
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेचे स्वरूप
August 22, 2022महत्त्वाचे धडे: इयत्ता सातवीपासून माध्यमिक शिक्षणाच्या मुख्य टप्प्याची सुरुवात होते. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी सातवीच्या परीक्षेची तयारी करताना सर्व विषयांचा अभ्यास करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. या ब्लॉगमध्ये Embibe च्या तज्ञांकडून आपल्याला इयत्ता सातवीच्या अभ्यासाच्या दृष्टीकोनातून कोणते महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स आहेत यावर मार्गदर्शन केले जाईल. महत्त्वाच्या धड्यांचा आधीच अभ्यास करून घेतल्याने परीक्षेची तयारी सुलभ होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते. आमचा विश्वास आहे की हा ब्लॉग वाचून आपल्याला अभ्यास करताना मदत होईल.
परीक्षेविषयी: इयत्ता सातवीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरुवातीला काही दिवस आपल्याला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी जेणेकरून अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी होईल. तसेच मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या इयत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा embibe प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इतिहास, नागरिकशास्त्र या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 7 वी मध्ये तयार होतो.
दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 7 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांत 2023 च्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता सातवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन वेळा घटक चाचणी घेतली जाते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता 7 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित केला जातो. जर आपल्याला गणित, सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान या विषयांसाठी अभ्यासक्रम डाऊनलोड करायचा असेल तर आपण आमच्या महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023-परीक्षेचा अभ्यासक्रम या ब्लॉगच्या मदतीने जाणून घेऊ शकता.
खाली सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स दिले आहेत:
खालील तक्त्यांमध्ये सामान्य विज्ञान या विषयांतील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
---|---|
सजीव सृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण | अनुकूलन अनुकूलनाचे प्रकार सजीवांचे वर्गीकरण |
वनस्पती: रचना व कार्य | मूळ खोड पान फूल फळ |
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म | हवेचे गुणधर्म पाण्याचे गुणधर्म मृदा |
सजीवांतील पोषण | पोषण स्वयंपोषी वनस्पती वनस्पतींमधील वहनव्यवस्था परपोषी वनस्पती कीटकभक्षी वनस्पती |
अन्नपदार्थांची सुरक्षा | अन्नबिघाड अन्ननासाडी अन्नरक्षण व परिरक्षण |
भौतिक राशींचे मापन | राशींचे प्रकार प्रमाणित मापन मूलभूत प्रमाणांचे मानक अचूक मापनाचे महत्त्व मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी |
गती, बल व कार्य |
अंतर आणि विस्थापन चाल व वेग त्वरण बल आणि त्वरण बल, विस्थापन व कार्य |
स्थितिक विद्युत | विद्युतप्रभार घर्षणविद्युत वातावरणातील विद्युतप्रभार |
उष्णता | उष्णतेचे संक्रमण उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक उष्णतेमुळे द्रवपदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन |
आपत्ती व्यवस्थापन | दुष्काळ ढगफुटी महापूर वीज चमकणे ज्वालामुखी त्सुनामी वादळे |
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव | पेशी पेशींचे मोजमाप व निरीक्षण सूक्ष्मजीव |
मानवी स्नायू व पचनसंस्था | स्नायूसंस्था पचनसंस्था |
बदल: भौतिक व रासायनिक | क्षरण |
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रण | द्रव्य मूलद्रव्य संयुगे उर्ध्वपातन पद्धत अपकेंद्री पद्धत रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत |
पदार्थ: आपल्या वापरातील | टूथपेस्ट अपमार्जके सिमेंट |
नैसर्गिक साधनसंपत्ती | भूकवचातील साधनसंपत्ती काही प्रमुख खनिजे व धातुके इंधन नैसर्गिक वायू वनसंपत्ती सागरसंपत्ती |
प्रकाशाचे परिणाम | प्रकाशाचे विकिरण बिंदुस्त्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया ग्रहण |
ध्वनी: ध्वनीची निर्मिती | दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता ध्वनीची उच्चनीचता ध्वनीची तीव्रता-ध्वनीची पातळी श्राव्य ध्वनी श्राव्यातीत ध्वनी |
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म | चुंबकत्व पृथ्वीः एक प्रचंड मोठा चुंबक चुंबकसूची चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता धातुशोधक यंत्रे |
तारकांच्या दुनियेत | आकाशनिरीक्षण तारकासमूह |
खालील तक्त्यांमध्ये गणित – विभाग 1 आणि विभाग 2 मधील महत्त्वाचे टॉपिक्स या विषयातील धडे आणि महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहेत.
गणित विभाग – 1 | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
भौमितिक रचना | कोन दुभाजक रेषाखंडाचा लंबदुभाजक त्रिकोण रचना कोनांची एकरूपता |
पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार | पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्यांचा भागाकार |
मसावि आणि लसावि | जोडमूळ संख्या मूळ अवयव पद्धती मसावि काढण्याची भागाकार पद्धत लघुतम सामाईक विभाज्य (लसावि) |
कोन व कोनांच्या जोड्या | कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग कोनांचे प्रकार विरुद्ध किरण बहुभुजाकृतीचे आंतरकोन बाह्यकोनाचा गुणधर्म |
परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया | परिमेय संख्यांवरील क्रिया परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या परिमेय संख्यांचे दशांशरूप पदावली सोडवण्याचे नियम |
घातांक | पाया व घातांक पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात घातांकांचे नियम पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे |
गणित विभाग – 2 | |
---|---|
धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण | समप्रमाण व्यस्तप्रमाण भागीदारी |
बँक व सरळव्याज | विविध खाती |
वर्तुळ | वर्तुळाचा परीघ परीघ व व्यास संबंध वर्तुळकंस |
परिमिती व क्षेत्रफळ | परिमिती पृष्ठफळ |
पायथागोरसचा सिद्धांत | काटकोन त्रिकोण पायथगोरसचा सिद्धांत |
बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार | वर्गविस्तार बैजिक राशींचे अवयव पाडणे |
सांख्यिकी | सरासरी वारंवारता वितरण सारणी |
समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण | समप्रमाण व्यस्तप्रमाण |
बँक व सरळव्याज | विविध खाती |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी च्या सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र व भूगोल या सर्व विषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
विषय | धड्याचे नाव | महत्त्वाचे टॉपिक |
---|---|---|
इतिहास | इतिहास साधने | भौतिक साधने लिखित साधने मौखिक साखने ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन |
शिवपूर्वकालीन भारत | वायव्येकडील आक्रमण उत्तरेतील सुलतानशाही मुघल सत्ता |
|
धार्मिक समन्वय | भक्ती चळवळ महानुभाव पंथ गुरुनानक सुफी पंथ |
|
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र | कसबा गाव (मौजा) वारकरी पंथाचे कार्य पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा |
|
स्वराज्यस्थापना | शहाजीराजे राजमुद्रा सिद्दी जौहरची स्वारी |
|
मुघलांशी संघर्ष | शायिस्ताखानाची स्वारी सुरतेवर स्वारी जयसिंगाची स्वारी राज्याभिषेक |
|
स्वराज्याचा कारभार | अष्टप्रधान मंडळ शेतीविषयीचे धोरण हेर खाते लष्करी व्यवस्था |
|
आदर्श राज्यकर्ता | संघटन चातुर्य रयतेची काळजी लष्करविषयक धोरण स्वातंत्र्याची प्रेरणा |
|
मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम | छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम मराठ्यांच्या हालचाली |
|
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार | शाहू महाराजांची सुटका निजामाचा पालखेड येथे पराभव पोर्तुगिजांचा पराभव |
|
राष्ट्ररक्षक मराठे | उत्तरेतील परिस्थिती अफगाणांशी संघर्ष पानिपतचा रणसंग्राम मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना इंदौरचे होळकर |
|
महाराष्ट्रातील समाजजीवन | सामाजिक परिस्थिती चालीरिती सण-समारंभ |
|
नागरिकशास्त्र | आपल्या संविधानाची ओळख | संविधान : अर्थ संविधानाची आवश्यकता संविधान सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान |
संविधानाची उद्देशिका | सार्वभौम राज्य समाजवादी राज्य धर्मनिरपेक्ष राज्य लोकशाही राज्य गणराज्य |
|
संविधानाची वैशिष्टे | संघराज्य संसदीय शासनपद्धती स्वतंत्र न्यायव्यवस्था निवडणूक आयोग |
|
मूलभूत हक्क भाग – 1 | संविधानात नमूद केलेले आपले हक्क | |
मूलभूत हक्क भाग – 2 | धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयीन आदेश |
|
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत तत्त्वे | काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्ये |
|
भूगोल | ऋतुनिर्मिती (भाग -1) | कालगणना |
सूर्य, चंद्र व पृथ्वी | चंद्राच्या गती ग्रहणे |
|
भरती-ओहोटी | केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल भरती-ओहोटी भरती-ओहोटीचे प्रकार लाटेची रचना |
|
हवेचा दाब | हवेचा दाब भूपृष्ठावरील दाबपट्टे समदाब रेषा |
|
वारे | ग्रहीय वारे स्थानिक वारे हंगामी वारे (मोसमी) |
|
नैसर्गिक प्रदेश | टुंड्रा प्रदेश गवताळ प्रदेश तैगा प्रदेश उष्ण वाळवंटी प्रदेश विषुवृत्तीय प्रदेश |
|
मृदा | मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक मृदेचे प्रकार मृदा-धूप व अवनती मृदा संधारण |
|
ऋतुनिर्मिती (भाग -2) | सूर्याचे भासमान भ्रमण पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम |
|
कृषी | पशुपालन कुक्कुटपालन शेतीचे प्रकार कृषिपर्यटन विपणन व्यवस्था |
|
मानवी वस्ती | वस्तीचे प्रकार | |
समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे | उंची व प्रदेशातील उंचसखलपणा भूपृष्ठावरील विविध भूरूपे |
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असणार्या इयत्ता 8 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिक वर दिले आहेत. शिक्षण मंडळाने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत पाठ्यपुस्तकात मिळतील.
प्र 1. मला इयत्ता सातवीच्या गणित आणि सामान्य विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स कोठे मिळतील?
उत्तरः या ब्लॉगमध्ये इयत्ता सातवीच्या गणित आणि विज्ञान विषयाकरिता महत्त्वाचे टॉपिक्स दिले आहेत. तसेच या टॉपिकवरील प्रश्न, व्हिडिओ देखील आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम मला कोठे सापडेल?
उत्तरः इयत्ता सातवीचा तपशीलवार अभ्यासक्रम आपल्याला आमच्या “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023- परीक्षेचा अभ्यासक्रम” या ब्लॉगमध्ये मिळेल.
प्र 3: महाराष्ट्र बोर्ड सातवीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेण्याचे काय फायदे आहेत?
उत्तरः इयत्ता सातवीमधील महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स जाणून घेतल्यास, विद्यार्थ्यांना जास्त महत्त्व असलेल्या धड्यांचा किंवा टॉपिकचा अभ्यास करणे सोपे होते, तसेच विद्यार्थी त्या धड्यांची परीक्षेसाठी चांगली तयारी करू शकतात आणि जास्तीत जास्त गुण सहजपणे मिळवू शकतात.
प्र 4: मी भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्स कसे जाणून घेऊ शकतो?
उत्तर: भाषा विषयांकरिता महत्त्वाचे धडे आणि टॉपिक्सचे महाराष्ट्र बोर्डकडून विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण करून देण्यात आले आहे जसे की, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, व्याकरण इत्यादी.
प्र 5: मला महाराष्ट्र बोर्डचा सातवीचा अभ्यासक्रम कोठून मिळेल?
उत्तर: विद्यार्थी आमच्या “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023-परीक्षेचा अभ्यासक्रम” या ब्लॉगमधून इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी विषयवार अभ्यासक्रम पाहू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023: महत्त्वाचे धडे” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.