य साम्राज्य
मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये शुंग घराणे
इंडो-ग्रीक राजे
कुशाण राजे
गुप्त राजघराणे
वर्धन राजघराणे
ईशान्य भारतातील राजसत्ता
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी
सातवाहन राजघराणे
वाकाटक राजघराणे
चालुक्य राजघराणे
पल्लव राजघराणे
राष्ट्रकूट राजघराणे
प्राचीन भारत : सांस्कृतिक भाषा आणि साहित्य
लोकजीवन
विज्ञान
शिक्षणाची केंद्रे
स्थापत्य आणि कला
प्राचीन भारत आणि जग भारत आणि पश्चिमेकडील देश
भारत आणि आशिया खंडातील इतर देश
नागरिकशास्त्र आपले समाजजीवन माणसाला समाजाची गरज का वाटली ?
माणसातील समाजशीलता
आपला विकास
समाज म्हणजे काय?
समाजातील विविधता विविधता हीच आपली ताकद
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व
आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग
समाजाचे नियमन
ग्रामीण स्थानिक शासन संस्था ग्रामपंचायत
पंचायत समिती
जिल्हा परिषद
शहरी स्थानिक शासन संस्था नगरपंचायत
नगरपरिषद
महानगरपालिका
जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी
जिल्हा पोलीस प्रमुख
जिल्हा न्यायालय
भूगोल पृथ्वी आणि वृत्ते कोनीय अंतर
अक्षवृत्ते
रेखावृत्ते
वृत्तजाळी
चला वृत्ते वापरूयात ! महत्त्वाची वृत्ते
पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट भौगोलिक सहल (क्षेत्रभेट)
हवा व हवामान हवा
हवेची अंगे
तापमान तापमान कक्ष
महासागरांचे महत्त्व महासागर व संसाधने
महासागर व वाहतूक
खडक व खडकांचे प्रकार खडकांचे प्रकार
नैसर्गिक संसाधने मृदा
ऊर्जा साधने ऊर्जा संसाधनांचे वर्गीकरण
पदार्थावर आधारित ऊर्जा साधने
प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने
मानवाचे व्यवसाय प्राथमिक व्यवसाय
द्‌वितीयक व्यवसाय
तृतीयक व्यवसाय
चतुर्थक व्यवसाय
आर्थिक उलाढाल

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता शिक्षण मंडळाचा इयत्ता 6 वी चा संपूर्ण अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेण्यासाठी आपण आमच्या www.embibe.com या लिंकवर क्लिक करा. बोर्डाने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023 अभ्यासक्रम- वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. मला इयत्ता सहावीचा गणित विषयाचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे, मी काय करावे?

उत्तर. जर आपल्याला गणित विषयाचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचा असेल तर आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची मदत घेऊ शकता किंवा https://www.embibe.com/user-home या वेबसाईटला भेट देऊन Embibe स्पष्टीकरणकर्त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या शंकांचे निरसन झाले नाही तर आपण Embibe च्या शंका निरसन केंद्राची मदत घेऊ शकता. 

प्र 2. सामान्य विज्ञान आणि गणित या विषयांचा मी अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम कसा करू शकतो? 

उत्तर. सामान्य विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपली पुस्तके मदत करतील. परंतु अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी Embibe वर आपल्याला व्हिडीओ उत्तरांसह पुस्तके येथे मिळतील. त्यामुळे 3D इंटरॅक्टिव्ह व्हिडिओंद्वारे, प्रॅक्टिस करून आणि टेस्ट देऊन आपण अभ्यास केला पाहिजे. 

प्र 3. इयत्ता सहावीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?

उत्तर. इयत्ता 6 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 6 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते. 

प्र 4. 6 वी च्या परीक्षेमध्ये कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?

उत्तर. 6 वी च्या परीक्षेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आणि काही अनिवार्य भाषा विषय इत्यादी समाविष्ट केलेले आहेत. 

प्र 5. इयत्ता 6 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? 

उत्तर. इयत्ता 6 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करून त्याची वेळोवेळी उजळणी केली पाहिजे असे केल्याने आपण आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करू शकता. 

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावी 2023- परीक्षेचा अभ्यासक्रम” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्याकरिता उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सहावीबद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा