• लेखक dhanashree consultant
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 29-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023-परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक्स

img-icon

नववीचे वर्ष हे सर्व विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे आहे. कारण इयत्ता 10 वी, 11 वी आणि 12 वी मध्ये समाविष्ट असलेल्या विषयांसाठी इयत्ता 9 वी चा अभ्यासक्रम हा पाया आहे. विद्यार्थी कोणत्याही विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, महत्त्वाचे धडे जाणून घेणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. हे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत करतात. या ब्लॉगमध्ये, आम्ही भाषा, गणित, विज्ञान, इतिहास व अर्थशास्त्र, या प्रमुख विषयांसाठी महत्त्वाचे धडे दिलेले आहेत. महत्त्वाच्या धड्यांचा आधीच अभ्यास केल्याने परीक्षेची तयारी सुलभ होते आणि परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 9 वी परीक्षेकरिता महत्त्वाच्या धड्यांबद्दल आपण जाणून घेऊया. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023-परीक्षेविषयी

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववीमध्ये समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचा मुख्य पाया आहे. म्हणूनच इयत्ता नववीमध्ये शिकवल्या जाणार्‍या सर्व अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे. इयत्ता नववी करीता सहामाही आणि वार्षिक अशा दोन सत्रांंमध्ये परीक्षा घेतली जाते. सहामाही परीक्षा ही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांंमध्ये होते तर वार्षिक परीक्षा ही अंदाजे मार्च-एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येते. इयत्ता नववीच्या परीक्षेचे नियोजन हे महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळेद्वारे करण्यात येते. सहामाही आणि वार्षिक परीक्षेमधील महत्त्वाच्या धड्यांवर अभ्यास कसा करावा याविषयीच्या काही टिप्स पुढे दिलेल्या आहेत.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023-प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

इयत्ता 9 वी च्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या परीक्षेसाठी प्रत्येक लेखी पेपर 40 गुणांचा असतो. परंतु इयत्ता 9 वी च्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विषयानुसार वेगवेगळे असते. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, जोड्या जुळवा, रिकाम्या जागा भरा, शाब्दिक उदाहरणे आणि निबंध लेखन असे प्रश्न समाविष्ट केलेले असतात.

विषय गुणांचे वितरण
भाषा विषय 100 (80+ 20)
इंग्रजी 100 (80+ 20)
गणित 100 (80+ 20)
विज्ञान आणि तंत्रज्ञान 100 (80+ 20)
सामाजिक शास्त्रे 100 (80+ 20)

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023-परीक्षेकरिता महत्त्वाचे टॉपिक्स:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता नववीचा अभ्यासक्रम प्रकाशित केला आहे. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे. भाषा, इंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान व इतर भाषा विषयांसह सर्व विषयांसाठी या वेबसाईट वरून अभ्यासक्रम डाऊनलोड  करू शकतात. शैक्षणिक वर्ष 2023 साठी, महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे इयत्ता 9 वी साठी नवीन पाठ्यपुस्तके प्रसिद्ध केली जातील. महाराष्ट्र बोर्डचा इयत्ता 9 वी साठी महत्त्वाचे धडे खालील प्रमाणे पहा:

  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता विज्ञान विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स: 

महत्त्वाच्या धड्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी महाराष्ट्र बोर्ड नववीचा अभ्यासक्रम खालील तक्त्यावरून जाणून घ्या. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रम 2022-23

विज्ञान आणि तंत्रज्ञान
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
गतीचे नियम वस्तूची गती
एकरेषीय एकसमान व नैकसमान गती
आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे
एकसमान वर्तुळाकार गती
न्यूटनचे गतीविषयक नियम
संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत
कार्य आणि ऊर्जा धन, ऋण व शून्य कार्य
ऊर्जेचे प्रकार
ऊर्जा अक्षय्यतेचा नियम
मुक्तपतन
शक्ती
धाराविद्युत विभव
विद्युतघटाचे विभवांतर
विद्युतधारा
ओहमचा नियम
वाहकाचा रोध व रोधकता
विद्युत परिपथ
वाहक आणि विसंवाहक
रोधांची एकसर जोडणी
रोधांची समांतर जोडणी
द्रव्याचे मोजमाप द्रव्य अक्षय्यतेचा नियम
स्थिर प्रमाणाचा नियम
अणूचे वस्तुमान
मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा
रेणुवस्तुमान
मोल
ॲव्हागॅड्रो अंक
संयुजा
मूलके
संयुगाची रासायनिक सूत्रे
आम्ल, आम्लारी व क्षार आयनिक संयुगे
आयनिक संयुगांचे विचरण
अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत
आम्ल व आम्लारींचे वर्गीकरण
आम्लारिधर्मता व आम्लधर्मता
आम्ल व आम्लारींची संहती
वैश्विक दर्शक
उदासिनीकरण
क्षारांचे प्रकार
स्फटिकजल
विदयुत अपघटन
वनस्पतींचे वर्गीकरण सजीवांचे वर्गीकरण
द्विबीजपत्री वनस्पती व एकबीजपत्री वनस्पतीतील फरक
परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह परिसंस्थेची ओळख
परिसंस्थेचे विविध प्रकार
पोषण पातळी
जैव-भू-रासायनिक चक्राचे प्रकार
नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया
उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव
क्लथन
रायझोबिअमची भूमिका व महत्व
किण्वन
कलिकायन
प्रतिजैविके
पेनिसिलीन
कवके
क्लॉस्ट्रीडिअम
रोगप्रसार व प्रतिबंध
पर्यावरणीय व्यवस्थापन हवामानातील बदल
भारतीय हवामान खाते
मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज
घनकचरा
विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा
घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्त्वे
श्‍वसनमार्ग, श्‍वासोच्‍छवास, रक्ताभिसरण
रुग्‍णाचे/आपदग्रस्ताचे वहन कसे करावे
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने
संगणकाचे प्रमुख दोन घटक
Microsoft Word
Microsoft Excel
Microsoft Powerpoint
Data Entry
प्रकाशाचे परावर्तन प्रकाश
सपाट आरसा
गोलीय आरसे
गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा
अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा
बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा
प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण
आरशाचे सूत्र
गोलीय आरशामुळे होणारे विशालन
ध्वनीचा अभ्यास ध्वनीचा वेग
श्राव्य, अवश्राव्य व श्राव्यातीत ध्वनी
प्रतिध्वनी
निनाद
सोनार
सोनोग्राफी
मानवी कर्ण
कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य मूलद्रव्य
हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन
स्फटिकी व अस्फटिकी अपरूपे
सहसंयुज बंध
संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन
कार्बनची विद्राव्यता
अग्निशामक यंत्र
मिथेन
बायोगॅस संयंत्र
पदार्थ आपल्या वापरातील क्षार
सोडिअम क्लोराइड
खाण्याचा सोडा
विरंजक चूर्ण
धुण्याचा सोडा
साबण व अपमार्जके
किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप
किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग
कृत्रिम खाद्यरंगांचे दुष्परिणाम
दुर्गंधीनाशक
टेफ्लॉन
पावडर कोटिंग
ॲनोडायझींग
मृत्तिका
सजीवांमधील जीवनप्रक्रिया परिवहन
वनस्पतींमधील पाण्याचे वहन
स्थानांतरण
उत्सर्जन संस्था वृक्क
रक्त व्याश्लेषण
समन्वय
अनुवर्तन
रसायन-अनुवर्तन
चेतानियंत्रण
चेतापेशी व चेतापेशींचे प्रकार
मानवी चेतासंस्था
मेरुरज्जू
परिघीय चेतासंस्था
स्वायत्त चेतासंस्था
प्रतिक्षिप्त क्रिया
अंतस्रावी ग्रंथी
आनुवंशिकता व परिवर्तन आनुवंशिकीशास्त्र
गुणसूत्रे व गुणसूत्रांचे प्रकार
डी.एन.ए.
जनुक
आर.एन.ए.
मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग
मेंडेलची द्विसंकर संतती
आनुवंशिक विकृती
एकजनुकीय विकृती
तंतूकणिकीय विकृती
बहुघटकीय विकृती
जैवतंत्रज्ञानाची ओळख ऊतींचे प्रकार
विभाजी ऊती
स्थायी ऊती
पृष्ठभागीय ऊती
जैवतंत्रज्ञान
ऊती संवर्धन
जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल
उद्यानविद्या, रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन
पशुसंवर्धन
कुक्कुटपालन
रेशीम उद्योग
अवकाश निरीक्षण : दुर्बिणी आकाश
अवकाश निरीक्षण
प्रकाशाची विविध रूपे
परावर्तन
परावर्तक-दुर्बिणी
रेडिओ दुर्बीण
ॲस्ट्रोसॅट
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता गणित भाग 1 विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स: 

महत्त्वाच्या धड्यांसह गणित विषयासाठी महाराष्ट्र बोर्ड नववीचा अभ्यासक्रम खालील तक्त्यावरून जाणून घ्या. 

गणित भाग 1
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
संच संच लिहिण्याच्या पद्धती
एकघटक, रिक्त, सांत, अनंत संच
पूरक संचाचे गुणधर्म
संचांवरील क्रिया
दोन संचांचा संयोग
संचातील घटकांची संख्या
वास्तव संख्या परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध
खंडित रूप व अखंड आवर्ती रूप
अपरिमेय आणि वास्तव संख्या
वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधाचे गुणधर्म
ऋण संख्येचे वर्गमूळ
धन परिमेय संख्येचे मूळ
करणींची तुलना
करणीचे परिमेयीकरण
वर्ग करणीचे द्विपद रूप
छेदाचे परिमेयीकरण
केवलमूल्य
बहुपदी बहुपदी
बहुपदीचे प्रकार
एका चलातील बहुपदीची कोटी
एकापेक्षा अधिक चलांतील बहुपदीची कोटी
बहुपदीचे प्रमाणरूप, सहगुणक रूप व घातांक रूप
युक्लिडचा भागाकार सिद्धांत
भागाकाराची संश्लेषक पद्धत
अवयव सिद्धांत
बहुपदींचे अवयव
गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण
समप्रमाण
व्यस्तप्रमाण
व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया
समान गुणोत्तरांच्या गुणधर्मांचा उपयोग
परंपरित प्रमाण
दोन चलांतील रेषीय समीकरणे दोन चलांतील रेषीय समीकरणे: ओळख
चलाचा लोप करून एकसामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत
दोन चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्यरूप
एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे
अर्थनियोजन अर्थनियोजन
करआकारणी
करांचे प्रकार
आयकर
आयकराच्या संदर्भातील बाबी
कायम खाते क्रमांक
सांख्यिकी सांख्यिकी
माहितीचे संकलन
सामग्रीचे वर्गीकरण
समावेशक पद्धती (खंडित वर्ग)
असमावेशक पद्धती (अखंडित वर्ग)
वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी
केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे
पास्कलचा त्रिकोण किंवा मेरूप्रस्तर
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता गणित भाग 2 विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स: 
गणित भाग 2
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
भूमितीतील मूलभूत संबोध भूमितीतील मूलभूत संबोध: बिंदू, रेषा व प्रतल
रेषाखंड
किरण
एकरूप रेषाखंड
रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म
रेषाखंडाचा मध्यबिंदू
रेषाखंडांची तुलना
रेषाखंडांची किंवा किरणांची लंबता
बिंदूचे रेषेपासूनचे अंतर
व्यत्यास
अप्रत्यक्ष सिद्धता
समांतर रेषा समांतर रेषा
समांतर रेषांचे गुणधर्म
आंतरकोनांचे प्रमेय
संगत कोनांचे व व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म
समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग
रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या
समांतर रेषांची आंतरकोन कसोटी
व्युत्क्रम कोन कसाेटी
संगतकोन कसोटी
त्रिकोण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय
समद्‌विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास
45°-45°-90° प्रमेय
त्रिकोणातील बाजू व कोन यांच्या असमानतेचे गुणधर्म
त्रिकोणांची समरूपता
त्रिकोण रचना लंबदुभाजकाचे प्रमेय
त्रिकोण रचना
चौकाेन आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाचा व्यत्यास
वर्तुळ एकरूप जीवांचे गुणधर्म
निर्देशक भूमिती अक्षांवरील बिंदूंचे निर्देशक
रेषीय समीकरणाचा आलेख
त्रिकोणमिती 30°- 60°-90° मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म
30° व 60° या कोनांची त्रिकोणमितीय गुणोत्तरे
पृष्ठफळ व घनफळ शंकूशी संबंधित संज्ञा व त्यांचा परस्पर संबंध
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता इतिहास विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स: 
इतिहास
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
इतिहासाची साधने लिखित साधने
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI)
फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)
भारत : 1960 नंतरच्या घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था
विज्ञान आणि तंत्रज्ञान
जागतिकीकरण
सामाजिक क्षेत्रातील बदल
भारतापुढील अंतर्गत आव्हान पंजाबमधील असंतोष
ऑपरेशन ब्लू स्टार
ईशान्य भारत समस्या
नक्षलवाद
जमातवाद
प्रदेशवाद
आर्थिक विकास मिश्र अर्थव्यवस्था
पंचवार्षिक योजना
योजनांची उद्‌दिष्टे
बँकांचे राष्ट्रीयीकरण
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (जागतिक व्यापार संघटना)
शैक्षणिक वाटचाल प्राथमिक शिक्षण
माध्यमिक शिक्षण
कोठारी आयोग
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986
संशोधन संस्था – विज्ञान
अभियांत्रिकी
संशोधन संस्था – वैद्यक क्षेत्र
संशोधनसंस्था – कृषी
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण चिपको आंदोलन
मद्यपानविरोधी आंदोलन
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती
स्त्रियांच्या संदर्भातील कायदे
सती प्रतिबंधक कायदा
मानव अधिकार संरक्षण कायदा
महिलांसाठी आरक्षण
अनुसूचित जाती-जमाती
भटक्या व विमुक्त जाती-जमाती
विज्ञान व तंत्रज्ञान भारतीय अणुऊर्जा आयोग
अणुचाचणी
क्षेपणास्त्र विकास
अवकाश संशोधन
तंत्रज्ञानातील प्रगती
टेलेक्स सेवा
आयएसडी (इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस)
उद्योग व व्यापार भारतातील काही उद्योग
भारत सरकारचे धोरण
बदलते जीवन : भाग 1 समाजकल्याण
कुटुंबसंस्था
मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट)
ग्रामीण भाग
शहरीकरण
बदलते जीवन : भाग 2 भाषा
क्रीडा
नाटक आणि चित्रपट
वृत्तपत्रे
दूरदर्शन
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स:
राज्यशास्त्र
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी पहिले महायुद्ध
दुसरे महायुद्ध
लष्करी संघटनांची निर्मिती
शीतयुद्ध
अलिप्ततावाद
शस्त्रास्त्र स्पर्धा
शीतयुद्धाची अखेर
शीतयुद्धानंतरचे जग
जागतिकीकरण
भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल परराष्ट्र धोरण
राष्ट्रीय हितसंबंध
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक
भारताचे परराष्ट्र धोरण
भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्‌दिष्टे
भारताची सुरक्षा व्यवस्था राष्ट्रीय सुरक्षा
भारताची सुरक्षा यंत्रणा
भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने
मानवी सुरक्षा
मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने
संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रे
संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे
संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे
संयुक्त राष्ट्रांची रचना
संयुक्त राष्ट्रे आणि भारत
भारत व अन्य देश भारत आणि शेजारी राष्ट्रे
भारत आणि युरोपीय राष्ट्रे
आंतरराष्ट्रीय समस्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्क या संकल्पनेचा उदय
मानवी हक्क आणि भारत
स्टॉकहोम ते पॅरिस परिषद
दहशतवाद
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेकरिता भूगोल विषयातील महत्त्वाचे टॉपिक्स:
भूगोल
धड्याचे नाव महत्त्वाचे टॉपिक
वितरणाचे नकाशे वितरण नकाशे
टिंब पद्धत
क्षेत्रघनी पद्धत
क्षेत्रघनी पद्धत
अंतर्गत हालचाल अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण
मंद भू-हालचाली
पर्वतनिर्माणकारी हालचाली
खंडनिर्माणकारी हालचाली
शीघ्र भू-हालचाली
भूकंप
ज्वालामुखी
बाह्यप्रक्रिया भाग-1 कायिक विदारण
रासायनिक विदारण
जैविक विदारण
खनन (अपक्षरण)
बाह्यप्रक्रिया भाग-2 बाह्यप्रक्रिया
हिमनदीचे कार्यव भूरूपे
वाऱ्याचे कार्यव भूरूपे
सागरी लाटांचे कार्य व भूरूपे
भूजलाचे कार्यव भूरूपे
वृष्टी वृष्टी
पर्जन्यमापक
वृष्टीचे परिणाम
सागरजलाचे गुणधर्म तापमान
क्षारता
घनता
आंतरराष्ट्रीय वाररेषा आंतरराष्ट्रीय वाररेषा
अर्थशास्त्राशी परिचय अर्थव्यवस्थेचे प्रकार
अर्थव्यवस्थेची कार्य
व्यापार व्यापाराचे प्रकार
आयात व निर्यात
व्यापार संतुलन
नागरीकरण यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान
औद्योगिकीकरण
व्यापार
स्थलांतर
वाहतूक व संदेशवहन
नागरीकरणाचे फायदे
नागरीकरणाच्या समस्या
वाहतूक व संदेशवहन वाहतुकीचे महत्त्व
संदेशवहन
पर्यटन पर्यटनाचे प्रकार
भारतातील पर्यटन विकासाचे महत्त्व

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 9 वी च्या महत्त्वाच्या तीन विषयातील महत्त्वाचे टॉपिक वर दिले आहेत. जर आपल्याला इतर विषयांचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचा असेल तर आपण https://www.mahahsscboard.in/sscsub.htm या लिंकवर क्लिक करून मिळवू शकता. बोर्डने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील. 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 – अभ्यासासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • दररोजच्या आपल्या अभ्यासाच्या वेळा निश्चित करा. 
  • आपण एक उत्तम वेळापत्रक तयार करून सुद्धा अभ्यासाची तयारी करू शकता. 
  • शालेय अभ्यासासोबतच स्वयंअध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा. 
  • आपल्या अभ्यासक्रमातील दीर्घोत्तरी उत्तर लेखनाचा भरपूर सराव करा जेणेकरून आपल्याला परीक्षेत गुणांनुसार प्रश्नाचे उत्तर लिहिता येईल. 
  • आपल्या रोजच्या अभ्यासासोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या प्रश्नांचा सराव करा. 
  • व्यायाम आणि विश्रांतीसाठी नियमित ब्रेक घ्या त्यामुळे आपण नेहमीच उत्साही आणि आनंदी राहाल.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 परीक्षेत उत्तरे कशी लिहावी – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र 1.  महाराष्ट्र बोर्ड इयत्ता इयत्ता 9 मधील प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती गुण आवश्यक आहेत?

उत्तरः महाराष्ट्र बोर्ड इयत्ता इयत्ता 9 मधील प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 35 गुण मिळवणे आवश्यक आहे.

प्र 2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववीचा अभ्यासक्रम मला कोठे मिळेल?

उत्तरः तपशीलवार अभ्यासक्रम डाऊनलोड  करण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डच्या https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट देऊ शकतात.

प्र 3. महाराष्ट्र बोर्ड नववीमधील महत्त्वाचे धडे जाणून घेण्याचे काय फायदे आहेत?

उत्तरः महाराष्ट्र बोर्ड नववीमधील महत्त्वाचे धडे जाणून घेतल्यास, विद्यार्थी अधिक जास्त गुण असलेल्या विषयांचा अभ्यास सहजपणे पूर्ण करू शकतात, परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकतात आणि जास्तीत जास्त गुण सहजपणे मिळवू शकतात. तसेच त्यांना कॉन्सेप्ट लक्ष्यात ठेवण्यास सोपे होईल. 

प्र 4. विद्यार्थी महाराष्ट्र इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम कोठून डाऊनलोड  करू शकतात?

उत्तर: विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डचा इयत्ता 9 वी चा अभ्यासक्रम https://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकतात. विद्यार्थी या पेजवरून अभ्यासक्रम डाऊनलोड देखील करू शकतात.

प्र 5. परीक्षेचा अभ्यास करताना मी किती वेळ द्यावा?

उत्तर: परीक्षेचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे, तसेच त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तथापि, स्वतःला तयारीसाठी जास्तीत जास्त वेळ देणे नेहमीच चांगली कल्पना असते कारण सतत तयारी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच नेहमीच त्या विषयातील महत्त्वाच्या धड्यांचे वाचन केलेले केव्हाही चांगले. त्याप्रमाणे आपले वेळापत्रक बनवावे. जेवढा आपण अभ्यासासाठी जास्त वेळ द्याल तेवढे आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवता येईल. 

आम्हाला आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023- महत्त्वाचे टॉपिक्स” या टॉपिकवरील ब्लॉग आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा. 

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा