• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 24-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 वर्कशीट (कार्यपुस्तिका)

img-icon

वर्कशीट (कार्यपुस्तिका): महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता Embibe मधील तज्ञांनी सर्व विषयांच्या वर्कशीट (worksheet) तयार केल्या आहेत. या वर्कशीटमध्ये परीक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. आपल्याला अभ्यास करण्यासाठी हा ब्लॉग नक्कीच उपयोगी ठरेल अशी आम्हाला आशा आहे.  

या ब्लॉगमधील माहिती आपल्याला वर्कशीटचे महत्त्व आणि फायदे यांसारख्या मुद्द्यांची माहिती पुरविते. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023-परीक्षेविषयी

इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांची महत्त्वाची शैक्षणिक वर्षे सुरू होतात. या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 8 वी मध्ये तयार होतो.

दरवर्षी प्रत्येक शाळा इयत्ता 8 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करते आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून एक किंवा दोन महिन्यांमध्ये 2023 च्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करते. इयत्ता आठवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 वर्कशीटचे महत्त्व 

आजच्या ऑनलाईन काळामध्ये साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप असतात, त्यामुळे ऑनलाईन स्वाध्याय सोडविणे अधिकच सोपे झाले आहे. वर्कशीटमध्ये परिक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या धड्यांचा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश होतो. उत्तम गुण मिळविण्याकरिता विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणे, वर्कशीट (कार्यपुस्तिका) सोडविणे आवश्यक असते. इयत्ता 8 वी मध्ये आपण जितके अधिक गुण मिळवाल तेवढा पुढील शिक्षणाकरिता आपला पाया भक्कम होईल. अभ्यासाच्या तयारी मधील एक महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे वर्कशीट (कार्यपुस्तिका), पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आता आपण याचे महत्त्व समजून घेऊ: 

  • अधिक काळाकरिता अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी उत्तम साधन

वेळेमध्ये शिकलेल्या अभ्यासक्रमाचा सराव करण्याकरिता कार्यपुस्तिका महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असतात. परिणामी आपण जितका अधिक सराव करू तेवढा केलेला अभ्यास लक्षात राहाण्यास मदत होते. एकाच संकल्पनेचा सराव सतत होत राहिल्याने ती संकल्पना विद्यार्थ्यास पूर्णपणे समजते ज्यामुळे दीर्घ काळाकरिता लक्षात राहते. 

  • टक्केवारी वाढण्यास मदत होते: 

आपण सर्व विषयांचा अधिकाधिक सराव केल्यास मुख्य परीक्षेमध्ये उत्तरे लिहिणे सोपे जाते. त्यासोबतच योग्य सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वतःवरील आत्मविश्वास वाढण्यास देखील मदत होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले विशिष्ट ध्येय निश्चित करून त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन केले पाहिजे. वर्कशीट/worksheet सोडवून झाल्यानंतर आपल्याला त्याची गुणपत्रिका देखील मिळते. त्या गुणपत्रिकेवरून आपल्याला अजून किती तयारीची गरज आहे याचा अंदाज येण्यास मदत होते. 

  • अवघड संकल्पना समजण्यास मदत होते :

जर आपल्याला एखादी संकल्पना समजली नसेल तर यावर सराव करणे हा एक उत्तम उपाय आहे. वर्कशीट ही धड्यावर तसेच विषयावर आधारित असते, म्हणूनच विशिष्ट धड्यावरील अवघड संकल्पना समजून घेणे वर्कशीटच्या माध्यमातून सोपे होते.  

  • नवीन गोष्टी शिकण्यास मदत होते:

इयत्ता 8 वी च्या परीक्षेची तयारी करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यातील एक म्हणजे वर्कशीट सोडविणे. वर्कशीटच्या माध्यमातून आपण नव-नवे प्रश्न सोडवितो. एकाच विषयाकरिता किंवा टॉपिककरिता किती प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल विद्यार्थ्यांना कल्पना येते. तसेच विचारण्यात येणार्‍या प्रश्न प्रकाराच्या आधारे परीक्षेच्या तयारीने नियोजन करता येते.

  • मूळ परीक्षा स्वरूपाचा सराव:

वर्कशीटचे स्वरूप हे मुख्य परीक्षेप्रमाणेच असते. त्याचप्रमाणे प्रत्येक धड्यानुसार वर्कशीट सोडविता येत असल्यामुळे, केवळ एका धड्यावरील सर्व पद्धतीचे प्रश्न विद्यार्थ्यांना वर्कशीटच्या माध्यमातून सोडविता येतात. जसे मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप असते त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी सराव केला तर परीक्षेमध्ये उत्तरांचे लेखन करणे सोपे होते.

  • विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येते:

प्रत्येक वर्कशीट सोडविल्यानंतर वार्षिक परीक्षेप्रमाणे त्यास गुणांकन देण्यात येते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे ते कोणत्या विषयामध्ये प्रगती करत आहे, तसेच कोणत्या विषयाची अधिक तयारी करण्याची गरज आहे हे पालकांना समजणे सोपे जाते.   

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023-परीक्षेची तयारी करताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी, 2023 या परीक्षेच्या तयारीसाठी दिलेल्या युक्त्यांमध्ये पुढील मूलभूत सिद्धांत लक्षात ठेवून अभ्यासाची कार्यपद्धती तयार केली आहे:

नियमितपणा: 

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित जायला पाहिजे. शाळेत नियमित हजर राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमातील टॉपिकचे संपूर्ण आकलन करण्यामध्ये मदत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांशी संवाद साधून कोणत्याही विषयासंबंधी असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे.

संपूर्ण तयारी: 

विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिकवल्या जाणार्‍या धड्यांचे दररोज काटेकोरपणे सखोल मनन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध धड्यांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यास आणि ते लक्षात ठेवण्यास मदत होईल. परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवण्यासाठी अनेक वेळा उजळणी करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रॅक्टिस: 

प्रॅक्टिस आपल्याला परिपूर्ण बनवते म्हणून प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे आकलन होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे. धड्यांच्या नोट्स काढल्यामुळे तो विषय लवकर लक्षात राहण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे ओळखून मॉक टेस्टची प्रॅक्टिस केली पाहिजे.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023 वर्कशीट (कार्यपुस्तिका) – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1. परीक्षेपूर्वी किती वर्कशीट (कार्यपुस्तिका) सोडविणे आवश्यक आहे?

उत्तर. परीक्षेच्या तयारी करीता आपल्याला शक्य तितक्या वर्कशीट सोडविणे अधिक चांगले. कारण अधिक सरावामुळेच यश मिळणे सोपे होते. 

प्र 2. विशेष प्रावीण्यास पात्र ठरण्यासाठी मला किती टक्के मिळवावे लागतील?

उत्तर. विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांना सरासरी 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवावे लागतील.

प्र 3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेसाठी मला कसा अभ्यास करावा लागेल?

उत्तर. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी, आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. विद्यार्थ्यांनी प्रथम कॉन्सेप्ट स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवून त्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे.

प्र 4. मला वर्कशीट कुठे उपलब्ध होतील?

उत्तर. धड्यानुसार असणार्‍या वर्कशीट या संबंधित धड्याच्या शेवटी दिलेल्या असतात. पुस्तकातील स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त आपल्याला अन्य प्रश्न पाहायचे असल्यास आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊ शकता. 

आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता आठवी 2023-परीक्षेकरिता वर्कशीट (कार्यपुस्तिका) | Worksheet” या विषयावरील लेख आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात राहा. 

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा