
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 – महत्त्वाची सूत्रे
August 29, 2022परीक्षेचा अभ्यासक्रम: महाराष्ट्र बोर्डद्वारे प्रत्येक शैक्षणिक वर्षात इयत्ता 9 वी चा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात येतो. विद्यार्थी या अधिकृत वेबसाईटवरून ‘विषय आणि अभ्यासक्रम’ या विभागाअंतर्गत हा अभ्यासक्रम डाऊनलोड करू शकतात. हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे, तो डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात व त्यानुसार परीक्षेची तयारी करू शकतात. महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बोर्डच्या सर्वात नवीन अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्याचप्रमाणे, हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना हे समजून घेण्यास मदत करतो की ते कोणते विषय शिकत आहेत व शिक्षक देखील वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिकवणुकी संबंधित नियोजन तयार करू शकतात.
अधिक माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यानी प्राथमिक तारखा आणि खाली दिलेल्या माहितीचे अवलोकन केले पाहिजे. नेहमीच्या वेळापत्रकानुसार इयत्ता 9 वी ची परीक्षा अंदाजे मार्च 2023 मध्ये घेण्यात येईल.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी परीक्षेविषयी
नववीची परीक्षा ही 10 वी, 11 वी, आणि 12 वी मध्ये समाविष्ट केलेल्या अभ्यासक्रमाचा मुख्य पाया आहे. म्हणूनच इयत्ता नववीमध्ये शिकविल्या जाणार्या सर्व अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी गंभीरतेने पाहिले पाहिजे. बीजगणित, भूमिती या सारख्या गणित विषयातील उप-विषयांची ओळख ही नववीमध्ये विद्यार्थ्यांना करून दिली जाते. इयत्ता नववी करीता सहामाही आणि वार्षिक अशा दोन सत्रांंमध्ये परीक्षा घेतली जाते. सहामाही परीक्षा ही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांंमध्ये होते तर वार्षिक परीक्षा ही मार्च-एप्रिल या महिन्यांमध्ये घेण्यात येते. इयत्ता नववीच्या परीक्षेचे नियोजन हे महाराष्ट्र बोर्ड अंतर्गत प्रत्येक शाळेद्वारे करण्यात येते. सहामाही आणि वार्षिक परीक्षेमधील उत्तरांचे लेखन कशाप्रकारे करावे याविषयीच्या काही टिप्स पुढे दिलेल्या आहेत.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी2023 – अभ्यासक्रमाच्या PDF लिंक्स
2022-23 या सत्राकरिता महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी करीता आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाच्या PDF खालील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत:
विषयाचे नाव | PDF लिंक |
---|---|
हिंदी (द्वितीय व तृतीय) – भाषा | येथे क्लिक करा |
गणित | येथे क्लिक करा |
विज्ञान | येथे क्लिक करा |
सामाजिक शास्त्रे | येथे क्लिक करा |
इंग्रजी | येथे क्लिक करा |
हिंदी 1 – भाषा | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 – विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रम
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळाने कशाप्रकारे निश्चित केला आहे ते आपण पाहू.
2022-23 या सत्राकरिता इयत्ता नववीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:
धड्याचे नाव | महत्वाचे टॉपिक |
---|---|
गतीचे नियम | वस्तूची गती विस्थापन आणि अंतर चाल व वेग एकरेषीय एकसमान व नैकसमान गती त्वरण अंतर-काल आलेख आलेख पद्धतीने गतीविषयक समीकरणे एकसमान वर्तुळाकार गती न्यूटनचे गतीविषयक नियम |
कार्य आणि ऊर्जा | कार्य ऊर्जा मुक्त पतन शक्ती ऊर्जा अक्षय्यतेचा नियम |
धाराविद्युत | विभव आणि विभवांतर विद्युतधारा विद्युतरोध आणि ओहमचा नियम वाहक आणि विसंवाहक |
द्रव्याचे मोजमाप | रासायनिक संयोगाचे नियम मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा रेणुवस्तुमान आणि मोलची संकल्पना ॲव्हागॅड्रो अंक स्थिर प्रमाणाचा नियम अणू : आकार, वस्तूमान, संयुजा रेणू वस्तूमान आणि मोलची संकल्पना परिवर्ती संयुजा संयुगाची रासायनिक सुत्रे – एक पुनरावलोकन |
आम्ल, आम्लारी व क्षार | आयनिक संयुगांचे विचरण अऱ्हेनिअसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण द्रावणाचा सामू (pH) आम्ल व आम्लारींच्या अभिक्रिया क्षार स्फटिकजल आयनिक संयुगे व विद्युतवाहकता आयनांचे विचरण आणि विद्युतवाहकता विद्युत अपघटन पाण्याचे विद्युत अपघटन |
वनस्पतींचे वर्गीकरण | सृष्टी : वनस्पती उपसृष्टी-बीजपत्री |
परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह | परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह अन्नसाखळी व अन्नजाळे ऊर्जेचा मनोरा |
उपयुक्त व उपद्र्वी सूक्ष्मजीव | उपयुक्त सूक्ष्मजीव प्रतिजैविके उपद्रवी सूक्ष्मजीव इतर रोगकारक सूक्ष्मजीव |
पर्यावर्णीय व्यवस्थापन | हवामान घनकचरा व्यवस्ठापन : काळाची गरज आपत्ती व्यवस्थापन |
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा | संगणकाचे महत्वाचे घटक संगणक क्षेत्रातील संधी |
प्रकाशाचे परावर्तन | आरसा व आरशाचे प्रकार परावर्तित किरणांचे रेखन अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण आरशाचे सुत्र गोलीय आरशामुळे होणारे विशालन |
ध्वनीचा अभ्यास | ध्वनीचा वेग श्राव्य, अवश्राव्य व श्राव्यातीत ध्वनी ध्वनीचे परावर्तन प्रतिध्वनी निनाद सोनार सोनोग्राफी मानवी कर्ण |
कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य | कार्बन कार्बनचे गुणधर्म हायड्रोकार्बन्स : मूलभूत सेंद्रीय संयुगे कार्बनची विद्राव्यता कार्बन डाय ऑक्साईड अग्निशामक यंत्र मिथेन – रेणूसुत्र CH₄, रेणुवस्तुमान – 16 |
पदार्थ आपल्या वापरातील | दैनंदिन जीवनातील महत्वाचे क्षार किरणोत्सारी पदार्थ दैनंदिन जीवनातील काही रासायनिक पदार्थ |
सजीवांमधील जीवनप्रक्रिया | परिवहन उत्सर्जन समन्वय चेतापेशींचे प्रकार मानवी चेतासंस्था रासायनिक नियंत्रण |
आनुवंशिकता आणि परिवर्तन | अनुवंश आनुवंशिकता आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण डिआँक्सिरायबोन्यूक्लिइक आम्ल (DNA) रायबोन्यूक्लिइक आम्ल (RNA) मेंडेल यांचे अानुवंशिकतेचे सिद्धांत आनुवंशिक विकृती |
जैवतंत्रज्ञानाची ओळख | ऊती प्राणी ऊती वनस्पती ऊती जैवतंत्रज्ञान ऊती संवर्धन |
अवकाश निरीक्षण: दुर्बिणी | प्रकाशाची विविध रूपे दुर्बिणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बंगळुरू ॲस्ट्रोसॅट |
2022-23 या सत्राकरिता इयत्ता नववीचा गणित भाग – 2 या विषयाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे:
धड्याचे नाव | महत्वाचे टॉपिक |
---|---|
भूमितीतील मूलभूत संबोध | बिंदूंचे निर्देशक व अंतर दरम्यानता रेषाखंड किरण AB एकरूप रेषाखंड बिंदूचे रेषेपासूनचे अंतर सशर्त विधाने आणि व्यत्यास सिद्धता |
समांतर रेषा | समांतर रेषांचे गुणधर्म रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या समांतर रेषांची आंतरकोन कसोटी व्युत्क्रम कोन कसोटी |
त्रिकोण | त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणधर्म त्रिकोणांची एकरूपता समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय लंबदुभाजकाचे प्रमेय कोनदुभाजकाचे प्रमेय समरूप त्रिकोण |
त्रिकोण रचना | त्रिकोण रचना |
चौकोन | समांतरभुज चौकोन समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म समलंब चौकोन |
वर्तुळ | वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म वर्तुळाच्या एकरूप जीवा व त्यांचे केंद्रापासूनचे अंतर यासंबंधीचे गुणधर्म त्रिकोणाचे अंतवर्तुळ त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढणे |
निर्देशक भूमिती | अक्ष, आरंभबिंदू व चरण X-अक्षाला समांतर रेषा |
त्रिकोणमिती | त्रिकोणमितीय गुणोत्तर त्रिकोणमितीमधील महत्त्वाचे समीकरण |
पृष्ठफळ व घनफळ | शंकूशी संबंधित संज्ञा व त्यांचा परस्पर संबंध गोलाचे पृष्ठफळ |
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी 2023 – सामाजिक शास्त्रे
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 9 वी च्या सामाजिक शास्त्रे या विषयामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र व भूगोल या सर्व उपविषयांचा समावेश होतो. या विषयांचा अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत.
विषय | धड्याचे नाव | महत्वाचे टॉपिक |
---|---|---|
इतिहास | इतिहास लेखन | वृत्तपत्रे लिखित साधने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया टपाल तिकीटे भौतिक साधने नाणी संग्रालये फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मौखिक साधने दृक्-श्राव्य साधने |
भारत : १९६० नंतरच्या घडामोडी | 1960 चे दशक 1970 चे दशक 1980 चे दशक 1991 नंतरचे बदल विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतीय अर्थव्यवस्था सामाजिक क्षेत्रातील बदल जागतिकीकरण |
|
भारतापुढील अंतर्गत आव्हान | ऑपरेशन ब्लू स्टार पंजाबमधील असंतोष ईशान्य भारत समस्य नक्षलवाद जमातवाद प्रदेशवाद |
|
आर्थिक विकास | मिश्र अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना योजनांची उद्दिष्टे बँकांचे राष्ट्रीयीकरण |
|
शैक्षणिक वाटचाल | प्राथमिक शिक्षण कोठारी आयोग माध्यमिक शिक्षण आयोगाचे कामकाज उच्च शिक्षण संशोधन संस्था – विज्ञान अभियांत्रिकी संशोधन संस्था – वैद्यक क्षेत्र संशोधनसंस्था – कृषी |
|
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण | चिपको आंदोलन स्त्रीशक्तीचा आविष्कार मद्यपानविरोधी आंदोलन आंतरराष्ट्रीय महिला वर्ष हुंडा प्रथेच्या विरोधात जागृती स्त्रियांच्या संदर्भातील कायदे कौटुंबिक न्यायालय (1984) पोटगीबाबतचा खटला (1985) |
|
विज्ञान व तंत्रज्ञान | भारतीय अणुऊर्जा आयोग ध्रुव अणुभट्टी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) अणुचाचणी क्षेपणास्त्र विकास |
|
उद्योग व व्यापार | भारतातील काही उद्योग | |
बदलते जीवन : भाग 1 | ग्रामीण भाग शहरीकरण |
|
बदलते जीवन : भाग २ | भाषा क्रीडा वृत्तपत्रे नाटक आणि चित्रपट दूरदर्शन |
|
राज्यशास्त्र | महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी | परराष्ट्र धोरणांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध पहिले महायुद्ध दुसरे महायुद्ध शीतयुद्धाचे परिणाम शीतयुद्धानंतरचे जग |
भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल | परराष्ट्र धोरण भारताचे परराष्ट्र धोरण भारताचे परराष्ट्र धोरण : सुरुवातीचा टप्पा पहिला टप्पा : 1947 ते 1990 दुसरा टप्पा : 1990 ते आजपर्यंत |
|
भारताची सुरक्षा व्यवस्था | राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने मानवी सुरक्षा |
|
संयुक्त राष्ट्रे | संयुक्त राष्ट्रे : पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालानुक्रम संयुक्त राष्ट्रे या संघटनेची उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे आमसभेची कार्ये सुरक्षा परिषदेची कार्ये सहस्रकाची विकास उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रे आणि शांतता रक्षण संयुक्त राष्ट्रे आणि भारत |
|
भारत व अन्य देश | भारत आणि शेजारी राष्ट्रे भारत आणि अन्य शेजारी राष्ट्रे भारत आणि अमेरिका भारत आणि युरोपीय राष्ट्रे भारत आणि रशिया भारत आणि आफ्रिका खंड भारत आणि आग्नेय आशिया भारत आणि इंडो-पॅसिफिक |
|
आंतरराष्ट्रीय समस्या | स्टॉकहोम ते पॅरिस परिषद दहशतवाद म्हणजे काय? |
|
भूगोल | वितरणाचे नकाशे | टिंब पद्धत क्षेत्रघनी पद्धत समघनी पद्धत |
अंतर्गत हालचाली | अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण भूकंप ज्वालामुखी |
|
बाह्यप्रक्रिया भाग-1 | विदारण रासायनिक घटकांची विद्राव्यता आणि स्फटिकांची वाढ विस्तृत झीज खनन (अपक्षरण) |
|
बाह्यप्रक्रिया भाग-2 | नदीचे कार्य व भूरूपे हिमनदीचे कार्य व भूरूपे वाऱ्याचे कार्य व भूरूपे सागरी लाटांचे कार्य व भूरूपे भूजलाचे कार्य व भूरूपे |
|
वृष्टी | हिम गारा पाऊस पर्जन्यमापक धुके, दव आणि दहिवर |
|
सागरजलाचे गुणधर्म | तापमान क्षारता घनता |
|
अंतरराष्ट्रीय वाररेषा | वारांच्या गाेंधळावरील उपाय आंतरराष्ट्रीय वाररेषा आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व |
|
अर्थशास्त्राशी परिचय | अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण | |
व्यापार | व्यापाराचे प्रकार व्यापार संतुलन आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना विपणन |
|
नागरीकरण | औद्योगिकीकरण व्यापार यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान स्थलांतर वाहतूक व संदेशवहन नागरीकरणाचे फायदे नागरीकरणाच्या समस्या |
|
वाहतूक व संदेशवहन | वाहतुकीचे महत्त्व संदेशवहन |
|
पर्यटन | स्वदेशी पर्यटन परदेशी पर्यटन पर्यटन व आर्थिक विकास पर्यटन व पर्यावरणीय विकास पर्यटन व आरोग्य पर्यटन आणि सामाजिक विकास |
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता शिक्षण मंडळाचा इयत्ता 9 वी चा संपूर्ण अभ्यासक्रम मिळवण्यासाठी https://www.mahahsscboard.in/sscsub.htm या लिंकवर क्लिक करा. बोर्डने इतर काही भाषा शिकणे देखील अनिवार्य केले आहे, त्यांचे तपशील आपल्याला महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर मिळतील.
इयत्ता नववी, 2023 चा अभ्यासक्रम कसा डाऊनलोड करता येईल?
अधिकृत वेबसाईटवर अभ्यासक्रम प्रकाशित झाल्यानंतर, खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून विद्यार्थी हा अभ्यासक्रम PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकतात:
पायरी 1: महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in. ला भेट द्या.
पायरी 2: होम पेज वर असलेल्या “विषय आणि अभ्यासक्रम” या टॅबवर क्लिक करा.
पायरी 3: “माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र सामान्य विषय सांकेतिक क्रमांक आणि अभ्यासक्रम” या पर्यायावर क्लिक करा.
पायरी 4: PDF डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित विषयावर क्लिक करावे लागेल.
पायरी 5: भविष्यातील संदर्भासाठी PDF डाऊनलोड करा आणि सेव्ह करुन ठेवा.
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी अभ्यासक्रम 2023-वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र 1. मला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर मी काय करावे?
उत्तर. जर आपल्याला एखादा धडा/टॉपिक समजून घ्यायचा असेल तर आपण आपल्या शिक्षकांची, मित्रांची किंवा https://www.embibe.com/user-home या वेबसाईटला भेट देऊन Embibe स्पष्टीकरणकर्त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या शंकांचे निरसन झाले नाही तर आपण Embibe च्या शंका निरसन केंद्राची मदत घेऊ शकता.
प्र 2. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास मी अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो?
उत्तर. विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपली पुस्तके मदत करतील. परंतु अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी Embibe वर आपल्याला व्हिडीओ उत्तरांसह पुस्तके येथे मिळतील. त्यामुळे 3D इंटरॅक्टिव्ह व्हिडिओंद्वारे, प्रॅक्टिस करून आणि टेस्ट देऊन आपण अभ्यास केला पाहिजे.
प्र 3. इयत्ता नववीसाठी अभ्यासक्रम कसा तपासायचा?
उत्तर. इयत्ता 9 वी ची परीक्षा महाराष्ट्र बोर्डद्वारे घेतली जाते त्यामुळे आपण महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वरून अभ्यासक्रम तपासला पाहिजे. परंतु Embibe वर सुद्धा आपल्याला इयत्ता 9 वी च्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती मिळेल. Embibe आपल्या परीक्षांसाठी उत्तम शैक्षणिक सामग्री प्रदान करते व तज्ञांनी तयार केलेल्या आकर्षक, 3D व्हिडिओंद्वारे आपल्याला शिकण्यास मदत करते.
प्र 4. 9 वी च्या परीक्षेमध्ये कोणते विषय समाविष्ट केलेले आहेत?
उत्तर. 9 वी च्या परीक्षेमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आणि काही अनिवार्य भाषा विषय इत्यादी समाविष्ट केलेले आहेत.
प्र 5. इयत्ता 9 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी मी अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
उत्तर. इयत्ता 9 वी चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेवर पूर्ण करून त्याची वेळोवेळी उजळणी केली पाहिजे असे केल्याने आपण आपला अभ्यास वेळेवर पूर्ण करू शकता.
आम्हाला अशी आशा आहे की, “महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023” या टॉपिकवरील हा ब्लॉग आपल्याकरिता उपयुक्त ठरला असेल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता नववी बद्दलची नवीन माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी Embibe च्या संपर्कात रहा.