
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक्स
August 22, 2022परीक्षेचे स्वरूप: दरवर्षी राज्यभरातून लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना प्रत्येक विषयाच्या नवीन परीक्षा पद्धतीची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेची तयारी करत असताना यामध्ये परीक्षेचे स्वरूप (Exam Pattern) समजून घेणे अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे त्यांना अभ्यासाचे सुसूत्र नियोजन करण्यास मदत मिळते. या ब्लॉगमध्ये आपण Embibe च्या तज्ञांकडून याविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊया.
इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांची महत्त्वाची शैक्षणिक वर्षे सुरू होतात. या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. नागरीकशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 8 वी मध्ये तयार होतो.
दरवर्षी शाळा इयत्ता 8 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करतात आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून 40 ते 45 दिवसांत या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतात. इयत्ता आठवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण अभ्यास सामग्रीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देखील वेळोवेळी अभ्यासक्रमात आणि पाठ्यक्रमात बदल करण्यात येतात. परिणामी, आज महाराष्ट्राकडे एक उत्तम, कार्यक्षम आणि आकर्षक शैक्षणिक व्यवस्था कार्यरत आहे.
आपण महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम अधिक सविस्तर पाहूया.
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|
1 | सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण |
2 | आरोग्य व रोग |
3 | बल व दाब |
4 | धाराविद्युत आणि चुंबकत्व |
5 | अणूचे अंतरंग |
6 | द्रव्याचे संघटन |
7 | धातू-अधातू |
8 | प्रदूषण |
9 | आपत्ती व्यवस्थापन |
10 | पेशी व पेशीअंगके |
11 | मानवी शरीर व इंद्रिय संस्था |
12 | आम्ल, आम्लारी ओळख |
13 | रासायनिक बदल व रासायनिक बंध |
14 | उष्णतेचे मापन व परिणाम |
15 | ध्वनी |
16 | प्रकाशाचे परावर्तन |
17 | मानवनिर्मित पदार्थ |
18 | परिसंस्था |
19 | ताऱ्यांची जीवनयात्रा |
धड्याचा क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|
1 | परिमेय संख्या व अपरिमेय संख्या |
2 | समांतर रेषा व छेदिका |
3 | घातांक व घनमूळ |
4 | त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा |
5 | विस्तार सूत्रे |
6 | बैजिक राशींचे अवयव |
7 | चलन |
8 | चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार |
9 | सूट व कमिशन |
11 | बहुपदींचा भागाकार |
12 | सांख्यिकी |
13 | एकचल समीकरणे |
14 | त्रिकोणांची एकरूपता |
15 | चक्रवाढ व्याज |
16 | क्षेत्रफळ |
17 | पृष्ठफळ व घनफळ |
18 | वर्तुळ – जीवा व कंस |
विषयाचे नाव | अनु. क्रमांक | धड्याचे नाव |
---|---|---|
इतिहास |
1 | इतिहासाची साधने |
2 | युरोप आणि भारत | |
3 | ब्रिटिश सत्तेचे परिणाम | |
4 | 1857 चा स्वातंत्र्यलढा | |
5 | सामाजिक व धार्मिक प्रबोधन | |
6 | स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ | |
7 | असहकार चळवळ | |
8 | सविनय कायदेभंग चळवळ | |
9 | स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व | |
10 | सशस्त्र क्रांतिकारी चळवळ | |
11 | समतेचा लढा | |
12 | स्वातंत्र्यप्राप्ती | |
13 | स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती | |
14 | महाराष्ट्र राज्याची निर्मिती | |
नागरिकशास्त्र |
1 | संसदीय शासन पद्धतीची ओळख |
2 | भारताची संसद | |
3 | केंद्रीय कार्यकारी मंडळ | |
4 | भारतातील न्यायव्यवस्था | |
5 | राज्यशासन | |
6 | नोकरशाही | |
भूगोल | 1 | स्थानिक वेळ व प्रमाण वेळ |
2 | पृथ्वीचे अंतरंग | |
3 | आर्द्रता व ढग | |
4 | सागरतळरचना | |
5 | सागरी प्रवाह | |
6 | भूमी उपयोजन | |
7 | लोकसंख्या | |
8 | उद्योग | |
9 | नकाशाप्रमाण | |
10 | क्षेत्रभेट |
इयत्ता आठवीची परीक्षा ही दोन सत्रांमध्ये घेण्यात येते. प्रथम सत्राचा अभ्यासक्रम वर्गात शिकवून झाल्यानंतर शेवटी सहामाही परीक्षा घेण्यात येते, तर द्वितीय सत्राचा अभ्यासक्रम वर्गात शिकवून झाल्यानंतर शेवटी वार्षिक परीक्षा होते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी चे वेळापत्रक प्रत्येक शाळा निश्चित करत असतात. प्रथम सत्र परीक्षा अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होते व द्वितीय सत्र म्हणजेच वार्षिक परीक्षा अंदाजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येते.
प्रश्नपत्रिकेचा कालावधी विषयाच्या एकूण गुण मूल्यांकनानुसार प्रश्नपत्रिका सोडवण्याचा कालावधी साधारण 2 तास (40 गुण) किंवा 3 तास (80 गुण) याप्रमाणे निश्चित केलेला असतो. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन दिलेल्या वेळेमध्ये सर्व प्रश्न कशाप्रकारे सोडवता येतील याचे नियोजन आणि सराव केला पाहिजे.
परीक्षेचे विषयानुसार स्वरूप: प्रत्येक विषयानुसार महाराष्ट्र बोर्डद्वारे परीक्षेचे स्वरूप निश्चित केले जाते जसे की, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र, भाषा – मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, इत्यादी. सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान 35 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असते.
1. भाषा विषयांकरिता बोर्डद्वारे काही ठळक मुद्दे लक्षात घेऊन गुणांचे वितरण केले जाते ते खालीलप्रमाणे आहे.
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
वाचन कौशल्य (पाठ्यपुस्तकावर आधारित व त्याव्यतिरिक्त) | 40% |
व्याकरण | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
विज्ञान विषयाच्या परीक्षेची रूपरेषा: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या विज्ञान विषयासाठी पाठ्यपुस्तकात एकूण 19 धड्यांचा समावेश करण्यात आलेला असून यातील पहिले 10 धडे प्रथम सत्रासाठी तर उर्वरीत 9 धडे द्वितीय सत्रासाठी दिलेले आहेत. शिक्षकांनी विज्ञान हा विषय शिकवताना नेहमी एकात्मिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच आपण सातत्याने अध्यापन करायचे आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना या विषयाच्या अभ्यासाचे वार्षिक नियोजन करणे सहज शक्य व्हावे यासाठी पुढे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहे.
प्रथम सत्र व द्वितीय सत्र यानुसार केलेले धड्यांचे नियोजन:
विज्ञान प्रथम सत्र |
|||
---|---|---|---|
धडा क्र. | धड्याचे नाव | धडा क्र. | धड्याचे नाव |
1 | सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण | 6 | द्रव्याचे संघटन |
2 | आरोग्य व रोग | 7 | धातू-अधातू |
3 | बल व दाब | 8 | प्रदूषण |
4 | धाराविद्युत आणि चुंबकत्व | 9 | आपत्ती व्यवस्थापन |
5 | अणूचे अंतरंग | 10 | पेशी व पेशीअंगके |
विज्ञान द्वितीय सत्र |
|||
---|---|---|---|
धडा क्र. | धड्याचे नाव | धडा क्र. | धड्याचे नाव |
11 | मानवी शरीर व इंद्रिय संस्था | 15 | ध्वनी |
12 | आम्ल, आम्लारी ओळख | 16 | प्रकाशाचे परावर्तन |
13 | रासायनिक बदल व रासायनिक बंध | 17 | मानवनिर्मित पदार्थ |
14 | उष्णतेचे मापन व परिणाम | 18 | परिसंस्था |
19 | ताऱ्यांची जीवनयात्रा |
गुणांचे वितरण – टक्केवारीमध्ये
ठळक मुद्दे | गुणांचे वितरण |
---|---|
लेखी | 40% |
प्रात्यक्षिक परीक्षा | 15% |
लेखन कौशल्य | 25% |
तोंडी परीक्षा | 20% |
गणित विषयाच्या परीक्षेची रूपरेषा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या गणित विषयाचे विभाग 1 आणि विभाग 2 अशा दोन भागांमध्ये विभाजन केलेले आहे.
1. गणित – विभाग 1 हा प्रथम सत्र परीक्षेसाठी आणि विभाग 2 हा वार्षिक परीक्षेसाठी निश्चित केलेला असतो.
2. या दोन्ही विभागांतील धड्यांकरिता प्रत्येकी 40-40 गुण लेखी परीक्षेसाठी आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापनाकरिता निश्चित केले जातात.
3. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 40 पैकी 18 गुण मिळवणे आवश्यक असते.
विषय | गुणांचे वितरण |
---|---|
भाषा विषय | 100 (80+ 20) |
इंग्रजी | 100 (80+ 20) |
गणित | 100 (80+ 20) |
विज्ञान | 100 (80+ 20) |
सामाजिक शास्त्र | 100 (80+ 20) |
इयत्ता आठवीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर अंदाजे एप्रिल 2023 मध्ये निकाल जाहीर करण्यात येईल. हा निकाल संबंधित शाळांद्वारे जाहीर करण्यात येतो.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी 2023 या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या टिप्स शेअर केल्या आहेत. येथे काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत; त्या विचारात घेऊन त्यांचा उत्तम उपयोग करा. या परीक्षेच्या तयारीसाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवा.
अभ्यासातील नियमितपणा आणि शिस्त:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.
संपूर्ण तयारी:
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्या धड्यांची दररोज एकदा उजळणी केली पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो.
प्रॅक्टिस:
प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे. परीक्षेदरम्यान आपल्या वेळेचा वापर कसा करायचा हे देखील आपण शिकाल.
प्र1. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होण्यासाठी मला आठवीमध्ये किती टक्के मिळवावे लागतील?
उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.
प्र2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेसाठी मला अभ्यासाचे नियोजन कसे करावे लागेल?
उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण शक्य तितक्या अधिक सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवल्या पाहिजे व त्यावरून आपण आपल्या जमेच्या बाजू व अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असलेले टॉपिक जाणून घेऊन त्यावर अधिक मेहनत घेता येईल.
प्र3. मला आठवीच्या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती मिळेल का?
उत्तर. नक्कीच! दरवर्षी महाराष्ट्र बोर्ड हे इयत्ता 8 वी च्या परीक्षेचे आयोजन करते. महाराष्ट्र बोर्ड आठवीची वार्षिक परीक्षा मार्च 2023 मध्ये सुरू होईल. त्यामुळे अभ्यास करताना होणारी धावपळ शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेऊन त्याप्रमाणे आपल्या अभ्यासाचे नियोजन करावे.
प्र4. इयत्ता आठवीच्या परीक्षेमध्ये हिंदी आणि संस्कृत अशा दोन्ही विषयाच्या परीक्षा देऊ शकतो का?
उत्तर. होय, इयत्ता आठवीच्या परीक्षेमध्ये आपण आपल्या इच्छेनुसार 50-50 गुणांच्या हिंदी व संस्कृत अशा दोन्ही परीक्षेला बसू शकतात. आपल्याला जर दोन विषयांपैकी एकाच विषयात रुची असेल आणि आपल्या शाळेत विषय निवडीची सुविधा असेल तर आपण तो विषय 100 गुणांसाठी घेऊ शकतात.
प्र5. इयत्ता आठवी साठी विज्ञान विषयाचा एकच पेपर असतो का?
उत्तर. आपण आपल्या शंकेचे येथे नक्कीच निरसन करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीसाठी विज्ञान विषयाचा एकच पेपर असतो.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी परीक्षेचे स्वरूप 2023 – काय करावे आणि काय करू नये
परीक्षेची काळजी न करता आपण फक्त खालील मुद्दे लक्षात घेतल्यास आपला ताण कमी होण्यास नक्की मदत होईल:
काय करावे:
काय करू नये
आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या परीक्षेचे स्वरूप 2023” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.