• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम

img-icon

परीक्षेचा अभ्यासक्रम: इयत्ता आठवी महाराष्ट्र बोर्डची पाठ्यपुस्तके ही सुधारित आणि अद्ययावत टेस्ट पॅटर्नवर आधारित आहेत. यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतील पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करण्याकरिता इयत्ता 8 वी ची पाठ्यपुस्तके वाचणे आवश्यक आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी या महत्त्वपूर्ण अभ्यास सामग्रीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण बोर्डद्वारे देखील वेळोवेळी आपल्या इयत्तांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यक्रमात बदल करण्यात येतो. परिणामी, आज महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एक उत्तम, कार्यक्षम आणि सुव्यवस्थित शैक्षणिक व्यवस्था कार्यरत आहे.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023-परीक्षेविषयी

इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांची महत्त्वाची शैक्षणिक वर्षे सुरू होतात. या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. नागरीकशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 8 वी मध्ये तयार होतो. 

दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 8 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 च्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता आठवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 – विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळाने कशाप्रकारे निश्चित केला आहे ते आपण पाहू. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता आठवीच्या सामान्य विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता
सृष्टी 1 : मोनेरा
सृष्टी 2 : प्रोटिस्टा
सृष्टी 3 : कवके
सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
आरोग्य व रोग आरोग्य
बल व दाब संपर्क व असंपर्क बले
संतुलित आणि असंतुलित बले
प्लावक बल
धाराविद्युत आणि चुंबकत्व धाराविद्युत
विभवांतर
विद्युत परिपथ
धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम
अणूचे अंतरंग डाल्टनचा अणुसिद्धांत
थॉमसनचे प्लमपुडिंग अणुप्रारूप
रूदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप (1911)
अणूची संरचना
केंद्रकाबाहेरील भाग
इलेक्ट्रॉन वितरण
अणुभट्टी
द्रव्याचे संघटन मूलद्रव्यांचे प्रकार
संयुगांचे प्रकार
मिश्रणांचे प्रकार
धातू आणि अधातू धातू
धातू व अधातूंचे उपयोग
प्रदूषण प्रदूषण
प्रदूषके
हवा प्रदूषण
जल प्रदूषण
मृदा प्रदूषण
आपत्ती व्यवस्थापन भूकंप
दरड कोसळणे / भूस्खलन
पेशी व पेशीअंगके पेशीरचना
पेशीचे भाग
पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया
पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया
मानवी शरीर व इंद्रिय संस्था बहिःश्वसन / बाह्यश्वसन
श्वसन संस्था: रचना व कार्य
रक्ताभिसरण संस्था
रक्ताची कार्ये
मानवी रक्तगट
रक्त पराधनासाठी रक्ताचा पुरवठा कोठून होतो?
आम्ल, आम्लारी ओळख आम्ल
दर्शक
आम्लारी
आम्लारीचे गुणधर्म
रासायनिक बदल व रासायनिक बंध रासायनिक बदल व शाब्‍दिक समीकरण
रासायनिक बंध
उष्णतेचे मापन व परिणाम उष्णतेचे स्रोत
उष्णता व तापमान
ध्वनी ध्वनीची निर्मिती
ध्वनी आणि संगीत
मानवनिर्मित ध्वनी
प्रकाशाचे परावर्तन प्रकाशाचे परावर्तन
परावर्तित प्रकाशाचे परावर्तन
मानवनिर्मित पदार्थ प्‍लॅस्टिक
थर्माकोल
काच
परिसंस्था परिसंस्था
परिसंस्थेची रचना
भू-परिसंस्था
जलीय परिसंस्था
मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास
ताऱ्यांची जीवनयात्रा ताऱ्यांचे गुणधर्म
सूर्याचे गुणधर्म
ताऱ्यांची निर्मिती
ताऱ्यांची उत्क्रांती
ताऱ्यांची अंतिम स्थिती

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 – गणित अभ्यासक्रम

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी चा गणित हा विषय दोन भागांमध्ये विभागला आहे. गणित भाग – 1 आणि  गणित भाग – 2 या दोन्ही भागांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. 

2022-23 या सत्राकरिता इयत्ता आठवीचा गणित भाग – 1 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे: 

धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
परिमेय संख्या व अपरिमेय संख्या परिमेय संख्या
अपरिमेय संख्या
समांतर रेषा व छेदिका छेदिकेमुळे होणारे कोन
दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे
घातांक व घनमूळ घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ
घन व घनमूळ
त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा शिरोलंब
मध्यगा
विस्तार सूत्रे (x + a) (x + b) चा विस्तार
(a + b)³ चा विस्तार
(a – b)³ चा विस्तार
(a + b + c)² चा विस्तार
बैजिक राशींचे अवयव वर्ग त्रिपदीचे अवयव
a³ + b³ चे अवयव
a³ – b³ चे अवयव
चलन समचलन
व्यस्त चलन
काळ, काम, वेग
चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार चौकोन रचना
चौरस
समभुज चौकोन
समांतरभुज चौकोन
समलंब चौकोन
सूट व कमिशन सूट
कमिशन
रिबेट
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 संकीर्ण प्रश्नसंग्रह 1

2022-23 या सत्राकरिता इयत्ता आठवीचा गणित विभाग – 2 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे: 

गणित विभाग – 2
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
बहुपदींचा भागाकार एकपदीला एकपदीने भागणे
बहुपदीला एकपदीने भागणे
बहुपदीला द्विपदीने भागणे
सांख्यिकी मध्य
विभाजित स्तंभालेख
शतमान स्तंभालेख
एकचल समीकरणे एकचल समीकरणांची उकल
शाब्दिक उदाहरणे
त्रिकोणांची एकरूपता त्रिकोणांची एकरूपता
चक्रवाढ व्याज चक्रवाढव्याज
चक्रवाढव्याजाच्या सूत्राचे उपयोजन
क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ
समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ
त्रिकोणाचे क्षेत्रफळ
अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ
पृष्ठफळ व घनफळ घनफळाचे प्रमाणित एकक
वृत्तचितीचे पृष्ठफळ
वृत्तचितीचे घनफळ
वर्तुळ – जीवा व कंस वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म
वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस
एकरूप कंस
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 – सामाजिक शास्त्रे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी चा सामाजिक शास्त्रे हा विषयामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र आणि भूगोल या सर्व उपविषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.

विषय धड्याचे नाव  महत्त्वाचे टॉपिक
इतिहास इतिहासाची साधने भौतिक साधने
इमारती व वस्तू
पुतळे आणि स्मारके 
लिखित साधने
वृत्तपत्रे व नियतकालिके
नकाशे व आराखडे 
मौखिक साधने
दृक, श्राव्य, दृक-श्राव्य साधने 
छायाचित्रे
ध्वनिमुद्रिते 
चित्रपट
युरोप आणि भारत प्रबोधनयुग
धर्मसुधारणा चळवळ
भौगोलिक शोध
युरोपातील वैचारिक क्रांती
राजकिय क्षेत्रातील क्रांती
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
फ्रेंच राज्यक्रांती
औद्योगिकक्रांती
भांडवलशाहीचा उदय
साम्राज्यवाद
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद 
इंग्रज व फ्रेंच संघर्ष
बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया 
वसाहतवाद
सिंधवर इंग्रजांचा ताबा
शीख सत्तेचा पाडाव
इंग्रज-म्हैसूर संघर्ष 
ब्रिटिश सत्तेचे परिणाम ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम
जमीन महसूलविषयक धोरण 
इंग्रजांची आर्थिक धोरणे
शेतीचे व्यापारीकरण
भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास
सामाजिक व सांस्कृतिक परिणाम
1857 चा स्वातंत्र्यलढा 1857 पूर्वीचे लढे
1857 च्या लढ्याची कारणे
लढा अयशस्वी होण्याची कारणे
स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम
भारतीय लष्कराची पुनर्रचना 
धोरणात्मक बदल 
सामाजिक व धार्मिक प्रबोधन धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व 
रामकृष्ण मिशन
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण
भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास 
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना
मवाळ युग (1885 ते 1905) 
जहाल युग (1905 ते 1920)
बंगालची फाळणी 
वंगभंग चळवळ
राष्ट्रीय सभेची चतुःसूत्र
ब्रिटिश सरकारची दडपशाही
मुस्लीम लीगची स्थापना
माँटेग्यू-चेम्सफर्ड कायदा 
असहकार चळवळ गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य
चंपारण्य सत्याग्रह
खेडा सत्याग्रह 
अहमदाबादचा कामगार लढा 
जालियनवाला बाग हत्याकांड 
रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह
खिलाफत चळवळ 
असहकार चळवळ 
स्वराज्य पक्ष
सायमन कमिशन
नेहरू अहवाल
पूर्ण स्वराज्याची मागणी
सविनय कायदेभंग चळवळ पेशावरचा सत्याग्रह
सोलापूरचा सत्याग्रह
धारासना सत्याग्रह
बाबू गेनूचे बलिदान
गोलमेज परिषद
गांधी-आयर्विन करार
पुणे करार
स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व 1935 चा कायदा
दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा
छोडो भारत चळवळ
जनआंदोलनाला प्रारंभ
चलेजाव चळवळीचे महत्त्व
आझाद हिंद सेना
भारतीय नौदल व विमान दलातील उठाव
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ अभिनव भारत
बंगालमधील क्रांतिकारी चळवळ 
इंडिया हाउस
गदर चळवळ
काकोरी कट
हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 
समतेचा लढा शेतकरी चळवळ
कामगार संघटन
समाजवादी चळवळ 
स्त्रियांची चळवळ
दलित चळवळ 
स्वातंत्र्यप्राप्ती वेव्हेल योजना
त्रिमंत्री योजना 
प्रत्यक्ष कृतिदिन 
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
स्वातंत्र्यप्राप्ती
स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ण संस्थानांचे भारतात विलीनीकरण
हैदराबाद मुक्तिसंग्राम
फ्रेंच वसाहतींचे विलीनीकरण
महाराष्ट्र राज्याची निर्मिती संयुक्त महाराष्ट्र परिषद
जे.व्ही.पी.समिती (त्रिसदस्य समिती) 
राज्य पुनर्रचना आयोग
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 
नागरिकशास्त्र  संसदीय शासन पद्धतीची ओळख संसदीय शासनपद्धती
संसदीय शासनपद्धती आपण का स्वीकारली?  
अध्यक्षीय शासनपद्धती
भारताची संसद लोकसभा 
राज्यसभा
संसदेची कार्ये
संसद कायदे कसे तयार करते? 
भारताची सुरक्षा व्यवस्था राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय?
राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग
भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने 
मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने 
मानवी सुरक्षा
केंद्रीय कार्यकारी मंडळ संघशासनाची रचना
राष्ट्रपती
प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ
संसद मंत्रिमंडळावर कसे नियंत्रण ठेवते ? 
भारतातील न्यायव्यवस्था न्यायमंडळाची रचना
न्यायालयीन सक्रियता 
भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा
राज्यशासन राज्यशासनाचे विधिमंडळ
महाराष्ट्राचे विधिमंडळ
विधान परिषद 
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
नोकरशाही नोकरशाहीचे स्वरूप
भारतातील नोकरशाहीचे महत्त्व
सनदी सेवांचे प्रकार
मंत्री व सनदी सेवक
भूगोल स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्थानिक वेळ
प्रमाण वेळ
भारतीय प्रमाण वेळ
जागतिक प्रमाण वेळ
पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीच्या अंतरंगाची रचना
भूकवच
महासागरीय कवच
प्रावरण 
खंडीय कवच
गाभा 
आर्द्रता व ढग बाष्पीभवन
वातावरणातील आर्द्रता 
निरपेक्ष आर्द्रता
सापेक्ष आर्द्रता
सांद्रीभवन/घनीभवन
ढग व ढगांचे प्रकार
क्युम्युलस ढग 
क्युम्युलो निम्बस ढग
सागरतळरचना महासागराची तळरचना
सागरी संचयन
सागरी प्रवाह क्षितिज समांतर (पृष्ठीय) सागरी प्रवाह
सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम
खोलवर वाहणारे सागरी प्रवाह
खोल सागरी प्रवाहांचे महत्त्व
भूमी उपयोजन भूमी उपयोजन
भूमी उपयोजनाचे प्रकार
नागरी भूमी उपयोजन 
संक्रमण प्रदेश व उपनगर
नियोजित शहरे
जमिनीची मालकी व मालकी हक्क 
मिळकत पत्रिका (प्रॅापर्टी कार्ड)
लोकसंख्या लोकसंख्या वाढ 
लोकसंख्या वितरण
लिंग गुणोत्तर
वयोगट प्रमाण
कार्यानुसार लोकसंख्येची रचना 
स्थलांतर
लोकसंख्या – एक संसाधन
मानवी विकास निर्देशांक
महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता
उद्योग उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक
उद्योगांचे स्वरूपानुसार वर्गीकरण 
कृषीवर आधारित उद्योग 
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C.)
माहिती तंत्रज्ञान उद्योग
नकाशाप्रमाण प्रमाणाचे प्रकार 
रेषाप्रमाणाचे महत्त्व
बृहतप्रमाण व लघुप्रमाण नकाशे
क्षेत्रभेट क्षेत्रभेटीची पूर्वतयारी
प्रश्नावली 
अहवाल लेखन

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असणार्‍या इयत्ता 8 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिक वर दिले आहेत. शिक्षण मंडळाने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत पाठ्यपुस्तकांमध्ये मिळतील. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 अभ्यासक्रम: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र1. मला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर मी काय करावे?

उत्तर. जर आपल्याला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा www.embibe.com या वेबसाईटला भेट देऊन Embibe स्पष्टीकरणकर्त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या शंकांचे निरसन झाले नाही तर आपण Embibe च्या शंका निरसन केंद्राची मदत घेऊ शकता. 

प्र2. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास मी अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो? 

उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपली पुस्तके मदत करतील. परंतु अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी Embibe वर आपल्याला व्हिडीओ आणि उत्तरांसह पुस्तके मिळतील. त्यामुळे 3D इंटरॅक्टिव्ह व्हिडिओंद्वारे, प्रॅक्टिस करून आणि टेस्ट देऊन आपण अभ्यास केला पाहिजे. 

प्र 3. इयत्ता आठवीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?

उत्तर. इयत्ता 8 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 8 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते. 

प्र 4. 8 वी च्या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?

उत्तर. 8 वी च्या परीक्षेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आणि काही अनिवार्य भाषा विषय इत्यादी समाविष्ट केलेले आहेत. 

प्र 5. इयत्ता 8 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? 

उत्तर. इयत्ता 8 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करून त्याची वेळोवेळी उजळणी केली पाहिजे असे केल्याने आपण आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करू शकता. 

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा