महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी

आपल्या निवडीची शक्यता वाढविण्याकरिता आता Embibe सोबत आपली
तयारी सुरू करा
  • Embibe क्लासेस करीता अमर्याद प्रवेश
  • नव्या स्वरूपातील मॉक टेस्ट द्या
  • संबंधित विषयातील तज्ज्ञाशी 24/7 चॅट करा

6,000आपल्या परिसरातील ऑनलाइन विद्यार्थी

  • लेखक Vaishnavi Bhavsar
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 30-08-2022
  • लेखक Vaishnavi Bhavsar
  • शेवटचे सुधारित केले असल्याची तारीख 30-08-2022

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेविषयी

About Exam

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेचे संक्षिप्त वर्णन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड ही 1965 मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41 द्वारे स्थापन झालेली स्वयंशासित संस्था आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या नऊ विभागीय बोर्डद्वारे महाराष्ट्रातील HSC आणि SSC परीक्षांचे व्यवस्थापन करण्यात येते. या बोर्डद्वारे वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यात येतात. HSC साठी सुमारे 14 लाख विद्यार्थी तसेच SSC साठी 17 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि अंदाजे 6 लाख विद्यार्थी HSC आणि SSC अशा दोन्ही परीक्षा देतात. राज्यात सुमारे 21000 शाळा (SSC) आणि 7000 उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये आहेत. इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांची महत्त्वाची शैक्षणिक वर्षे सुरू होतात. या इयत्तेमध्ये नवीन विषयांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा मूळ पाया इयत्ता 8 वी मध्ये तयार होतो.

दरवर्षी शाळा इयत्ता 8 वी ची परीक्षा अतिशय कुशल पद्धतीने आयोजित करतात आणि परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपासून 40 ते 45 दिवसांत या प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतात. इयत्ता आठवीच्या वर्षातून दोन वेळा परीक्षा होतात एक सहामाही अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते तर वार्षिक परीक्षा ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करण्यासाठी, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तसेच त्याचे काटेकोरपणे पालन देखील करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. 

 

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेचा सारांश

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांसाठी विशिष्ट नियम आणि कायदे अंमलात आणणे आणि विकसित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड (MSBSHSE) पार पाडते. महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके, इयत्तांचा अभ्यासक्रम, विषयाचा अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या तारखा ठरविणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे कामही या बोर्डाकडे आहे. शिवाय, ते समानतेने टेस्टचे व्यवस्थापन करते, पाठ्यपुस्तके तयार करते आणि याबद्दल अजून माहिती पुढे दिलेली आहे.

 द्वारे औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती रत्नागिरी आणि नागपूर येथील 9 विभागीय बोर्डामार्फत वर्षातून दोन वेळेस परीक्षा घेतली जाते.

MSBSHSE च्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी खालील तक्ते पहा:

ठळक मुद्दे तपशील
परीक्षेचे पूर्ण नाव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड
परीक्षेचे संक्षिप्त नाव शालेय परीक्षा
परीक्षेचे आयोजन करणारी संस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड, पुणे
निर्मिती 1 जानेवारी 1966
प्रकार राज्य सरकारी शिक्षण बोर्ड
मुख्यालय महाराष्ट्र, पुणे
अधिकृत भाषा इंग्रजी आणि मराठी
अधिकृत वेबसाईट Mahahsscboard.in

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी साठी अधिकृत वेबसाइट लिंक

https://mahahsscboard.in

परीक्षेचा अभ्यासक्रम

Exam Syllabus

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेचा अभ्यासक्रम

परीक्षेची तयारी करताना एक सर्वात महत्त्वाची बाब असते ती म्हणजे अभ्यासक्रम. विद्यार्थी अभ्यासक्रमाचा मदतीने ते काय शिकतील आणि कधी अभ्यास करतील हे ठरवू शकतात. इयत्ता 8 वी च्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्याला त्या वर्गात शिकण्यासाठी आवश्यक असलेले सर्व विषय समाविष्ट केलेले आहेत आणि परीक्षेत अधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी ही उच्च माध्यमिक वर्गाच्या कक्षेत येते. मुलांनी स्वतःहून कसे शिकायचे हे जाणण्यासाठी ही इयत्ता खरोखरच महत्त्वाची आहे. इयत्ता 8 वी साठी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना धड्याचे लवकर आकलन होईल. हा अभ्यासक्रम त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परीक्षांमध्ये स्पर्धा करण्यास मदत करतील.

महाराष्ट्र राज्य बोर्डाने 8 वी च्या वर्गातील गणितामध्ये समाविष्ट केलेल्या विषयांमध्ये वर्तुळ, क्षेत्रफळ, सांख्यिकी, चौकोन रचना आणि बरेच काही समाविष्ट केलेले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 8 वीच्या अभ्यासक्रमातील विज्ञान विषयात चुंबकत्व, धाराविद्युत, अणूची संरचना, मृदा आणि इतर विषयांचा समावेश  केला जातो. विद्यार्थी 1857 चा स्वातंत्र्य लढा, लोकसंख्या, भारतीय संसद आणि यासह महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 8 वी च्या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमातील इतर विषयांचा देखील अभ्यास करतात.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – गणित अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक धड्याचे नाव
1 अपरिमेय आणि वास्तविक संख्या
2 वर्ग आणि वर्गमूळ
3 चौकोनाची रचना
4 समांतर रेषा
5 क्षेत्रफळ
6 वर्तुळ
7 वर्तुळाचा परीघ आणि क्षेत्रफळ
8 सांख्यिकी
9 नित्यसमानता
10 चलन आणि प्रमाण
11 एकचल समीकरणे
12 घातांक
13 घन आणि घनफळ
14 चौकोनाची रचना
15 वर्तुळाचा कंस
16 चक्रवाढ व्याज
17 बहुपदी
18 जोडस्तंभलेख
19 सूट व कमिशन
20 घनफळ व पृष्ठफळ
21 बहुपदीचे अवयव
22 बहुपदीचा भागाकार

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – विज्ञान अभ्यासक्रम

धड्याचा क्रमांक धड्याचे नाव
1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
2 आरोग्य व रोग
3 बल व दाब
4 धाराविद्युत आणि चुंबकत्व
5 अणूचे अंतरंग
6 द्रव्याचे संघटन
7 धातू-अधातू
8 प्रदूषण
9 आपत्ती व्यवस्थापन
10 पेशी व पेशीअंगके
11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था
12 आम्ल, आम्लारी ओळख
13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
14 उष्णतेचे मापन व परिणाम
15 ध्वनी
16 प्रकाशाचे परावर्तन
17 मानवनिर्मित पदार्थ
18 परिसंस्था
19 ताऱ्यांची जीवनयात्रा

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – समाजशास्त्र अभ्यासक्रम

विषयाचे नाव धड्याचा क्रमांक धड्याचे नाव

इतिहास

1 इतिहासाची साधने
2 युरोप आणि भारत
3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम
4 1857 चा स्वातंत्र्यलढा
5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन
6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
7 असहकार चळवळ
8 सविनय कायदेभंग चळवळ
9 स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
11 समतेचा लढा
12 स्वातंत्र्यप्राप्ती
13 स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती

नागरिकशास्त्र

1 संसदीय शासन पद्धतीची ओळख
2 भारताची संसद
3 केंद्रीय कार्यकारी मंडळ
4 भारतातील न्यायव्यवस्था
5 राज्यशासन
6 नोकरशाही

भूगोल

1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
2 पृथ्वीचे अंतरंग
3 आर्द्रता व ढग
4 सागरतळरचना
5 सागरी प्रवाह
6 भूमी उपयोजन
7 लोकसंख्या
8 उद्योग
9 नकाशाप्रमाण
10 क्षेत्रभेट

इयत्ता 8 वी महाराष्ट्र बोर्डाचा इंग्रजीचा अभ्यासक्रम

युनिट अनुक्रमांक धड्याचे नाव

1

1.1 A Time to Believe
1.2 Dick Whittington and his Cat
1.3 The Pilgrim
1.4 Revathi’s Musical Plants

2

2.1 Vocation
2.2 Nature Created Man and Woman as Equals
2.3 The Worm
2.4 Three Visions for India
2.5 The Happy Prince
3 3.1 The Plate of Gold
3.2 The Kite Festival
3.3 The Last Leaf
3.4 Leisure

4

4.1 The Vet
4.2 Revolutionary Steps in Surgery
4.3 The Bees
4.4 Ramanujan
4.5 A Battle to Baffle

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या प्रात्यक्षिक/प्रयोगांची यादी आणि मॉडेल लेखन

प्रात्यक्षिक/प्रयोगांची यादी आणि त्याच्या प्रारूपाचे लिखाण

धडा प्रयोग
अन्न बियांपासून वनस्पती कशी वाढतात हे पाहण्यासाठी बियाणे रुजून पाहणे
अन्नपदार्थांमधील कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थांची उपस्थिती तपासा
पर्णरंध्रांचे निरीक्षण करणे
प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे पाने पिष्टमय पदार्थ तयार करतात याचा अभ्यास करणे
उपद्रवी जीवजंतू व कीटक अन्नधान्याची कशी नासाडी करतात याचा अभ्यास करणे
सूक्ष्मजीवांची उपस्थिती पाहण्यासाठी तलावाच्या पाण्याचे निरीक्षण करणे
पदार्थ धाग्यांपासून तयार होणाऱ्या कपड्यांबद्दल जाणून घेऊया
दिलेल्या पदार्थांचे त्यांचा कठीणपणा, पाण्यातील विद्राव्यता, पाण्यात तरंगणे आणि पारदर्शकता या गुणधर्मांच्या आधारे वर्गीकरण करा.
आपल्याला लोखंड, वाळू आणि मीठ यांचे मिश्रण दिले जाईल. या मिश्रणाचे तीनही घटक वेगळे करा
आपण खालील बदलांचे स्वरूप परिवर्तनीय आहेत की नाही ते शोधूया?
(a) पाण्यात विरघळल्यावर मीठ नाहीसे होणे
(b) बटाटे चिरणे.
उदासिनीकरणाची प्रक्रिया दर्शविण्यासाठी आम्ल आणि आम्लारी यांच्यातील अभिक्रिया
क्षारांच्या द्रावणाच्या आम्लीय/आम्लारीधर्मी /उदासीन स्वरूपाची ओळख
कागद दुमडणे, कागद फाडणे आणि कागद जाळणे या बदलांमधील फरक स्पष्ट करा
वनस्पती, प्राणी आणि कृत्रिम स्त्रोतांपासून मिळवलेल्या धाग्यांमधील पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेची तुलना करा
नैसर्गिक आणि मानवनिर्मित धाग्यांमध्ये फरक करा
धातूचे ऑक्साईड हे मूळ स्वरूपातील आहेत हे दर्शवा
अधातू ऑक्साईड्स हे आम्लधर्मी असतात हे दर्शवा
तांब्यापेक्षा लोखंड अधिक अभिक्रियाशील आहे हे दर्शवा
हायड्रोजन वायू हा काही धातूंवर केलेल्या आम्लांच्या क्रियेने तयार होतो हे दर्शवा
धातू आणि अधातूंची विद्युतवाहकता दर्शवा
पदार्थाच्या ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो हे दर्शवा
इंधन/पदार्थाचे ज्वलन होण्यासाठी त्यांना त्यांच्या प्रज्वलन तापमानापर्यंत उष्णता द्यायला पाहिजे हे दर्शवा
पाणी तापवताना, ते उकळत असताना आणि थंड होत असताना त्याचे तापमान मोजा
सुवाहक आणि दुर्वाहक यातील फरक ओळखणे
सजीवांचे विश्व बाष्पोच्छवासाच्या प्रक्रियेत पाने बाष्प सोडतात याचा अभ्यास
फुलांचे भाग ओळखा आणि एकलिंगी आणि उभयलिंगी फुलांमधील फरक ओळखा
आपल्या शरीरातील सांध्यांबद्दल तसेच ते कसे हालचाल करतात याबद्दल जाणून घेऊया
श्वास सोडलेल्या हवेत काय असते ते शोधा
श्वसन यंत्रणा समजून घ्या
वनस्पतींमधील पेशींमध्ये पाणी कसे फिरते (वहन होते) याचे निरीक्षण करा
कवक/वनस्पतींमधील विविध प्रकारच्या पुनरुत्पादनाचा अभ्यास करा
किण्वामधील (यीस्ट) पुनरुत्पादनाच्या पद्धतीचा अभ्यास करा
वनस्पती पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तात्पुरती काचपट्टी (स्लाइड) तयार करा
आपल्या समाजात अस्तित्वात असलेल्या लैंगिकतेवर आधारित/ लिंग-आधारित भेदभावाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करा
हलत्या गोष्टी, लोक आणि कल्पना तुमच्या वर्गाची लांबी तुमच्या पावलांची संख्या मोजून आणि त्याची लांबी सेंटीमीटर /मीटर यामध्ये दर्शवा
लंगडी करण्याचा वेग काढणे
एकूण बलाची संकल्पना समजून घेणे
द्रवाचा दाब हा केवळ द्रवाच्या आकारमानावर अवलंबून नसून द्रवस्तंभाच्या उंचीवर देखील अवलंबून असतो, हे दर्शविणे
रबर ड्रॉपरच्या कार्याचे तत्त्व स्पष्ट करा
भार वाढल्यास दोन पृष्ठभागांमधील स्थितिक घर्षण वाढते हे दर्शविणे
गोष्टी कशा कार्य करतात काही विद्युतघट आणि तारेच्या काही तुकड्यांच्या मदतीने बल्ब सुरु करणे
दिलेल्या लोखंडी खिळ्यापासून चुंबक तयार करणे आणि त्याच्या गुणधर्मांचे निरीक्षण करणे
चुंबकाचे दोन्ही ध्रुव आणि सर्व चुंबक समान तीव्रतेचे आहेत की नाही हे शोधणे
विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे निरीक्षण करणे
विद्युत चुंबकाची शक्ती तारेच्या वेटोळ्यांच्या संख्येवर कशी अवलंबून असते याचे निरीक्षण करणे. पाण्याच्या विद्युत अपघटनाचा अभ्यास करा
नैसर्गिक घटना छाया निर्मिती कशी होते याचा अभ्यास करा
हवा कशाप्रकारे दाब प्रयुक्त करते हे दर्शवा
हवा तापल्यावर ती प्रसरण पावते याचे निरीक्षण करा
जेव्हा मेणबत्ती आरशापासून वेगवेगळ्या अंतरावर ठेवली जाते तेव्हा अंतर्गोल आरशाद्वारे निर्माण झालेल्या मेणबत्तीच्या ज्योतीच्या प्रतिमेचे निरीक्षण करणे
जेव्हा मेणबत्ती भिंगापासून वेगवेगळ्या अंतरावर ठेवली जाते तेव्हा बहिर्वक्र भिंगाने तयार झालेल्या मेणबत्तीच्या ज्योतीच्या प्रतिमेचे निरीक्षण करा
पाण्याने भरलेल्या पेल्यामध्ये मेणबत्ती जाळणे (मजेशीर खेळ)
परावर्तनाचे नियम पडताळण्यासाठी चंद्राचे स्वरूप रोज रात्री बदलते याचे निरीक्षण करणे
नैसर्गिक स्रोत दिलेल्या कृतींमध्ये हवेची भूमिका (जर असल्यास).
टाकाऊ कागदाचा पुनर्वापर
जमिनीतून पाणी झिरपणे
गढूळ पाणी स्वच्छ करणे

स्कोअर वाढवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन

Study Plan to Maximise Score

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेकरिता तयारीच्या टिप्स

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी चे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या तयारीच्या सूचना वापरू शकतात जेणेकरून त्यांना अंतिम परीक्षेत त्यांची शैक्षणिक प्रगतीत भर टाकण्यास मदत होईल. इयत्ता 8 वी हे प्राथमिक शाळेचे शेवटचे वर्ष आहे आणि हा पाया जितका भक्कम असेल तितकी उच्च श्रेणींमध्ये यश मिळण्याची शक्यता यात जास्त असते. आपल्याला परीक्षा चांगल्याप्रकारे जाण्यासाठी येथे काही उपयुक्त मुद्दे दिलेले आहेत.

  • कोणत्याही परीक्षेत उच्च गुण मिळविण्यासाठी, आपल्याला आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी अभ्यासाची स्पष्ट आखणी आणि नियोजन करणे आवश्यक असेल.
  • आपल्याला आपल्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव असणे आवश्यक आहे आणि आपण आपल्या तयारीचे योग्यरित्या नियोजन केले पाहिजे.
  • आशावादी दृष्टीकोन ठेवा आणि शक्य तितक्या लवकर आपल्या अभ्यासाची पूर्वतयारीची सुरुवात करा.
  • आपल्याला शक्य तितक्या धड्यांमधील गणिते आणि विपुल संगणन यांच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा.
  • महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या वर्गाच्या अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला काही प्रश्न असल्यास, आपण कधीही Embibe सह संपर्क साधू शकता. आपल्या काही प्रश्नांसाठी आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी येथे आहोत. आमच्याकडे एक मोठी लर्निंग लायब्ररी तसेच क्वेश्चन बँक आहे.
  • आपले वेळापत्रक सुव्यवस्थित ठेवा जेणेकरुन आपण दररोज शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करू शकाल.
  • लर्न करत असताना आपल्याला काही प्रश्न असल्यास, आपल्या प्राध्यापकांना किंवा घरातील वडीलधाऱ्यांना विचारण्यास घाबरू नका. विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 24 तास, आठवड्याचे 7 दिवस Embibe कडून मदत मिळू शकते.
  • आपण ज्या विषयाचा अभ्यास करत आहात त्याबद्दल आपण उत्साही असले पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकर कंटाळा येऊ नये किंवा थकवा येऊ नये.
  • काहीच अशक्य नसते हे कधीही विसरू नका. इम्पॉसिबल हा शब्दच आय ॲम पॉसिबल असे दर्शवतो. म्हणजेच माझ्यातच शक्यता आहे.
  • आपण आपला संपूर्ण अभ्यासक्रम वेळेपूर्वी पूर्ण केल्याची खात्री करा आणि शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सोडू नका.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी ची परीक्षा देण्याचे धोरण

विद्यार्थ्यांनी इयत्ता 8 वी महाराष्ट्र शालेय शिक्षण बोर्डाच्या गुण देण्याच्या पद्धती आणि मूल्यमापन यांच्या निकषांचे पालन करावे आणि त्यानुसार टेस्ट लिहावी.

इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी, महाराष्ट्र शालेय शिक्षण बोर्डाची मूल्यमापन प्रक्रिया कठीण वाटू शकते. एखाद्या विद्यार्थ्याला विषयाचे पुरेसे ज्ञान आणि आकलन नसल्यास, विद्यार्थ्याने वर्षाच्या सुरुवातीला वर्ग शिक्षकासोबत शंकांचे निरसन करून विषयाचे चांगले आकलन करून घेतले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्याला योग्य तयारी करून अधिक स्कोअर प्राप्त करण्यासाठी अधिक उत्तरे लिहिता येतील.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा देण्याच्या काही युक्त्या खालीलप्रमाणे आहेत

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करत असताना उजळणीसाठी अधिक वेळ द्यावा.
  • समाजशास्त्राची पाठ्यपुस्तके वाचा कारण ते परीक्षेत अधिक गुणांसाठी विचारले जातात.
  • त्याच बरोबर, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र यासारखे इतर सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक प्रकरणाची नियमितपणे उजळणी केली पाहिजे.
  • विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि परीक्षेच्या लेखन मांडणीशी परिचित होण्यासाठी, त्यांनी नियमितपणे लेखन सुरू केले पाहिजे.
  • महाराष्ट्रातील इयत्ता 8 वी च्या असाइनमेंट्स ना कमी वेळेत पूर्ण होऊ शकतील अशा उद्दिष्टांमध्ये विभाजन करा आणि ते पूर्ण करण्याचे ध्येय ठेवा. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल व ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित होतील.
  • जीवशास्त्रातील महत्त्वाच्या आकृत्यांवर, तसेच याआधी परीक्षांमध्ये विचारलेल्या उदाहरणांवर / प्रश्नांवर अतिरिक्त भर द्या.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी - अभ्यासाचे सविस्तर नियोजन

खाली यादीत प्रत्येक विषयानुसार केलेले अभ्यासाचे नियोजन आपल्याला आपली श्रेणी वाढवण्यात आणि अभ्यास -सोपा करण्यात मदत करू शकतात.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – गणितासाठी अभ्यासाचे नियोजन:

आपल्याला गणित विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठी येथे काही त्याच्या अभ्यासाच्या युक्त्या आहेत.

  • महत्त्वाची मूलभूत तत्त्वे बरोबर समजून घ्या.
  • आपला गृहपाठ नियमितपणे करा. 
  • दररोज उदाहरणे सोडवण्याची आणि प्रॅक्टिस केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची प्रॅक्टिस करा.
  • आपल्याला प्रश्नांबाबत काही शंका असल्यास, आपल्या शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या.
  • वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे उदाहरणे प्रश्न सोडवण्यापासून सुरुवात करा.
  • बेरीज, गुणाकार, वजाबाकी आणि भागाकार यांसारख्या गणिती क्रिया करताना, संख्यांचे चिन्ह लक्षात ठेवा, जसे की- धन किंवा ऋण.
  • गणिते सोडविताना संख्यांच्या स्थानाची अदलाबदल होणार नाही याची काळजी घ्या.
  • महत्त्वाच्या समीकरणांची यादी एका तक्त्यावर लिहा आणि तो तक्ता आपल्या अभ्यासाच्या टेबलाजवळ चिकटवा, त्यामुळे आपण ती समीकरणे वारंवार पाहू शकता.
  • गणना करताना वेळेची बचत करण्यासाठी त्या जलद करता येतील असे तंत्र वापरा.
  • ब्ल्यूप्रिंट आणि प्रश्नाच्या स्वरूपाकडे बारकाईने लक्ष द्या.
  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका स्वतः सोडवा आणि त्यांचे विश्लेषण करा.
  • आपल्या वेळेचे कसे नियोजन करायचे आणि परीक्षेत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस परीक्षा द्या.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – विज्ञानासाठी अभ्यासाचे नियोजन

विज्ञानात अनेक आकृत्या, समीकरणे, अभिक्रिया, सूत्रे, नियम, गणिते आणि प्रयोग असतात ज्यांचे आपल्याला कधी कधी दडपण वाटू शकते. विज्ञानातील आपली श्रेणी वाढवण्यात आपल्याला मदत करण्यासाठी येथे काही मुद्दे दिलेले आहेत.

  • कठीण टॉपिक्सकडे वळण्यापूर्वी, आपल्याला मूलभूत गोष्टी समजल्या आहेत याची खात्री करा.
  • महत्त्वाची सूत्रे, नियम, आकृती, वैज्ञानिक नावे आणि नवीन शोध, समीकरणे आणि इतर माहिती कागदाच्या पानावर किंवा आपण ती दररोज सहज पाहू शकता अशा ठिकाणी तक्त्याच्या स्वरूपात चिकटवून ठेवावी. हे कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यास मदत करते.
  • काही टॉपिक्ससाठी, ‘कृतीतून शिकणे’ म्हणजेच प्रत्यक्ष कृती करत शिकण्याचे तंत्र वापरा.
  • तत्त्वांचे आणि प्रात्यक्षिकांचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी त्यांचे नियमितपणे प्रयोग करा आणि अभ्यास करा.
  • आकृत्या शिकण्यासाठी त्यांची कच्च्या कागदावर प्रॅक्टिस करणे हा एक चांगला मार्ग आहे. आकृत्यांना नाव देण्याचे नेहमी लक्षात ठेवा. शब्दलेखन (स्पेलिंग) ओळखताना त्यास लक्षात ठेवण्यासाठी मनात त्याबद्दल एक शब्द तयार करा
  • आकृत्या काढण्यावर शक्य तितका कमी वेळ घालवा.
  • शास्त्रीय संज्ञा, तसेच वनस्पती आणि प्राण्यांची वैज्ञानिक नावे कशी लिहायची ते शिका.
  • प्रश्न सोडविण्याचे नियोजन करा तसेच प्रश्नांचा क्रम ओळखा.
  • किमान मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि निर्धारित केलेल्या वेळेत अनेक प्रॅक्टिस परीक्षा द्या.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – इंग्रजीसाठी अभ्यासाचे नियोजन

इंग्रजी हा देखील अधिक गुण मिळवून देणारा विषय आहे ज्याच्या तयारीसाठी गणित आणि विज्ञानापेक्षा देखील कमी वेळ लागतो. इंग्रजीमध्ये उच्च श्रेणी मिळविण्यासाठी येथे काही उपयुक्त सूचना (हिंट्स) दिलेल्या आहेत

  • वर्तमानपत्रे, गोष्टींची पुस्तके, कादंबऱ्या, विज्ञान कथा आणि इतर साहित्य वाचा जे आपल्याला आपली इंग्रजी भाषेचे कौशल्ये विकसित करण्यात मदत करू शकतात.
  • न पाहिलेले परिच्छेद (अनसीन पॅसेज), नोट्स घेणे (नोट टेकिंग) यासारख्या घटकांना गुणांनुसार अधिक महत्त्व द्या कारण त्यांना कमी तयारीची आवश्यकता असते.
  • व्याकरणाचे मूलभूत नियम समजून घ्या.
  • आपण कसलेही चुकीचे शब्दलेखन करणार नाही याची खात्री करा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – समाजशास्त्रासाठी अभ्यासाचे नियोजन

 समाजशास्त्र हा देखील एक अधिक गुण मिळवून देणारा आणि उत्कंठावर्धक विषय आहे. समाजशास्त्रामध्ये आपल्याला अधिक गुण मिळविण्यात मदत करण्यासाठी येथे काही मुद्दे दिलेले आहेत.

  • मुख्य तारखा, घटना, लोक आणि इतर माहितीची यादी तयार करा.
  • पाठ्यपुस्तक काळजीपूर्वक वाचा.
  • नकाशे काळजीपूर्वक अभ्यासा.
  • राज्य आणि जिल्ह्याची सध्याची राजकीय परिस्थिती समजून घ्या.
  • मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि प्रॅक्टिस परीक्षांचे मूल्यमापन केलेले असावे.
  • सामाजिक शास्त्राची प्रश्नपत्रिकेचे स्वरूप दीर्घ असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या शब्द संख्येची मर्यादा लक्षात ठेवा व त्यानुसार प्रश्नपत्रिका सोडवा.
  • आपली उत्तरे दीर्घ परिच्छेदांमध्ये लिहिण्याऐवजी ठळक मुद्द्यांच्या स्वरूपात लिहिणे केव्हाही चांगले.
  • शब्द संख्या वाढविण्यासाठी समान मुद्द्यांची पुनरावृत्ती करू नका.

परीक्षा समुपदेशन

Exam counselling

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांचे समुपदेशन

ज्या विद्यार्थ्यांना समुपदेशन मिळते ते विद्यार्थी प्रेरित होतात, त्यांना आधार मिळतो आणि त्यांना शाळेत यश मिळविण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक आणि जागतिक स्तरावरील समुदायांमध्ये योगदान देण्यासाठी आवश्यक असलेली साधने मिळतात. या पद्धतीचा उद्देश प्रौढांपेक्षा विद्यार्थ्यांचे सामर्थ्य वाढवणे हा आहे. मुले महत्त्वाची कौशल्ये आणि सवयी शिकतील याची खात्री करण्यासाठी एक स्वयंस्फूर्त दृष्टीकोन त्यांच्या सर्वांगीण विकासास लाभदायक ठरेल. प्रतिबंधात्मक शिक्षण देण्यासाठी वैयक्तिक आणि गटासोबत चर्चासत्र, तसेच वर्गात प्रशिक्षण देणे इत्यादींचा उपयोग केला जातो. आपल्या मुलांच्या विकासाची प्रगती टप्प्याटप्प्याने होत असताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेबद्दल पालकांचे समुपदेशन

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी ही विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जीवनाची आहे व या वयात नोकरीचे मार्गदर्शन घेणे स्वाभाविक असते. गणित आणि विज्ञान यासारख्या विषयांमध्ये शैक्षणिक यश वाढवण्यासाठी अभ्यासाचे नियोजन करण्याची सध्याची प्रवृत्ती आहे. गणित शिकणे इतके अवघड का वाटते? मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे इतके अवघड का होत असते? आपल्या मुलांनी करिअरचा कोणता मार्ग स्वीकारावा हे थोडेसे कठीण आहे. त्यांना मिळणाऱ्या विस्तृत एक्स्पोजरमुळे आज विद्यार्थ्यांकडे करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. “त्यापैकी योग्य करिअर कोणते?”, हा सामान्यतः विचारला जाणारा प्रश्न आहे. गणिताबद्दल असलेली अनास्था पण जीवशास्त्राबद्दल आवड यांसारख्या आवडीनिवडतील विसंगती असू शकतात. काहींना सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट-CA), वकील किंवा बँकर बनण्याची इच्छा असते. भूगोल, अर्थशास्त्र किंवा इतिहास यासारख्या मानवशास्त्राच्या विषयांबद्दलची आवड असते पण यात करिअरच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याची उणीव दिसून येते. त्यामुळे नोकरीच्या निवडीवरील असे काही सर्व-सामान्य गैरसमज दिसून येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Freaquently Asked Questions

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र1. मी महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेची तयारी कशी करू शकतो?
उ. इयत्‍ता 8 वी च्‍या परिक्षेची तयारी करण्‍याचा एक उत्तम मार्ग म्हणजे NCERT ची पुस्‍तके एका पाठोपाठ दुसरे अशा पद्धतीने अभ्यासणे. आपण आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, आपण विशिष्ट विषयावर मॉक परीक्षा देण्यासाठी Embibe चा उपयोग करू शकता. हे आपल्याला उच्च श्रेणी प्राप्त करण्यात मदत करेल.

प्र2. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी ची मॉक टेस्ट देऊ शकेल असा कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे का?
उ. होय, आपण 8 वी या वर्गाची मॉक टेस्ट देण्यासाठी Embibe चा उपयोग करू शकता. याव्यतिरिक्त, आपल्याला आपल्या मॉक टेस्टचे सखोल समीक्षण मिळेल.

प्र3. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी हे शिक्षणातील महत्त्वाची प्राथमिक इयत्ता का आहे?
उ. इयत्ता 8 वी हा प्राथमिक शिक्षणातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण येथे शिकवल्या जाणार्‍या कल्पना पुढील सर्व वर्गांसाठी पाया म्हणून काम करतात. परिणामी, जर आपल्याला शाळेत उत्कृष्ट प्रगती करायची असेल, तर आपल्याला प्रथम आपला पाया भक्कम करणे आवश्यक असते.

प्र4. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेत विद्यार्थी जास्तीत जास्त गुण कसे मिळवू शकतात?
उ.
इयत्ता 8 वी मध्ये गणितात चांगले गुण मिळवण्यासाठी खालील काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  • प्रश्नपत्रिकेतील उदाहरणे काळजीपूर्वक वाचा. संख्यांवर लक्ष ठेवा.
  • आव्हानात्मक प्रश्न सोडविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका.
  • घड्याळावर लक्ष ठेवा.
  • परीक्षेपूर्वी शक्य तेवढी उजळणी करा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेत काय करावे आणि काय करू नये

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी मध्ये शिकत असताना – काय करावे आणि काय करू नये –

हे करावे:

  • विशिष्ट टॉपिक्स आणि धड्यांमधील आपली निपुणता आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्यासाठी सर्वात योग्य असे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. आपण वेळापत्रक तयार केल्यानंतर त्याचे पालन कटाक्षाने करा.
  • संपूर्ण इयत्तेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे लिहून घ्या आणि विविध अंतर्गत प्रकारे केल्या जाणाऱ्या मूल्यमापन पद्धतींमध्ये तो आपल्या शाळेद्वारे वर्षभर कसा वितरित केला जातो तेही पहा .
  • वेळेआधी या सर्व गोष्टींचे नियोजन करा. नेहमी लवकर तयारी सुरू करण्याचा प्रयत्न करा आणि समीक्षणासाठी वेळ द्या.
  • सर्व विषयांना समान महत्त्व द्या.
  • परीक्षा केंद्रावर वेळेवर या. परीक्षेच्या वेळेआधी पोहोचा आणि आपल्याला आरामदायक अशी बसण्याची जागा निवडा.
  • आपल्याला टेस्टचे स्वरूप, गुण देण्याची पद्धत आणि मूल्यमापनाचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला तयारी करणे सोपे जाईल.
  • आपल्याला प्रत्येक प्रश्नाच्या प्रकारासाठी गुण देण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक आहे. नकारात्मक गुण कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना लागू होते किंवा लागू होत नाही याची चौकशी करा.
  • आपण दिलेली उत्तरे पानावर व्यवस्थित आणि स्पष्टपणे लिहा जेणेकरून परीक्षकांना ते समजू शकतील
  • आरोग्याची काळजी घ्या. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखा.

हे करू नये:

  • आपल्या वेळापत्रकाचे पालन करण्यापासून विचलित होऊ नका. आपल्या अभ्यासात शिस्त आणि सातत्य राखणे महत्त्वाचे आहे.
  • परीक्षेची तयारी करताना स्वत:ला कोणत्याही अनावश्यक ताणतणावाखाली आणू नका. शक्य तितके, शांत, स्थिर आणि अविचल रहा.
  • परीक्षेदरम्यान, कोणतेही अनुचित मार्ग वापरू नका.
  • आपण परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवली असेल तरीही अंतिम घंटा वाजण्यापूर्वी परीक्षा कक्षामधून/हॉलमधून बाहेर पडू नका.
  • आपल्याकडे अजूनही वेळ शिल्लक असल्यास, आपली उत्तरे पुन्हा वाचा, आपल्या चुका शोधा आणि त्या दुरुस्त करा.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या शाळांची यादी

About Exam

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या शाळांची यादी

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या शाळांची यादी

अनुक्रमांक शाळेचे नाव प्रकार जिल्हा
1 आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल सार्वजनिक रायगड
2 अहुजा स्कुल अँड कॉलेज सार्वजनिक मुंबई शहर
3 अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कुल सार्वजनिक सातारा
4 आर्मी पब्लिक स्कुल सार्वजनिक पुणे
5 अरुणोदय पब्लिक स्कुल सार्वजनिक ठाणे
6 बाल भारती पब्लिक स्कुल सार्वजनिक मुंबई शहर
7 ब्लॉसम पब्लिक स्कुल सार्वजनिक पुणे
8 डी. ए. व्ही. पब्लिक स्कुल सार्वजनिक ठाणे/पुणे
9 दिल्ली पब्लिक स्कुल सार्वजनिक मुंबई शहर
10 गांधी सिटी पब्लिक स्कुल सार्वजनिक वर्धा
11 अक्षरा इंटरनॅशनल स्कुल आंतरराष्ट्रीय पुणे
12 ऑल सेंट इंटरनॅशनल रेसिडेन्शिअल स्कुल आंतरराष्ट्रीय ठाणे
13 कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल आंतरराष्ट्रीय पुणे
14 ब्रियो इंटरनॅशनल स्कुल आंतरराष्ट्रीय मुंबई शहर
15 फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी आंतरराष्ट्रीय कोल्हापूर
16 ए. के जोशी इंग्लिश मिडीयम खाजगी ठाणे
17 ए. पी. हायस्कुल खाजगी नाशिक
18 बी. जे. एम. कॅरॅमल ॲकॅडमी खाजगी चंद्रपूर
19 बेथनी कॉन्व्हेंट स्कुल खाजगी रायगड
20 इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कुल खाजगी हिंगोली

पालक समुपदेशन

About Exam

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या परीक्षेबद्दल पालकांचे समुपदेशन

पालकांचे समुपदेशन हे प्रामुख्याने सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणे, नकारात्मक वर्तन सुधारणे आणि पाल्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे यावर लक्ष केंद्रित करते. हे समुपदेशन फक्त एक किंवा दोन्ही पालक करू शकतात. पालकांचे समुपदेशन पुरेशी दिशा, कौशल्ये आणि माहिती देते ज्यामुळे पालकांना त्यांच्या मुलांवर परिणाम करणाऱ्या विविध समस्यांवर उपाय करण्यास मदत होते. पालक त्यांच्या मुलाच्या स्थितीबद्दल अडचणी आणि काळजी यावर उपाय करण्यासाठी तज्ञांची मदत घेतात. त्यांच्या मुलांच्या बाबतीत उशिराने प्राप्त होणारे माईलस्टोन, त्यांच्यातील विकासात्मक उणीवा आणि दुर्बलतेच्या परिणामी, पालकांना आणि त्यांची काळजी असणाऱ्या व्यक्तींना चिडचिड, तणाव, चिंता आणि दुःख यासारख्या महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे हा दीर्घकालीन प्रभाव पालकांच्या त्यांच्या सामाजिक आणि भावनिक कल्याणाविषयीच्या समजांवर तसेच कुटुंबांना फाटा देणार्‍या कौटुंबिक संबंधांमधील महत्त्वपूर्ण बदलांवर परिणाम करतो. पालकांचे समुपदेशन केल्यास त्यांना त्यांच्या मुलांवर परिणाम करणाऱ्या विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेला सपोर्ट, कौशल्ये आणि माहिती प्रदान करते. पालकांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यात येणाऱ्या नोकरीच्या पर्यायांबद्दल अधिक माहिती दिली पाहिजे.

आगामी परीक्षा

Similar

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी नंतर आगामी परीक्षांची यादी

आजच्या स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांचे ज्ञान, रुची, क्षमता आणि त्या सुप्त क्षमतांना मूर्त रूप देण्यासाठी परीक्षा हे एक माध्यम असते. पुढील इयत्तेत जाण्यासाठी, विद्यार्थ्यांनी शाळांद्वारे घेण्यात येणाऱ्या टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. सतत सर्वसमावेशक मूल्यमापन (CCE) च्या आधारे इयत्ता 7 वी ते 8 वी पर्यंत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाते. या शालेय स्तरावरील परीक्षेव्यतिरिक्त, दरवर्षी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षा दिल्या जातात. या टेस्ट विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा अभ्यास करण्याचा उत्साह वाढवतात.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी चे विद्यार्थी काही स्पर्धात्मक परीक्षांना बसू शकतात त्यातील काही परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत:

  • आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड (ISO)
  • आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (IMO)
  • इंग्रजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड (EIO)
  • सामान्य ज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड (GKIO)
  • आंतरराष्ट्रीय कंप्युटर ऑलिम्पियाड (ICO)
  • आंतरराष्ट्रीय चित्रकला ऑलिम्पियाड (IDO)
  • राष्ट्रीय निबंध ऑलिम्पियाड (NESO)
  • राष्ट्रीय समाजशास्त्र ऑलिम्पियाड (NSSO)

खालील काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत ज्या इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी मधील विद्यार्थी देऊ शकतात:

  • राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा किंवा NTSE
    हा एक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) कार्यक्रम असून शालेय विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय स्पर्धात्मक टेस्टपैकी एक आहे. NTSE चा उद्देश असाधारण बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक योग्यता असलेल्या विद्यार्थ्यांना शोधणे हा आहे.
  • महत्त्वाचे कौशल्य (शाळेविषयक टेस्टद्वारे शैक्षणिक कौशल्यांचे मूल्यांकन)
    ही एक कौशल्यावर आधारित मूल्यांकन परीक्षा आहे जी शास्त्रोक्त पद्धतीच्या वापरातून घोकंपट्टीचे प्रमाण कमी करण्यासाठी तयार केली गेली आहे. हे इयत्ता 3 री ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या शैक्षणिक कॉन्सेप्ट किती चांगल्या प्रकारे समजल्या आहेत याचे मूल्यांकन करते. या टेस्ट CBSE, ICSE, IGCSE आणि प्रमुख राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत.

विषय: इंग्रजी, गणित आणि विज्ञान (ऐच्छिक विषय- समाजशास्त्र आणि हिंदी)

आयोजक संस्था : एज्युकेशनल इनिशिएटिव्ह्ज प्रा. लि.

  •  राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान ऑलिम्पियाड किंवा NBO
    सर्व विषयातील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात, ज्यामध्ये 50 गुणांसाठी 50 प्रश्न असतात. शाळांना वार्षिक ई-वृत्तपत्रांव्यतिरिक्त बायोटेक्नॉलॉजी ॲक्टिव्हिटी बुक्स आणि वर्क बुक्स प्रदान केल्या जातात. तरुणांना बायोटेक्नॉलॉजीच्या समस्यांबद्दल सजग करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी हा त्याचा उद्देश आहे.

विषय: गणित

आयोजक संस्था : एज्युहिल फाउंडेशन

  • NLSTSE: राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक विचार करण्यास प्रोत्साहित करते. NSTSE च्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शास्त्रोक्त पद्धतीने प्रोग्रामचा पाया तयार करणाऱ्या कल्पनांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 2 री ते 12 वी मधील विद्यार्थी NLSTSE टेस्ट देण्यासाठी पात्र आहेत. याच्या अभ्यासाचे साहित्य CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे.
  • IMO: आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचे संक्षिप्त रूप IMO असे आहे. या स्पर्धात्मक परीक्षेची आखणी मुलांची गणितीय कौशल्ये ओळखण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी केलेली आहे. याचा अभ्यासक्रम CBSE आणि ICSE बोर्डांच्या आवश्यकतांशी सुसंगत आहे. IMO सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील प्रदान करते.
  • ISO: आंतरराष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड (ISO) ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेस्ट आहे. ISO हे SSE (सोसायटी फॉर सायन्स एज्युकेशन) द्वारे शासित आहे. या परीक्षेसाठी मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 1 ली ते 12 वी मधील भारतातील विद्यार्थी पात्र आहेत.

(स्वतः तयार करा):

कृती आणि प्रकल्पांद्वारे शिकण्यासाठी हा एक सर्जनशील दृष्टीकोन आहे. इंग्रजी आणि हिंदी यासारखे विषय शिकवण्यासाठी नाटकांचा वापर केला जाऊ शकतो, तर वादविवाद, सर्वेक्षण आणि क्षेत्रकार्य (फील्डवर्क) यांचा उपयोग समाजशास्त्रातील कॉन्सेप्ट शिकवण्यासाठी केला जाऊ शकतो. काही अंकगणितातील कॉन्सेप्ट, जसे की नफा आणि तोटा, क्षेत्रफळाचे मोजमाप आणि यासारख्या, स्वतः तयार करता येणाऱ्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजेत. Embibe ॲपमध्ये प्रत्येक वर्ग, विषय आणि धड्यासाठी DIY कृती दिलेल्या आहेत जेणेकरून शिकणे आनंददायक आणि अर्थपूर्ण होईल.

प्रॅक्टिकल नॉलेज/करिअरची उद्दिष्टे

Prediction

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी मध्ये वास्तविक जगाकडून शिकणे

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी – वास्तविक जगाकडून शिकणे

वास्तविक जगातून शिकत असताना, विद्यार्थी विविध कृतींमध्ये व्यस्त राहू शकतात. ते वर्गात शिकलेल्या गोष्टी वर्गाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही परिस्थितींमध्ये वापरून पाहू शकतात. जेव्हा विद्यार्थ्यांना वस्तू आणि विषयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो तेव्हा त्यांना अभ्यासक्रम समजतो आणि शिकणे अधिक आनंददायी वाटते. व्यायाम, प्रयोग, क्षेत्र भेट, गट किंवा समुदाय-आधारित कृती आणि इतर वास्तविक पद्धतीने शिकण्याचे अनुभव आपल्या मुलांना नियमितपणे द्यायला पाहिजेत.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी नंतर आगामी काळातील कौशल्ये

कोडिंग:

कोडिंगचा वापर सॉफ्टवेअर, वेबसाइट्स आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स तयार करण्यासाठी केला जातो. आपल्याकडे फेसबुक, मोबाईल, आपले आवडते ब्लॉग वाचण्यासाठी आपण वापरत असलेले ब्राउझर किंवा वेबसाइट्स नसती तर हे सगळे वापरणे शक्य झाले नसते. सारे काही कोडच्या नियंत्रणाखाली असते. 1970 पासून कंप्युटर शास्त्रज्ञांनी 700 हून अधिक वेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज विकसित केल्या आहेत. प्रत्येक भाषेचा कंप्युटर्सना त्या लँग्वेजद्वारे मोठ्या प्रमाणात डेटावर प्रक्रिया करण्यात मदत करण्याचा दृष्टीकोन असतो. जरी प्रत्येक कोडिंग लँग्वेजची तिची शब्दावली आणि वैशिष्ट्ये वेगळी असली, तरी तेथे अनेक क्रॉसओवर असतात. दुसरीकडे, या क्षेत्रात नवीन असलेल्या प्रोग्रॅमर्सनी त्यांच्यापुढे उपलब्ध असलेल्या विविध प्रोग्रामिंग लँग्वेजमुळे गोंधळून जायची गरज नाही. व्यापक वापरात फक्त काही डझन प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. रुबी, स्विफ्ट, जावास्क्रिप्ट, कोबोल ऑब्जेक्टिव्ह-सी, व्हिज्युअल बेसिक आणि पर्ल या त्यापैकी महत्त्वाच्या प्रोग्रामिंग लॅंग्वेज आहेत.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी नंतर करिअर संबंधीची कौशल्ये

प्राथमिक शिक्षण हे श्रवण कौशल्य, कामाच्या ठिकाणी विविधता समजून घेणे, भाषा कौशल्ये, संशोधन कौशल्ये, नियोजन, नेतृत्व कौशल्य, भावनिक समतोल, स्व-सर्वेक्षण, माहिती शोधणे, संभाषण कौशल्य इ. पक्के करते. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर हे साध्य केले जाऊ शकते. हे वास्तविक जीवनातील घटना आणि कार्यांची उदाहरणे देऊन हे साध्य करता येईल जे स्वतः पूर्ण केले जाऊ शकते.

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी नंतर करिअर संभाव्यता/कोणती शाखा निवडावी?

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 8 वी च्या टेस्टनंतर थेट नोकरीची निवड होत नसली तरी, विद्यार्थ्यांनी तयार असणे आवश्यक असते. 10 वी नंतर विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य, कला, ललित कला आणि इतर विषयांमध्ये त्यांची आवड जोपासू शकतात. एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला NEET, JEE आणि इतर स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थी CA, CS, FCA आणि इतर व्यवसाय-संबंधित पदवी घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना मीडिया, विधी (law), ललित कला किंवा फ्लाइट अटेंडंटमध्ये काम करायचे आहे त्यांचे कला किंवा मानवविज्ञान असे विषय प्रमुख असणे आवश्यक आहे.

Embibe वर 3D लर्निंग, पुस्तकांची प्रॅक्टिस, टेस्ट आणि शंकांचे निरसन करून आपले सर्वोत्तम ध्येय साध्य करा