
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक्स
August 22, 2022महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023- परीक्षेचे स्वरूप
परीक्षेचे स्वरूप: आता नवीन शैक्षणिक वर्षे सुरु होत आहे. पुन्हा नवीन जोमाने आपल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करायची आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना प्रत्येक विषयाच्या नवीन परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेची तयारी करत असताना यामध्ये परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांना अभ्यासाचे सुसूत्र नियोजन करण्यास मदत मिळते. या ब्लॉगमध्ये आपण Embibe च्या तज्ञांकडून याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया.
परीक्षेविषयी: इयत्ता सातवीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरुवातीला काही दिवस आपल्याला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी जेणेकरून या वर्षी अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी करणे सोयीचे व्हावे यासाठीच हा Embibe प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या इयत्तेतील कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी हा Embibe प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या इयत्तेध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इतिहास, नागरीकशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 7 वी मध्ये तयार होतो.
दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 7 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांत 2023 च्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता सातवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन वेळा घटक चाचणी घेतली जाते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण अभ्यास सामग्रीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण बोर्ड देखील वेळोवेळी आपल्या इयत्तांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यक्रमात बदल करते. परिणामी, आज महाराष्ट्राकडे एक उत्तम, कार्यक्षम आणि आकर्षक शैक्षणिक व्यवस्था कार्यरत आहे.
आपण विषयानुसार महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीचा अनुक्रमे भाषा, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे यांचा अभ्यासक्रम अधिक सविस्तर पाहूया.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – भाषा अभ्यासक्रम
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|
1 | जय जय महाराष्ट्र माझा (गीत) – राजा बढे |
2 | स्वप्नं विकणारा माणूस – अशोक कोतवाल |
3 | तोेडणी – दत्तात्रय विरकर |
4 | श्रावणमास (कविता) – बालकवी |
5 | भांड्यांच्या दुनियेत |
6 | थोरांची ओळख – डॉ. खानखोजे |
7 | माझी मराठी (कविता) – मृणालिनी कानिटकर-जोशी |
8 | गचकअंधारी – अशोक मानकर |
9 | नात्याबाहेरचं नातं – सुभाष किन्होळकर |
10 | गोमू माहेरला जाते (गीत) – ग. दि. माडगूळकर |
11 | बाली बेट – पु. ल. देशपांडे |
12 | सलाम-नमस्ते ! – सुधा मूर्ती |
13 | अनाम वीरा… (कविता) – कुसुमाग्रज |
14 | कवितेची ओळख – शारदा दराडे |
15 | असे जगावे (कविता) – गुरू ठाकूर |
16 | कोळीण – मारुती चितमपल्ली |
17 | थेंब आज हा पाण्याचा (कविता) – सुनंदा भावसार |
18 | वदनी कवळ घेता… |
19 | धोंडा – डॉ. संजय ढोले |
20 | विचारधन |
21 | संतवाणी – संत नरहरी सोनार संत कान्होपात्रा |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – इंग्रजी अभ्यासक्रम
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|
1 | It’s a small world… |
2 | Warm up with Tara and Friends |
3 | Little Girls Wiser than Old People |
4 | Journey to the West |
5 | Children are going to school |
6 | In a Class of their own ! |
7 | We shall overcome … |
8 | Two Fables |
9 | Teeny-tiny |
10 | Putting together a Class Magazine |
11 | Windy Lines |
12 | Great scientists have a questioning mind |
13 | Sleep, Baby, Sleep ! |
14 | The Welcome |
15 | News Analysis |
16 | Please don’t read this poem ! |
17 | The Red-headed League |
18 | Double Standards |
19 | Baby Pangolin’s Night Out |
20 | Chasing the Sea Monster |
21 | A Parody |
22 | From The Selfish Giant |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – सामान्य विज्ञान अभ्यासक्रम
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|
1 | सजीव सृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण |
2 | वनस्पती: रचना व कार्ये |
3 | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म |
4 | सजीवांतील पोषण |
5 | अन्नपदार्थांची सुरक्षा |
6 | भौतिक राशींचे मापन |
7 | गती, बल व कार्य |
8 | स्थितिक विद्युत |
9 | उष्णता |
10 | आपत्ती व्यवस्थापन |
11 | पेशीरचना आणि सूक्ष्मजीव |
12 | मानवी स्नायू व पचनसंस्था |
13 | बदल : भौतिक व रासायनिक |
14 | मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे |
15 | पदार्थ : आपल्या वापरातील |
