Robot

Last few days of free access to Embibe

Click on Get Started to access Learning Outcomes today

  • लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम

img-icon

परीक्षेचा अभ्यासक्रम: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवीची पाठ्यपुस्तके ही महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमावर तसेच सर्वात अलीकडील सुधारित आणि अद्ययावत टेस्ट पॅटर्नवर आधारित आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता इयत्ता 7 वी ची पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे.

अधिक माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्राथमिक तारखा आणि खाली दिलेल्या माहितीचे अवलोकन केले पाहिजे. इयत्ता 7 वी ची परीक्षा अंदाजे मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023-परीक्षेविषयी

इयत्ता सातवीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरुवातीला काही दिवस आपल्याला मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी करायला हवी जेणेकरून अभ्यासक्रमासाठी चांगली पूर्वतयारी होईल. तसेच मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या इयत्तेतील संकल्पना समजून घेण्यासाठी व अध्ययनासाठी हा embibe प्लॅटफॉर्म अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इतिहास, नागरिकशास्त्र या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 7 वी मध्ये तयार होतो.

दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 7 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 मध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता सातवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तसेच सहामाही आणि वार्षिक परीक्षेपूर्वी दोन वेळा घटक चाचणी घेतली जाते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील केले पाहिजे. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 – सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळाने कशाप्रकारे निश्चित केला आहे ते आपण पाहू. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे: 

धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
सजीव सृष्टी: अनुकूलन व वर्गीकरण अनुकूलन
जलीय वनस्पतींमधील अनुकूलन
वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन
हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन
वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन
हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन
हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन
परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन
सजीवांचे वर्गीकरण
वनस्पती: रचना व कार्य मूळ
खोड
पान
फूल
फळ
नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म हवेचे गुणधर्म
पाण्याचे गुणधर्म
मृदा
सजीवांतील पोषण पोषण
स्वयंपोषी वनस्पती
वनस्पतींमधील वहनव्यवस्था
परपोषी वनस्पती
कीटकभक्षी वनस्पती
अन्नपदार्थांची सुरक्षा अन्नबिघाड
अन्ननासाडी
अन्नरक्षण व परिरक्षण
भौतिक राशींचे मापन भौतिक राशी
अदिश राशी
सदिश राशी
प्रमाणित मापन
मूलभूत प्रमाणांचे मानक
अचूक मापनाचे महत्त्व
मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी

गती, बल व कार्य
अंतर आणि विस्थापन
चाल व वेग
त्वरण
बल आणि त्वरण
बल, विस्थापन व कार्य
स्थितिक विद्युत विद्युतप्रभार
घर्षणविद्युत
वातावरणातील विद्युतप्रभार
उष्णता उष्णतेचे संक्रमण
उष्णता संक्रमणाचे प्रकार: उष्णतेचे वहन, अभिसरण व प्रारण
उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक
उष्णतेमुळे द्रवपदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन
आपत्ती व्यवस्थापन दुष्काळ
ढगफुटी
महापूर
वीज चमकणे
ज्वालामुखी
त्सुनामी
वादळे
पेशीरचना आणि सूक्ष्मजीव पेशी
पेशींचे मोजमाप व निरीक्षण
सूक्ष्मजीव
मानवी स्नायू व पचनसंस्था स्नायूसंस्था
पचनसंस्था
बदल: भौतिक व रासायनिक क्षरण
पदार्थ आपल्या वापरातील द्रव्य
मूलद्रव्य
संयुगे
उर्ध्वपातन पद्धत
अपकेंद्री पद्धत
रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत
पदार्थ: आपल्या वापरातील टूथपेस्ट
अपमार्जके
सिमेंट
नैसर्गिक साधनसंपत्ती भूकवचातील साधनसंपत्ती
काही प्रमुख खनिजे व धातुके
इंधन
दगडी कोळसा
खनिज तेल
नैसर्गिक वायू
वनसंपत्ती
सागरसंपत्ती
प्रकाशाचे परिणाम प्रकाशाचे विकिरण
बिंदुस्त्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया
ग्रहण
ध्वनी: ध्वनीची निर्मिती दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता
ध्वनीची उच्चनीचता
ध्वनीची तीव्रता-ध्वनीची पातळी
श्राव्य ध्वनी
श्राव्यातीत ध्वनी
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म चुंबकत्व
पृथ्वीः एक प्रचंड मोठा चुंबक
चुंबकसूची
चुंबकीय क्षेत्र
चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म
चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता
धातुशोधक यंत्रे
तारकांच्या दुनियेत आकाशनिरीक्षण
तारकासमूह

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 – गणित अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा गणित हा विषय दोन भागांमध्ये विभागला आहे. गणित विभाग – 1 आणि  गणित विभाग – 2 या दोन्ही भागांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 
2022-23 या सत्राकरिता इयत्ता सातवीचा गणित विभाग – 1 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
भौमितिक रचना कोन दुभाजक
रेषाखंडाचा लंबदुभाजक
त्रिकोण रचना
रेषाखंडांची एकरूपता
कोनांची एकरूपता
पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार पूर्णांक संख्यांचा गुणाकार
पूर्णांक संख्यांचा भागाकार
मसावि आणि लसावि जोडमूळ संख्या
संख्येचे मूळ अवयव पाडणे
मूळ अवयव पद्धती
मसावि काढण्याची भागाकार पद्धत
लघुतम सामाईक विभाज्य (लसावि)
लसावि व मसावि यांचा उपयोग
कोन व कोनांच्या जोड्या कोनाचा अंतर्भाग व बाह्यभाग
संलग्न कोन (लगतचे कोन)
कोटिकोन
पूरक कोन
विरुद्ध किरण
रेषीय जोडीतील कोन
विरुद्ध कोन
बहुभुजाकृतीचे आंतरकोन
बाह्यकोनाचा गुणधर्म
परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया परिमेय संख्यांवरील क्रिया
परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या
परिमेय संख्यांचे दशांशरूप
पदावली सोडवण्याचे नियम
घातांक पाया व घातांक
पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार
समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार
दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात
घातांकांचे नियम
पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे
जोडस्तंभालेख जोडस्तंभालेख काढणे
बैजिक राशी व त्यांवरील क्रिया बैजिक राशींचे प्रकार
बैजिक राशींची बेरीज
बैजिक राशींची वजाबाकी
बैजिक राशींचा गुणाकार
एकचल समीकरणे

2022-23 या सत्राकरिता इयत्ता सातवीचा गणित विभाग – 2 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

गणित विभाग 2
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
समप्रमाण आणि व्यस्तप्रमाण समप्रमाण
व्यस्तप्रमाण
भागीदारी
बँक व सरळव्याज विविध खाती
वर्तुळ वर्तुळाचा परीघ
परीघ व व्यास संबंध
वर्तुळकंस
परिमिती व क्षेत्रफळ परिमिती
पृष्ठफळ
पायथागोरसचा सिद्धांत काटकोन त्रिकोण
पायथगोरसचा सिद्धांत
बैजिक सूत्रे – वर्ग विस्तार वर्गविस्तार
बैजिक राशींचे अवयव पाडणे
सांख्यिकी सरासरी
वारंवारता वितरण सारणी

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 – सामाजिक शास्त्रे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 7 वी चा सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र आणि भूगोल या सर्व उपविषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