16 | नैसर्गिक साधनसंपत्ती |
17 | प्रकाशाचे परिणाम |
18 | ध्वनी : ध्वनीची निर्मिती |
19 | चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म |
20 | तारकांच्या दुनियेत |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – गणित अभ्यासक्रम
गणित भाग 1 | |
---|---|
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
1 | भौमितिक रचना |
2 | पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार |
3 | मसावि – लसावि |
4 | कोन व कोनांच्या जोड्या |
5 | परिमेय संख्या आणि त्यांवरील क्रिया |
6 | घातांक |
7 | जोडस्तंभालेख |
8 | बैजिक राशी व त्यांवरील क्रिया |
गणित भाग 2 | |
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
9 | समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण |
10 | बँक व सरळव्याज |
11 | वर्तुळ |
12 | पारमिती व क्षेत्रफळ |
13 | पायथागोरसचा सिद्धांत |
14 | बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार |
15 | सांख्यिकी |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रम
विषयाचे नाव | अनु. क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|---|
इतिहास |
1 | इतिहासाची साधने |
2 | शिवपूर्वकालीन भारत | |
3 | धार्मिक समन्वय | |
4 | शिवपूर्वकालीन महाराष्ट्र | |
5 | स्वराज्यस्थापना | |
6 | मुघलांशी संघर्ष | |
7 | स्वराज्याचा कारभार | |
8 | आदर्श राज्यकर्ता | |
9 | मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम | |
10 | मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार | |
11 | राष्ट्ररक्षक मराठे | |
12 | साम्राज्याची वाटचाल | |
13 | महाराष्ट्रातील समाजजीवन | |
14 | महाराष्ट्र राज्याची निर्मिती | |
नागरिकशास्त्र |
1 | आपल्या संविधानाची ओळख |
2 | संविधानाची उद्देशिका | |
3 | संविधानाची वैशिष्टे | |
4 | मूलभूत हक्क भाग-1 | |
5 | मूलभूत हक्क भाग-2 | |
6 | मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये | |
भूगोल | 1 | ॠतुनिर्मिती (भाग-1) |
2 | सूर्य, चंद्र व पृथ्वी | |
3 | भरती-ओहोटी | |
4 | हवेचा दाब | |
5 | वारे | |
6 | नैसर्गिक प्रदेश | |
7 | मृदा | |
8 | ॠतुनिर्मिती (भाग-2) | |
9 | कृषी | |
10 | मानवी वस्ती | |
11 | समोच्च रेषा नकाशा आणि भूरूप |
परीक्षेचे वेळापत्रक: ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येते. प्रथम सत्राच्या शेवटी सहामाही परीक्षा घेण्यात येते तर द्वितीय सत्राच्या शेवटी वार्षिक परीक्षा होते. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेच्या आधी घटक चाचणी घेतली जाते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चे वेळापत्रक प्रत्येक शाळा निश्चित करत असतात. प्रथम सत्र परीक्षा अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होते व द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा अंदाजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते.
प्रश्नपत्रिकेचा कालावधी विषयाच्या एकूण गुण मूल्यांकनानुसार प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी साधारण 2 तास (40 गुण) किंवा 3 तास (80 गुण) याप्रमाणे निश्चित केलेला असतो. तसेच घटक चाचणी ही 1 तास (20 गुण ) याप्रमाणे घेतली जाते. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रश्न कशाप्रकारे सोडवता येतील याचे नियोजन आणि सराव केला पाहिजे.
परीक्षेचे विषयानुसार स्वरूप: प्रत्येक विषयानुसार महाराष्ट्र बोर्डद्वारे परीक्षेचे स्वरूप निश्चित केले जाते जसे की, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे, भाषा – मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, इत्यादी. सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान 35 टक्के गुण व सराव चाचणीमध्ये 11 गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
भाषा विषय – प्रश्नपत्रिकेच्या गुणांचे मूल्यांकन
1. भाषा विषयांकरिता बोर्डाद्वारे काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन गुणांचे वितरण केले जाते ते खालीलप्रमाणे आहे.
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
वाचन कौशल्य (पाठ्यपुस्तकावर आधारित व त्याव्यतिरिक्त) | 40% |
व्याकरण | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
सामान्य विज्ञान विषयाच्या परीक्षेची रूपरेषा: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या सामान्य विज्ञान विषयासाठी पाठ्यपुस्तकात एकूण 20 धड्यांचा समावेश करण्यात आलेला असून यातील पहिली 10 धडे प्रथम सत्रासाठी तर उर्वरीत 10 धडे द्वितीय सत्रासाठी दिलेले आहेत. शिक्षकांनी सामान्य विज्ञान हा विषय शिकवताना ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे की विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी एकात्मिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच आपण सातत्याने अध्यापन करायचे आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना या विषयाच्या अभ्यासाचे वार्षिक नियोजन करणे सहज व्हावे यासाठी पुढे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत.
प्रथम सत्र व द्वितीय सत्र यानुसार केलेले धड्यांचे नियोजन:
सामान्य विज्ञान
प्रथम सत्र
धड्याचा क्र. | धड्याचे नाव | धड्याचा क्र. | धड्याचे नाव |
---|---|---|---|
1 | सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण | 6 | भौतिक राशींचे मापन |
2 | वनस्पती : रचना व कार्ये | 7 | गती, बल व कार्य |
3 | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म | 8 | स्थितिक विद्युत |
4 | सजीवांतील पोषण | 9 | उष्णता |
5 | अन्नपदार्थांची सुरक्षा | 10 | आपत्ती व्यवस्थापन |
सामान्य विज्ञान
द्वितीय सत्र
धड्याचा क्र. | धड्याचे नाव | धड्याचा क्र. | धड्याचे नाव |
---|---|---|---|
11 | पेशीरचना आणि सूक्ष्मजीव | 15 | नैसर्गिक साधनसंपत्ती |
12 | मानवी स्नायू व पचनसंस्था | 16 | प्रकाशाचे परिणाम |
13 | बदल : भौतिक व रासायनिक | 17 | ध्वनी : ध्वनीची निर्मिती |
14 | मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे | 18 | चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म |
19 | पदार्थ : आपल्या वापरातील | 20 | तारकांच्या दुनियेत |
गुणांचे वितरण – टक्केवारीमध्ये
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
लेखी | 40% |
प्रात्यक्षिक परीक्षा | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
गणित विषयाच्या परीक्षेची रूपरेषा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीच्या गणित विषयाचे गणित – भाग 1 आणि गणित – 2 अशा दोन भागांमध्ये विभाजन केलेले आहे.
1. गणित विषयाला एकूण 100 गुण असतात.
2. गणित – भाग 1 आणि गणित – 2 अशा या दोन्ही भागांचे प्रत्येकी 40-40 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण अंतर्गत स्वाध्यायाकरिता निश्चित करून असे एकूण 100 गुणांचे विभाजन केलेले असते.
3. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 100 पैकी 35 गुण मिळवणे आवश्यक असते.
विषय | गुणांचे वितरण |
---|---|
भाषा विषय | 100 (80+20) |
इंग्रजी | 100 (80+20) |
गणित | 100 (80+20) |
सामान्य विज्ञान | 100 (80+20) |
सामाजिक शास्त्र | 100 (80+20) |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी 2023 या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या टिप्स शेअर केल्या आहेत. येथे काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत; त्या विचारात घेऊन त्यांचा उत्तम उपयोग करा. या परीक्षेच्या तयारीसाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवा.
अभ्यासातील नियमितपणा आणि शिस्त:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.
संपूर्ण तयारी:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्या धड्यांचे दररोज एकदा उजळणी केली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रॅक्टिस:
प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रश्नपत्रिका कशी वाचायची आणि आवश्यक थीम कशा ओळखायच्या हे आपण शिकाल. परीक्षेदरम्यान आपल्या वेळेचा वापर कसा करायचा हे देखील आपण शिकाल. तसेच उत्तरपत्रिका आपण कशा पद्धतीने लिहिली पाहिजे या बद्धल पण शिकाल.
प्र1. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्यासाठी मला आठवीमध्ये किती टक्के मिळवावे लागतील?
उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.
प्र2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेसाठी मला अभ्यासाचे नियोजन कसे करावे लागेल?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण शक्य तितक्या अधिक सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवल्या पाहिजे व त्यावरून आपण आपल्या जमेच्या बाजू व अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असलेले टॉपिक जाणून घेऊन त्यावर अधिक मेहनत घेता येईल.
प्र3. मला सातवीच्या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती मिळेल का?
उत्तर. नक्कीच! दरवर्षी महाराष्ट्र बोर्ड हे इयत्ता 7 वी च्या परीक्षेचे आयोजन करते. महाराष्ट्र बोर्ड सातवीची वार्षिक परीक्षा अंदाजे मार्च 2023 च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे अभ्यास करताना होणारी धावपळ शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
प्र4. इयत्ता सातवीच्या परीक्षेमध्ये हिंदी आणि संस्कृत अशा दोन्ही विषयाच्या परीक्षा देऊ शकतो का?
उत्तर. होय, इयत्ता सातवीच्या परीक्षेमध्ये आपण आपल्या इच्छेनुसार 50-50 गुणांच्या हिंदी व संस्कृत अशा दोन्ही परीक्षेला बसू शकतात. आपल्याला जर दोघांपैकी एकाच विषयात रुची असेल तर आपण तो विषय 100 गुणांसाठी घेऊ शकतात.
प्र5. इयत्ता सातवीसाठी सामान्य विज्ञान विषयाचा एकच पेपर असतो का?
उत्तर. आपण आपल्या शंकेचे येथे नक्कीच निरसन करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीसाठी एकच पेपर असून 10 धडे प्रथम सत्रासाठी तर 10 धडे द्वितीय सत्रासाठी असे अभ्यासक्रमाचे विभागात विभाजन करून परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी – काय करावे आणि काय करू नये
परीक्षेची काळजी न करता आपण फक्त खालील मुद्दे लक्षात घेतल्यास, परीक्षेबद्दल येणारा आपला ताण कमी होण्यास नक्की मदत होईल:
काय करावे:
काय करू नये
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023: परीक्षेचे स्वरूप” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.