विषय धड्याचे नाव महत्वाचे टॉपिक
इतिहास इतिहासाची साधने भौतिक साधने
लिखित साधने
मौखिक साखने
ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन
शिवपूर्वकालीन भारत वायव्येकडील आक्रमण
उत्तरेतील सुलतानशाही
मुघल सत्ता
धार्मिक समन्वय भक्ती चळवळ
महानुभाव पंथ
गुरुनानक
सुफी पंथ
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसबा
गाव (मौजा)
वारकरी पंथाचे कार्य
संतकार्याची फलश्रुती
पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा
स्वराज्यस्थापना शहाजीराजे
राजमुद्रा
अफजलखानाचे पारिपत्य
सिद्दी जौहरची स्वारी
मुघलांशी संघर शायिस्ताखानाची स्वारी
सुरतेवर स्वारी
जयसिंगाची स्वारी
राज्याभिषेक
दक्षिणेची मोहिम
स्वराज्याचा कारभार अष्टप्रधान मंडळ
शेतीविषयीचे धोरण
हेर खाते
लष्करी व्यवस्था
आरमार
प्रजेच्या हिताची काळजी
आदर्श राज्यकर्ता संघटन चातुर्य
रयतेची काळजी
लष्करविषयक धोरण
सहिष्णू वर्तन
स्वातंत्र्याची प्रेरणा
महाराजांच्या कार्याची थोरवी
मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम छत्रपती संभाजी महाराज
पोर्तुगिजांविरुद्ध मोहीम
मराठ्यांच्या हालचाली
महाराणी ताराबाई
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार शाहू महाराजांची सुटका
निजामाचा पालखेड येथे पराभव
पोर्तुगिजांचा पराभव
राष्ट्ररक्षक मराठे उत्तरेतील परिस्थिती
अफगाणांशी संघर्ष
पानिपतचा रणसंग्राम
मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना
इंदौरचे होळकर
ग्वालियरचे शिंदे
नागपूरचे भोसले
महाराष्ट्रातील समाजजीवन सामाजिक परिस्थिती
चालीरिती
सण-समारंभ
राहणीमान
नागरिकशास्त्र आपल्या संविधानाची ओळख संविधान : अर्थ
संविधानातील तरतुदी
संविधानाची आवश्यकता
संविधान सभा
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
संविधानाची उद्देशिका सार्वभौम राज्य
समाजवादी राज्य
धर्मनिरपेक्ष राज्य
लोकशाही राज्य
गणराज्य
बंधुता
संविधानाची वैशिष्टे संघराज्य
अधिकार विभागणी
संसदीय शासनपद्धती
स्वतंत्र न्यायव्यवस्था
निवडणूक आयोग
मूलभूत हक्क भाग – 1 संविधानात नमूद केलेले आपले हक्क
मूलभूत हक्क भाग – 2 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क
हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयीन आदेश
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत तत्त्वे काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे
मूलभूत कर्तव्ये
भूगोल ऋतुनिर्मिती (भाग -1) कालगणना
सूर्य, चंद्र व पृथ्वी चंद्राच्या गती
ग्रहणे
भरती-ओहोटी केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल
भरती-ओहोटी
भरती-ओहोटीचे प्रकार
लाटेची रचना
हवेचा दाब हवेचा दाब
भूपृष्ठावरील दाबपट्टे
समदाब रेषा
वारे ग्रहीय वारे
स्थानिक वारे
हंगामी वारे (मोसमी)
नैसर्गिक प्रदेश टुंड्रा प्रदेश
गवताळ प्रदेश
तैगा प्रदेश
उष्ण वाळवंटी प्रदेश
विषुवृत्तीय प्रदेश
मृदा मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक
मृदेचे प्रकार
मृदा-धूप व अवनती
मृदा संधारण
ऋतुनिर्मिती (भाग -2) सूर्याचे भासमान भ्रमण
पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती
ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम
कृषी पशुपालन
कुक्कुटपालन
शेतीचे प्रकार
निर्वाह शेती
व्यापारी शेती
मंडई बागायत शेती
फलोद्यान/फुलशेती
कृषिपर्यटन
विपणन व्यवस्था
मानवी वस्ती वस्तीचे प्रकार
समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे उंची व प्रदेशातील उंचसखलपणा
भूपृष्ठावरील विविध भूरूपे

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असणार्‍या इयत्ता 7 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिक वर दिले आहेत. शिक्षण मंडळाने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत पाठ्यपुस्तकात मिळतील. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023 अभ्यासक्रम: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. मला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर मी काय करावे?

उत्तर. जर आपल्याला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा https://www.embibe.com/user-home या वेबसाईटला भेट देऊन Embibe स्पष्टीकरणकर्त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या शंकांचे निरसन झाले नाही तर आपण Embibe च्या शंका निरसन केंद्राची मदत घेऊ शकता. 

प्र 2. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास मी अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो? 

उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपली पुस्तके मदत करतील. परंतु अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी Embibe वर आपल्याला व्हिडीओ उत्तरांसह पुस्तके येथे मिळतील. त्यामुळे 3D इंटरॅक्टिव्ह व्हिडिओंद्वारे, प्रॅक्टिस करून आणि टेस्ट देऊन आपण अभ्यास केला पाहिजे. 

प्र 3. इयत्ता सातवीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?

उत्तर. इयत्ता 7 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 7 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते. 

प्र 4. 7 वी च्या परीक्षेमध्ये कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?

उत्तर. 7 वी च्या परीक्षेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आणि काही अनिवार्य भाषा विषय इत्यादी समाविष्ट केलेले आहेत. 

प्र 5. इयत्ता 7 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? 

उत्तर. इयत्ता 7 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करून त्याची वेळोवेळी उजळणी केली पाहिजे असे केल्याने आपण आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करू शकता. 


आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता सातवी 2023: परीक्षेचा अभ्यासक्रम” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता  सातवी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा